অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पिकांची जैवविविधता

पिकांची जैवविविधता

भारताच्या दख्खन प्रदेशात 60,000 महीला शेतकरी जैवविविध पध्दतीची शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, त्यांचा स्वाभिमान आणि संस्कृती जतन करतात. त्याबाबतचे त्यांचे ज्ञान व जागतीक पातळीवर त्याला मान्यता मिळाल्याचे दिसते आहे.

ही 2003 ची गोष्ट आहे. भारताच्य़ा आंध्रप्रदेश राज्यातील एका झोपडी वजा घरामध्ये लहान शेतक-यांच्या कुंटुंबातील सुमारे 50 महीला दिडगी गावात एकत्र आलेल्या आहेत. विडीयोवर वरिष्ठ शेती तज्ञांशी समोरा समोर चर्चा करीत आहेत. सम्माम्मा (महीला शेतकरी) आपल्या 3 एकर शेतीमध्ये कोरडवाहु परिस्थितीमध्ये विविध प्रकारच्या 96 पिकांचे उत्पादन कसे घेते व त्यामध्ये जैवविविधतेचे तिच्यासाठी काय महत्व आहे ते वीस्ताराने सांगते आहे. एवढ्यात दुस-या बाजुने एक वरिष्ठ शास्त्रज्ञ तिला थांबवतात. ‘नाही नाही! तुम्ही जैवविविधतेची काळजी करु नका. ते आम्हा शास्त्रज्ञांचे काम आहे. आणि आम्ही तुम्हाला बियाणे सुचवू “.

अद्यापही बहुतांश वैज्ञानिकांचा असा समज आहे की शेतीविषयक शास्त्र व ज्ञान हे केवळ त्यांनाच माहीती आहे. आणि कृषि पध्दती, पीके, मशागती इ बाबतच्या चर्चामध्ये लहान शेतकरी विशेषतः महीला शेतक-यानी मध्ये भागच घेऊ नये. पण दख्खनच्या या महीलांनी त्यांची ही समज अनेक बाजुने चुकीची ठरवुन दिली.

महीला एक दुर्बल घटक असुनही लहान शेतीची मुलतत्वे व जैवविविधता शेती प्रणारलीला चिकटुन राहील्यामुळे त्यांच्या जीवणात प्रचंड बदल निर्माण झाला.

जैवविविध कृषिप्रणाली

दिडगी गावातील महीला शेतक-यांनी अति उत्तम जैवविविध कृषी प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणाली असिंचित शेतावर होते, दोन एकरापेक्षा कमी क्षेत्र व फार सुपीक नसलेल्या जमिनीमध्ये राबवता येते. पुर्णपणे अरासायनीक पध्दतीने करता येते, अगदी छोटय़ाशा जमिनीच्या तुकडय़ावर 12ते 23 प्रकारची पीके एकत्र घेतली जातात.हि शेती प्रणाली राबवणाऱ्या बाजारातून आपलं अन्नधान्य विकत आणावे लागत नाही. दख्खनच्या लहान शेतकरी महीला तर बीज साठवणुक करणाच्या महिला आहेत. त्या फक्त बीज सवर्धनच करीत नाहीत तर पेरणीच्य़ा वेळी कोणकोणत्या पिंकांची मिश्रखत्र पेरणी करायची हे ठरवतात.

हे खरेतर परस्पर पुरक आहे. म्हणजे या महीलांच्या शेती करण्याच्या पध्दतीमुळे जैवविविध कृषिप्रणाली उभी राहते व जैवविविधता शेती पध्दतीमुळे महीलांना त्यांच्या पध्दतीने शेती करता येते. या महीलांना जैवविविध इतकी महत्वाची का वाटते? कृषिखात्याने सांगीतल्यानुसार एक किंवा दोन पिके घेण्यास त्यांचा काय व आक्षेप आहे? हया महीला पिवळी ज्वारी खास करुन पिकवु इच्छितात जी कृषी मुद्दाम दुर्लक्षित केलेली आहेत . शास्त्रज्ञांच्या मते ह्या पिकांना बाजारभाव कमी आहे. परंतु दलित महीलांना हे माहीती आहे की पिवळी ज्वारी म्हणजे सकस अन्म , चांगला चारा , साध्या मातीत, बीन पाण्याचे पीक त्याची धांट कुपंनीसाठी, घराचे कुड (भिंती) बनवण्यासाठी वापरता येतात. असे अनेक फायदे या पिवळया ज्वारीचे आहेत. हे सगळे उपयोग /वापर, फायदे हया राहण्याची आवश्यकता नाही. अशा पिंकाला या महीलांनी एवढे महत्व देणे याचा अर्थ या महीलांची कृषि व अन्न हयाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी आहे हे जाणवते.

अन्नाच्या पलिकडचे

विशेषतः लहान शेतकरी कुटुंबातील व दलित समाजातील गरीब महीलासाठी शेती संस्कृती व जैवविविधतेच्या तत्वांना चिकटुन राहणे हे त्यांना अत्यंत गरजेचे वाटते. नाहीतर आज आपण शेतकरी आत्महत्या पाहतो हया विशेषतः अशा स्तरातील आहेत की जे शेतकरी व्यापारी पध्दतीने बाजारावर नजर ठेवुन महागडे बीयाने, महागडे औषधे , रसायने वापरतात. व एकच प्रकारचे नगदी पीक घेण्याकडे त्यांचा कल असतो. परंतु या लहान महीला शेतकरी ज्या जैवविविध पध्दतीची कृषी प्रणाली अवलंबवितात त्याच्यामध्ये शेतकरी आत्महत्या होताना दिसत नाही. कृषि जैवविविधता हा त्यांच्या परंपरेचा भाग तर आहेच पण सोपा व शेती करण्याचा सरळ तार्किक मार्ग आहे. त्यांना पूर्ण जाणीव आहे कि वातावरण बदलाला सामोरे जाण्यासाठी जैवविविध प्रणाली त्यांच्या साठी सुरक्षा कवच आहे. एवढेच नव्हे तर जी पिके शेतात घेतली जातात त्यातुन त्यांच्या घरची अज्ञसंस्कृती झळकते व स्वयंपाक घरात शिजणार अन्न आणि शेतातील पीक यामधील नात अगदी ठळकपणे पहावयास मिळते . उदा. ज्वारीपासून बनवलेले पदार्थ तुर इाळी पासून बनवलेल्या पदार्थाबरोबर खाल्ले जातात तर शेतीमध्ये ज्वारी व तुरीचे पीक सोबतच वाढत असते. 'हे शेत ते स्वयंपाक घर' मॉडेल चा ख-या अर्थाने गेल्या अनेक शतपासून त्यांच्या शेतावर जैवविविधता जीवंत ठेवण्यास कारणीभुत ठरले आहे. खंर तर या पुर्ण प्रक्रियेमध्ये महीलाच्या वाटय़ाला अनेक कामे जात असल्याने त्याच हया परंपरेचे वाहक आहेत असं म्हणणे योग्य आहे. जैवविविध शेती केवळ भौतीक जीवन फुलवते असे नसुन नैतीक आत्मिक व पर्यावरणीय अंगांनी जीवन परिपुर्ण होते. येथील लोक जैवविविधता आपल्या धार्मीक सणातुन साजरी करतात.

अन धोरणाचे नवे रुप

जसे भारता मध्ये ठराविक पिंकांनाच फार प्राधान्य दिले जात आहे. आणि हे सरकारी धोरण आहे. अनादी कालापासुन आपल्या देशात स्थानिक अशी विविध भरडधान्य व कडधान्ये पिकतात व ती पिकेंच त्या प्रदेशातल्या लोकांचे प्रमुख अन्न होते. पण ही पिके मात्र दुर्लक्षित केली आहेत. सन 2013 मध्ये सरकारने अशा अन्नधान्याचे महत्व पहील्यांदाच मान्य केले असे वाटते कारण त्या धान्यांचा उल्लेख राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदयामध्ये केला आहे. डेक्कन डेवलपमेंट सोसायठी आणि मिलेट नेटवर्क ऑफ इंडिंग्रा यानी दशकापेक्षा जास्त काळ या बाबत संघर्ष केला. त्याचे फलीत झाले आणि भरडधान्ये आता मान्यतेनुसार आपल्या देशातील सार्वजनीक अन्न व्यवस्थेमध्ये आंतर्भूत झाले. हा आनंद फक्त केवळ नेटवर्क व डेक्कन सोसायटीचा नसुन त्या महीलांचा आहे. ज्यानी हा वारसा सातत्याने जतन केला आहे. त्यानी रेडिंग्रो व छोटय़ा चित्रफितींचा वापर करुन सर्वापर्यंत ही यशोगाथा पोहोचवेली. आग्रही प्रणा व विचारांचा पक्केपणा या आधारावर त्यांच्या सामाजिक, आर्थिक लिंगंभेदामुळे निर्माण झालेल्या दुर्बलतेवर या महीलांनी विजय मिळवला आणि राष्ट्रीय पातळीवर अन्नधान्य धोरणाला एक नवे रुप दिले. इतकेच नव्हे तर हा संदेश आम्ही सर्व जे भरइधान्याला इतके महत्व देतो 2013 मध्ये हे विचार आफ्रिकेपर्यंत घेऊन गेलो. कारण या भरडधान्याचा खरा उगम हा आफ्रिकेतला आहे. तेथील लोकंना ते जाणवून दिले व तेथे पण ही चळवळ सुरु केली. आता तर भारत व आफ्रिका या दोन खंडात भरइ धान्याच्या प्रोत्साहनासाठी परस्परामध्ये एक नेटवर्क उभे राहीले आहे. एंगलागट्टी पूनम हा हिवाळ्यात साजरा होणार सण. त्यावेळी काढणीला जणुकाही हे सांगण्यासाठी की बघा माझ्या शेतामध्ये एकाच वेळी काय काय पिंकत आहे. अशा पिकांना महिला पैशापेक्षाही जास्त साभांळतात व जपतात.आणि म्हणुनच त्यांचे बीयाणे विकले जात नाही आणि खरेदी पण केले जात नाही.तर ते एकमेकाला वाटले जाते.

सांगाद्याला अभिमान वाटतो

डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटी हि तळागाळात काम करणारी एक स्वयंसेवी संस्था, लहान महिला शेतकरी, ज्या आर्थिक सामाजिक दृष्टया दुर्बल होत्या, यांचे शेती बाबतचे ज्ञान गेल्या 25 वर्षापासून सर्वापर्यंत पोहोचवण्याचे कार्य डी.डी.एस करीत आहे. हया भागातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकातील, दलित महीला हे त्यांचे ज्ञान इतरापर्यंत पोहोचवण्यासाठी शेकडो वेळा पेरु, कबोंडिया अशा देशामध्ये जावुन आल्या आहेत. हे ज्ञान त्यांनी केवळ तेथील शेतक-यांना नव्हे तर शास्त्रज्ञ व धोरण बनवणारया देख्रिल दिंले

आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्मोठ्या परिषदांमध्ये या महीलाना अनेकानी ऐकले आहे. 2003 मध्ये  कॅनडा येथील हिंक्टोरिया मध्ये जागतिक जैविक परिषदेमध्ये या महीलांनी मांडणी केली. या मधील अनेकानी या महीलाच्या ज्ञानाचे व मांडणीचे आश्चर्य व कौतुक केले. या अनुभवातुन निर्माण झालेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आता या महीला फिरते जैवविविध सण साजरे करु लागल्या. 1998 पासून अगदी दरवर्षी एका महीन्यात किंमान 50 गावात ह्या महीला पोहेचतात व लोकंना अनेक बार्बींचे शिक्षण आपल्या स्वानुभवातुन देतात. त्या मध्ये प्रामुख्याने पर्यावरणीय शेती संकल्पना व त्याचे फायदे, बीयाणावर आपल नियंत्रण, जैविक शेतमालाची बाजारपेठ, शेतकरी व माती याचॆं विषयावर चर्चा केल्या जातात. आतापर्यंत या महीला सुमारे 1,50,000 शेतक-यापर्यंत पोहोचल्या. या भागातील पारंपारीक बीयाणे व पिंके त्यांना दाखविली. भारत सरकारने हे ओळखले व मान्यही  केले की हे जैवविविधता मेळावे लोकांच्या संस्कृतीचा अत्यंत महत्वाचा भाग आहेत.

जागतिक मान्यता

2003 मध्ये ज्या महीलांना कृषि वैज्ञानिकांनी बोलु दिले नव्हते त्या महीलांच्या जैवविविधतेच्या ज्ञानाला, अनुभवाला मात्र आता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळत आहे. अंजमा नावाची 55 वर्षांची लहान शेतकरी महीला कधीही शाळेत गेली नाही. तिला लिहीता वाचता येत नाही पण ती अधिकारी कृषि वैज्ञानीक स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, वृत्तपत्र व वृतवाहीन्यांचे प्रतिनिधी अगदी नियमीतपणे या भागात भेटी देत असतात. या महीलांची शेती, पीके, बीयाणे पाहण्यासाठी व शिकण्यासाठी अनेक वेळा वृत्तपत्रातुन व टी.व्ही चॅनलवरुन त्यांच्या बातम्या प्रसारीत होतात. या भागातील सुमारे 50,000 हेक्टर जमिनीवर ज्या पध्दतीने पीके घेतली जात. या भागात आहेत त्या राष्ट्रीय जैवविविधता मंडळाच्या विचाराधीन आहे. असे हे भारतातले एकमेव उदाहरण आहे. आंतरराष्ट्रीय जैविक विविधता परिषदेने हे ठरवले आहे की अशा क्षेत्रांचा व प्रयोगांचा सन्मान करायचा की जेणे करुन या प्रयोगाना मोठया प्रमाणावर पसरवता येईल. या मध्ये अशा प्रयोगांना, क्षेत्राला राष्ट्रीय उधानाचा दर्जा निर्माण करुन देणे , संरंक्षिण करणे, विशेष दर्जाच्या सुविधा पुरवणे व तेथील शेतक-यांना वेगवेगळे लाभ व सुविधा पुरवणे यांचा समावेश असेल. यातुन एक भक्कम संदेश सर्वत्र पसरवल्या जाईल की भारत सरकार अशा वंचित लहान शेतक-यांना सहयोग देते व त्यांनी जैवविविधते साठी केलेल्या

पिंकातुन बीयाणाची निवड करणे हे गुप्तांगुर्तीचे काम असते. ते बंसतपूर नरसामाया महीला शेतकरीला अवगत आहे.
योगदानाची गांभीर्याने दखल घेते. या सर्वाकडे तुम्ही कसे बघता असा महीलांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा महाबतपुर स्वरुपा ही महीला शेतकरी म्हणाली “आम्हाला कोणत्याही प्रकारे आर्थिक फायदयामध्ये रस नाही पण आमच्या योगदानाची सरकारी मान्यता म्हणजे आमच्यासाठी गौरव आहे.

महीलांची ताकत

हया सर्व प्रक्रियेमधुन या महीलामध्ये स्वतःमधील मोठेपणाची जाणीव निर्माण झाली आहे. त्यातुन निर्माण झालेला आत्मविश्वास खासीमपुट्ट गावातील परम्मा या महीलेने एकदा सरकारी अधिका-यांना जे सुनावले त्यातून परिचित होतो. त्या म्हणाल्या 'दरमहा तुम्हाला पगार मिळतो पैशाने तुमचा खिसा भरतो. पण मी माझा घर बीयाणाने भरले आहे. काय  माझी बरोबरी करु शकता?"

सर्वसामान्यपणे महीलांना आपल्या समाजात मिळणारे दुय्यम स्थान हे आता या महीलांसाठी खोटे ठरले आणि ते केवळ त्यांनी निर्माण केलेल्या व जतन केलेल्या जैवविविध कृषि प्रणालीमुळे यामुळे त्यांना एक असे वरदान मिळाले की अखंड देशभरात या महीलांना ‘महीला' म्हणून मिळणारे दुय्यम स्थान समूळ हया महीलांना शेतीच्या व पीकांच्या बाबती विचारल्या शिवाय, सल्ला घेतल्याशिवाय या भागात शेती केली जात नाही. कुटुंबाच्या शेतीमध्ये त्यांच्या मताला व निर्णयाला महत्वाचे स्थान आहे. चिलमामौदी लक्ष्ममा आपल्या पतीसोबत 3 एकर शेतीत दरवर्षी डझनभर वेगवेगळी पीके घेऊन शेती करत र्बियाणे वापरुन जास्त पीके उत्पादन करावे व एक प्रगतीशील शेतकरी बनावे. पण त्याला वाटले प्रथम आपल्या पत्नीचा  सल्ला घ्यावा. धाडस एकवटुन त्याने तसे एकदा तिला विचारले. पण ती त्याच्यावर कडाडली.' तुम्हाला वेड तर नाही लागले? आपल्याला हायब्रीड बीयाणे, एकच पीक कशासाठी पाहीजे? आता आपण जे पिकवतो त्यामध्ये तुम्ही समाधानी नाही?” आणि मग त्यांनी तो विषयच सोडला. या सारख्या हुशार व जागरुक महीलांना त्यांनी मिळवलेल्या विभागातील मान्यतामुळे त्यांच्या पतीकडून मानाची व आदराची वागणुक मीळते.

 

स्रोत - लिजा इंडिया© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate