অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

'दुर्मिळ' ते तून 'मुबलक' ते कडे.

'दुर्मिळ' ते तून 'मुबलक' ते कडे.

एका गरीब तहानलेल्या माणसाची तहान शमविण्याइतके सुद्धा पाणी मिळाले नाही तेव्हापासून 'कृष्णा देहारिया' गावाचे नाव जलस्रोत होते. १९४२ मध्ये मोठा दुष्काळ पडला आणि तेव्हापासून या गावात पाण्याची चणचण वाढली. पुढे २०१० पर्यंत अवस्था बिघडतच राहिली. बहुतेक सर्व शेती पावसाच्या पाण्यावर लागल्या, चढउताराची जमीन इत्यादी कारणांनी पिण्याच्या व शेतीसाठी लागणा-या पाण्याची दुर्मिळता वाढतच गेली. महिलांना १-२ किलोमीटर पिण्याचे पाणी आणावे लागत होते.या गावात १२७ कुटुंबे राहतात व एकूण क्षेत्रफळ ५३२ हेक्टर आहे. यापैकी केवळ २५ हेक्ट्र जमीन चार छोट्या तलावावर शेतकरी रब्बीची पिके घेऊ शकत नव्हते. या कालावधीत गावकरी कामधंद्यासाठी बाजूचे जिल्हे व इतर राज्यामध्ये स्थलांतर करत होते.

पुढाकार

सन २०११-१२ मध्ये 'रिलायन्स फाउंडेशन'च्या रुरल ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्रॅम' अंतर्गत स्थानिक लोकांच्या सहयोगाने कामाची सुरुवात झाली. एकात्मिक, स्वावलंबी व ग्रामीण विकासाचे शाश्वत मॉडेल निर्माण करण्याच्या हेतूने ही सुरुवात झाली. या पुढाकारामध्ये प्रथम स्थानिक पातळीवर लोकांच्या संस्थांची उभारणी, बांधणी यावर भर दिला गेला. कारण लोक एकत्र येऊन काही करतील तर त्याला एक भक्कम आधार तयार होतो. त्यामुळे लोक कोणतेही विकासाचे काम हाती घेऊन शेतीसाठी पाण्याची गरज अति महत्वाची. पाण्याची सुरक्षितता शेतकरी मंडळाने रिलायन्स फाउंडेशनच्या मदतीने जलसंधारण व मृदसंधारणाची कामे हाती घेतली. परिस्थितीचे अवलोकन करून वैयक्तिक कुटुंब पातळीवर, शेतावर व एकंदर गाव पातळीवर मृद व जलसंधारणाचे सर्वसमावेशक नियोजन तयार केले.

सामूहिक पाणी वापर

गावक-याच्या ध्यानात आले की, जास्तीत जास्त जमीन पाण्याखाली आणण्याच्या हेतूने व पाण्याची सुरक्षितता कायम राखण्याच्या दृष्टीने गावातील जुना कसाई डेहारिया तलावाचा गाळ काढणे आवश्यक आहे. तो काढलेला तलावाचा गाळ म्हणजे उत्तम प्रतिची माती असल्याने पडीक जमिनीवर पसरला. त्यामुळे गावातील ७७ शेतक-याची सुमारे ५७ हेक्टर जमीन पिकाखाली आणणे शक्य झाले.गावात पाणी वाटप गट स्थापन केला. अनौपचारिकरीत्या या गटाची घटना, कृती, कामे, अधिकार, नियमावली बनवून एकंदर पाण्याच्या उत्तम व्यवस्थापनासाठी या पाणी वाटप गटाचे नियंत्रण निर्माण केले. यामुळे पाणी वापर, वाटप इत्यादीमध्ये वेगळीच परिणामकारकता निर्माण झाली. सुमारे १ लाख मे. टन इतका गाळ कसाई देहारिया या तलावातून काढण्यात आला. ज्याच्यामुळे पाणीसाठा वाढला व अत्यावश्यक वेळेला पिकांना पाणी देणे सुलभ झाले. या वाढीव पाणी साठ्यामुळे शेतक-यांना खरिपासोबत रब्बी हंगामातील पिके घेणे सोयीचे झाले. त्यामुळे अगोदर २७ हेक्टर जमिनीला पाणी मिळत होते ते आता वाढून २४२ हेक्टर जमिनीला सिंचित करणे शक्य झाले.

शेतातील जलसंधारण

जलसंधारणाचे विविध उपक्रम २४२ हेक्टर शेतावर राबविले गेले. जसे - बांधबंदिस्ती, द्वारे माती व जलसंधारण साधण्याचे प्रयत्न केले. सुमारे ३७ शेततळी बांधण्यात आली. ज्यामुळे संरक्षित सिंचन शक्य झाले. धुन्यावर/बांधावर वृक्ष लागवड केली गेली ज्याच्यामुळे जैवविविधता व परागीकरणास फायदा झाला. यामुळे जमिनीचा पोत सुधारला, जैविक काडीकचरा मातीमध्ये मुरला आणि जमिनीची उत्पादकता वाढली. काही शेतक-यांना निव्वळ नफा ५४०० रुपये प्रति हेक्टरवरून ३९,००० रुपये प्रति हेक्टर एवढा वाढला.गावात बाहेरून आलेल्या वाटसरूला पाण्याचा तुटवडा असल्याने पिण्याचे पाणी नाकारले. त्यामुळे कृष्णा दहेरियाचे नाव 'कसाई दहेरिया' पडले होते.

घरगुती वापराच्या पाण्याचे संधारण

उन्हाळ्यामध्ये लहान मुले व महिलांना पाणी आणण्यासाठी खूप लांबवर चालत जावे लागायचे. दूधपुरा गावातील १.७ कि.मी. दूर असलेल्या कुमार पिपलिया तलावातील पाण्याच्या उपलब्धतेचे विश्लेषण करता कसाई देहरिया या ग्रामस्थानी त्यांच्या गावातील सामूहिक विहिरी त्या तलावाशी पाईपलाईनद्वारे जोडण्याचा संकल्प केला. ग्राम शेतकरी मंडळाने पाईपचा खर्च उचलला तर सर्व श्रमदान ग्रामस्थानी केले. अशा प्रकारे पिण्याचे व घरगुती वापराच्या पाण्याची सोय करून घेतली. त्यामुळे मुले व महिला गावातील सामूहिक विहिरीतील उपलब्ध पाण्याचा उपयोग करून महिलांनी रिलायन्स न्युट्रोशन गार्डन (परसबागेतील भाजीपाला) तयार केला. यामुळे प्रत्येक कुटुंबामध्ये ताजा व सकस असा भाजीपाला उपलब्ध झाला. काही कालावधीनंतर ग्रामस्थानी आपले गाव सरकी नळ जलयोजनेखाली जोडले. प्रत्येक घरामध्ये पिण्याच्या पाण्याचा नळ मिळाला.

बदलाचे मॉडेल

गाव पातळीवर ग्राम शेतकरी मंडळाच्या रुपात भक्कम लोक संघटना उभी झाल्यामुळे पाण्याच्या स्रोताचे बळकटीकरण करता आले. अति सक्षम पाणी वापर व पाणी संधारणाच्या पद्धती वापरल्याने गावक-यांनी त्यांच्या सद्दाच्या पाण्याच्या गरजा भागवल्याच पण भविष्यातील पाण्याची चिंता देखील दूर केली ती ही पर्यावरण सुसंगत राहून. पिकाची व उत्पत्राची वाढ यासोबतच सामाजिक बाजूने बरेच बदल गावामध्ये घडून आले. पूर्वी ज्या मुली कुटुंबासाठी पाणी दूरवरून आणण्याच्या कामात गुंतलेल्या असायच्या त्या आता शाळेत येऊ लागल्या. एवढेच नव्हे तर ग्रामस्थानी आपल्या गावाचे नाव कसाई दहेरिया सोडून कृष्णा दहेरिया असे नावच बदलले. त्यांनी रेव्हेन्यू रेकॉर्डमध्ये पण गावाचे नाव बदलावे म्हणून जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. हि प्रक्रिया सुरु आहे.

स्त्रोत - लिजा इंडिया
 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate