অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बटाट्याची फायद्याची करार शेती

बार्शीटाकळी व तेल्हारा जि. अकोला तालुका प्रयोगशील शेतक-यांचा म्हणून ओळखला जातो. तालुका आणि परिसरातील शेतकरी नवनवीन संकल्पना व बदल स्वीकारून शेतीत नेहमी काहीतरी प्रयोग करण्याचा सोयाबीन, उडीद, गहू व हरभरा इ. पिके घेतात. परंतु, वारंवार तेच पीक व आर्थिक निकड भागविण्याच्या हेतूने उत्पादित मालाची एकाच वेळी आवक झाल्यामुळे बाजारभाव कोसळतात.

करार शेतीची सुरवात

यालाच अनुसरून प्रकल्पामार्फत जिल्ह्यामधील शेतकरी वर्गातून बटाटापिकाची करार शेती सुरू झाली. करार शेतीच्या माध्यमातून नवी ऊर्मी देण्याचे व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम रब्बी २०१४-१५ मध्ये आधुनिक बटाटापीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून केले आहे. बाशिंटाकळी तालुक्यातील मोरेश्वर भाजीपाला उत्पादक गट, सिंदखेड व तेल्हारा तालुक्यांतील संत वासुदेवजी महाराज शेतमाल उत्पादक गट, हिंगणी खुर्द या दोन गटांमार्फत एकूण ३० एकरांवर हा प्रयोग साकारण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये नियमित बटाटावाणाचा वापर न करता प्रक्रिया उद्योगामधील वेफर्स (बटाटा चिप्प्स) साठीच्या वाणाचे उत्पादन घेण्यात आले. यासाठी पुण्याच्या सिद्धिविनायक अॅग्री प्रोसेसिंग या कंपनीशी करार करण्यात आला. जिल्ह्यातील हा पहिलाच अभिनव प्रयोग आहे.

कृषि विज्ञान केंद्र, अकोला व सिद्धिविनायक कंपनी यांच्यामार्फत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पामार्फत अनुदान कृषि नििवष्ठा स्वरूपात (बटाटा बेणे, जिवाणुसंवर्धक व बीजप्रक्रिया विद्राव्य खते, सूक्ष्म मूलद्रव्ये, बुरशीनाशके व किड नियंत्रण औषधी) व तांत्रिक सल्ला, बीजप्रक्रिया, एकरी रोपांची गुणवत्ता आणि अधिक उत्पादन याविषयी माहिती देण्यात आली.

चिप्सोना वाणाची निवड

कंत्राटी शेती अधिक फायदेशीर होण्यासाठी चिप्सोना या वाणाची निवड केली. हा वाण प्रामुख्याने पंजाब राज्यामधून आयात करण्यात आला. वेळेवर पूर्व मशागत, वेळेवर लागवड, योग्य लागवड पद्धत, संतुलित खतांचा वापर, पाण्याचे योग्य नियोजन, पीक संरक्षण उपाय, योग्य वेळी काढणी, हाताळणी, साठवण आणि वाहतूक करणे गरजेचे असते.

लागवडीपासून काढणीपर्यंत ९० ते ९५ दिवसांमध्ये होत असल्याने शेतही लवकर मोकळे होऊन दुस-या पिकासाठी वापरता येते. हे उद्दिष्ट ठेवून प्रकल्पामार्फत गहूया पिकाला पर्याय म्हणून बटाटापीक प्रयोग करार शेतीच्या माध्यमातून उत्तमरीत्या यशस्वी केलेला आहे.

विद्यापीठाचे सहकार्य : डॉ. गजानन तुपकर, शास्त्रज्ञ उद्यानवेता,

कृषी विज्ञान केंद्र , अकोला यांची जिल्ह्यामध्ये  नवीन पिकाची नांदी व बाजाराभिमुख पीक उत्पादन याविषयी सखोल मार्गदर्शन देण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका होती.

अधिका-यांच्या भेटी

प्रकल्प संचालक, (आत्मा) अकोला श्री. अशोक बाणखेले व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. प्रमोद लहाळे तसेच प्रकल्प उपसंचालक श्री. कुरबान तडवी यांनी शेतक-यांना केलेले मार्गदर्शन व प्रोत्साहन यांमुळे कार्यक्रमाच्या कार्यान्वयाला अधिक गती आली.

अर्थशास्त्र प्रतिएकर बटाटा क्षेत्र

बियाणे, खते, पाणी, जमीन तयार करणे,

पेरणी, मजूर, काढणी, वाहतूक              35. 3о, ооо/—

सरासरी उत्पादन एकरी                  ११ ते ११.५ टन

शेतक-यांना मिळणारा दर                ८ प्रति किलो

एकूण उत्पन्न/एकर                      रू. ९२000/-

निव्वळ नफा (१ एकर क्षेत्र)                   रु.. ६२000/-

बटाटा व गहू पिकांचे प्रात्यक्षिकदृष्ट्या काढलेले अर्थशास्त्र

प्रकल्प राबविण्यापूर्वी -              गहू

सरासरी उत्पादन                    १५ क्रि./एकर

एकूण उत्पादन (३० एकर)              ४५0 क्रेि,

बाजारभाव                           १,७00 रु./क्कि,

एकूण उत्पादन                      ३४५ टन (३० एकर )

कराराप्रमाणे कंपनी खरेदी किमत         रु .८/-प्रतिकिलो

एकूण मिळकत - (३० एकर)             रु. २७.६० ७.६५ लाख रु.

प्रकल्प राबविल्या नंतर - बटाटा

एकरी झाडाची संख्या                   २२,000 ते २२,५00

अंतर                                 ६८ इंच

सरासरी प्रतिझाड़ कद                   o.५ किलो / झाड

सरासरी उत्पादन                       ११ ते ११.५ टन/एकर

एकूण उत्पादन                          ३४५ टन (३0 एकर)

कराराप्रमाणे कंपनी खरेदी किंमत              रु. ८/– प्रतिकिलो

मिळकत प्रतिएकर                          रु. ९२,000/-

एकूण मिळकत-(३० एकर)                   रु. २७.६0 लाख

'आत्मा'मधील महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पामुळे शेतकरी गटाला रु. १९.९५ लाखांची आर्थिक अतिरिक्त भर पडलेली आहे. बार्शीटाकळी या तालुक्यातील सिंदखेड व तेल्हारा तालुक्यातील हिंगणी

खुर्द या गावांतील ३० शेतकरी आज एकजुटीने काम करीत आहेत.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

अंतिम सुधारित : 8/2/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate