অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जलयुक्त शिवार अभियानामुळे गावाचा कायापालट

जलयुक्त शिवार अभियानामुळे गावाचा कायापालट

फल तालुक्यातील नाईकबोमवाडी हे तातमगिरीच्या पायथ्याला वसलेले एक टुमदार खेडेगाव. अवर्षणप्रवण क्षेत्रात असल्याने दुष्काळी पट्यात मोडणारे, पावसाळ्यात येथे पडणा-या पावसाचे पाणी ओढा-नाल्यातून वाहत जाऊन ऐन फेब्रुवारीत म्हणजेच उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच गावातील मंडळींना पाण्याच्या टँकरची वाट पहावी लागायची.

जलयुक्त शिवार योजना

जनावरांना चारा पुरेशा प्रमाणात नसल्याने पशुधनही फार कमी. कोरडवाहू शेतीतून मिळेल त्या उत्पन्नावर समाधान मानत गावातील मंडळी आभाळाकडे डोळे लावून बसायची. फलटण तालुक्याचे कल्पक व कृतिशील गट विकास अधिकारी श्री. नेिलेश काळे यांनी जाधववाडी या ठिंकाणच्या माळरानावर पंचायत समितीच्या सर्व कर्मचा-यांच्या माध्यमातून श्रमदानातून १५oo वृक्ष लावून सुट्टीच्या कालावधीत या वृक्षांची जोपासना केली. या कामातील कर्मचा-यांचा उत्साह पाहूनच जलयुक्त शिवार योजनेंतर्गत फलटण पंचायत सर्मितीतील सर्व कर्मचा-यांना एकत्र करून श्रमदानाच्या माध्यमातून व एक दिवसाच्या कर्मचारी वेतनातून नाईकबोमवाडी हे गाव जलयुक्त करण्याची संकल्पना सर्वांसमोर मांडली. सर्व कर्मचा-यांनी या योजनेस भरभरुन प्रतिसाद देंत श्रमदानाचा निधरि केला.

यासाठीं प्रथमतः सर्व ग्रामस्थ, विविध विभागांचे पदाधिकारी/कर्मचारी यांच्या विशेष सभा घेतल्या. सर्व कर्मचा-यांनी याबाबत उत्साह दाखवत गाव जलयुक्त करण्याचा नेिश्र्धार केला. तद्नंतर गट विकास अधिकारी श्री. निलेश काळे यांनी नाईकबोमवार्डी गावचे ग्रामस्थ आणि लघुपाटबंधारे /कृषि विभागांच्या कर्मचा-यांसह संपूर्ण गावाच्या परिसराचे पाहूणी करून कामाचा सूक्ष्म आराखडा त्याचसोबत गावाचा सामाजिक आराखडा सुध्दा तयार केला. या योजनेचे महत्व लक्षात घेऊन तातमगिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री. रणजितसिंहू नाईक निंबाळकर यांनीही देवस्थानच्या जमिनीवर जलयुक्त शिवारचे काम करण्यास अनुमती दिली. आणि सुरु झालं जलयुक्त शिवाराचे कामकाज. यानंतर ही योजना मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साो यांना सांगितल्यावर त्यांनीही या योजनेचे कौतुक करून विविध कामासाठी आवश्यक असणारी पोकलेन मशीन दिली. त्यामुळे जवळपास १.५ महिने

खोल सलग समतल चराचे (सीसीटी) ७ooo मीटरहून अधिक काम झाले. तसेच १ तलावातील गाळ काढला. फलटण पंचायत समितीतील सर्व कर्मचारी व शिक्षक, ग्रामसेवक हे गट तयार करून दर रवेिवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत उत्साहाने येऊ लागले. ओस वाटणारे डोंगर माणसांनी गजबजून गेले. गावामध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

श्रमदानातून १६५ दगडीबांध पूर्ण झाले

लहानथोर मंडळींनीही यामध्ये हिरिरीने भाग घेतला. कारण सर्वांनाच याचे महत्व पटले होते. डोंगर लुताराला ज्या ठिकाणी मशीनद्वारे काम करणे शक्य नव्हते, त्या ठिकाणी श्रमदानातून सलग समतल चर खोदले. तसेच परिसरात उपलब्ध असलेल्या दगडापासून जवळपास १६५ दगडीबांध पूर्ण झालेले आहेत. या योजनेसाठी सर्वांनीच अतिशय उत्साहाने एकही रविवार न चुकवता हे काम सातत्याने सुरू ठेवले हे विशेष. दरवर्षी मार्चपासून या गावाला टँकरची मागणी असायची. परंतु मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने सलग समतल चर पाण्याने भरुन गेले. त्यामुळे गावातील विहिरींची पाण्याची पातळी सुध्दा वाढली आणि सन २०१५ मध्ये दरवर्षी लागणा-या टँकरची गावाला गरजच पडली नाही. या सर्व कामांची पाहूणी करण्यासाठी गावाला विविध पदाधिकारी, मा.जि.प.अध्यक्ष मा मुख्य कार्यकारी अधिकारी उप मुका.अ.तसेच विविध  गावचे ग्रामस्थ यांनी भेटी देवून या योजनेबाबत समाधान व्यक्त केले.

योजनेच्या पुढच्या टप्प्यामध्ये हलक्या जमिनीत वाढ्णा-या स्टायली गवताचे फुले-क्रांती हे वाण महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथून उपलब्ध केले असून सर्व समतल चरावर (सीसीटी) लावण्याचे नियोजन आहे. तसेच संपूर्ण डोंगरउतारावर करंज, खैर, बाभूळ, कडूलिंब यांसारख्या १४ हजार वृक्षांची लागवड केली आहे.

सध्यस्थितीमध्ये गावातील तीन पाझर तलावातील गाळ काष्ठ्ठल्याने पाणीसाठ्य़ात वाढ झाल्याने विहिरींची पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे सध्या गावामध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. तसेच या वर्षात गावाला टँकरची आवश्यकता भासली नाही. 'थेंब थेंब वाचवूया, गाव जलयुक्त शिवार बनवूया’ या ध्येयाने प्रेरित होऊन ग्रामस्थांनी गावच्या परिसरात चराईबंदी लागू केली आहे. जनावरांसाठी गवत कापूनच वापरायचे आणि कमी पाण्यावर येणारी पिके (कांदा, ज्वारी, कापूस, गहू, फळबागा) ठिबक सिंचनाच्या माध्यमातून घेण्याचा निर्धार सर्व ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate