सध्याच्या शेती व्यवसायात शेती हे निसर्गातील विविध तत्वांवर आधारित आहे. या आजची सेंद्रिय शेतीही पारंपारिक मुलतत्वांवर आधारलेली आहे. शेतात वापरण्यात येणारे सर्व प्रकारचे सेंद्रिय पदार्थ हे त्याच शेतीवर तयार केल्या जातात. त्याकरिता काही कचरा, पालापाचोळा, तण, जनावरांचे मुलमुत्र हे शेतात कुजवून व त्यामध्ये वाढ करून सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते. म्हणून ह्यामुळे शेतकऱ्याचे मुख्य पीक येण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते.
सध्या शेती व्यवसायात रासायनिक खते कीटकनाशके याचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांचा अवाजवी वापरामुळे निसर्गातील मुलभूत साधन-संपत्ती घटकांच्या गुणात्मक दर्जावर विपरीत परिणाम होतो. शेती मोठ्या प्रमाणात होत आहे. जमिनीतील अन्नद्रव्यांचा ह्रास होणे. माती आणि पाण्याचे प्रदूषण होणे. जमिनीतील उपयुक्त जीवाणूचे प्रमाण व त्याची विविधातेचा ह्रास होणे. यामुळे पारंपारिक पद्धतीने शेती केली पाहिजे. सेंद्रिय शेती हि पारंपारिक पीक पद्धतीवर असल्यामुळे भविष्यात येणाऱ्या संकटांवर एकमात्र उपाय सेंद्रिय शेती आहे. पारंपारिक पद्धतीने शेतकऱ्याने ती स्वतःच उत्पादन केले तर त्यांचा संगोपन व कष्ट ही मोठ्या प्रमाणत घ्यावे लागतील. आपल्या शेतीत कोणत्याही पीक उत्पादन चांगले मिळवण्यासाठी त्या पिकांची पेरणी एक ठराविक दिवशीच व्हायला पाहिजे.
शेतीमध्ये हिरवळीच्या पिकांची पेरणी करून ती जमिनीत गाडली तर त्याचे विघटन होऊन त्या जगावर पीक हे मोठ्या प्रमाणत फायदा होतो.
माहीतीदाता - हिले रघुनाथ अशोक (गोदोशी )
अंतिम सुधारित : 6/25/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...