অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भाकरवाडीच्या बिजलीताई

भाकरवाडीच्या बिजलीताई

आजकाल प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिलाही स्वतःच्या कतृत्वाने यशाची शिखरे गाठत आहे. त्याला कृषिक्षेत्रही अपवाद राहिलेले नाही; किंबहुना शेतीक्षेत्रात सगळ्यात जास्त वाटा महिलांचा राहिला आहे. भाकरवाडी (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील सौं. बिजली राजेंद्र जाधव या विवाहितेने आपल्या शैतीतील सगळी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने करून आपणही कुठल्या कामात मागे नाही, हे दाखवून दिले आहे.

कोरेगावपासून जवळच वसना नदीच्या तीरावर वसलेले आणि बागायती क्षेत्रात मोड़णारे सुमारे दौड़ हजार लोकवस्तीचे भाकरवाड़ी गाव. येथील राजेंद्र जाधव एफ.वाय.बी.ए.नंतर शैतीची आवड असल्याने शेती करू लागले. त्यांच्याकडे दोन ट्रॅक्टर असून ट्रॅक्टरने परिसरात नांगरणीचा ते व्यवसाय करतात. पत्नी बिजलीसह १४ वर्षांचा मुलगा, वडील, भाऊ, भावजय असा त्यांचा परिवार आज एकत्रितपणे गुप्यार्गांविदाने राहत आहे. स्वतःच्या दीड एकर जमिनीसह इतरांची आठ एकर जमीन तें खड़ाने व चाटचाने तें करतात. पण, राजेंद्र हे ट्रक्टर व्यवसायामुळे सतत बाहेरगावी असल्याने त्यांची पत्नी बिजली जाधव (वय ३०) या शेतीत कष्टाने, जिद्दीने आधुनिकतेचा वापर करीत आहेत. दह्याचीपर्यंत शिकलेल्या बिजली ताई यांना लहानपणापासूनच शेतीची आवड असली, तरी माहेर गणेशवाडी (किन्हई) येथे जिरायती शेती करता आली नाही. मात्र, लग्र झाल्यावर सासरी पतीच्या सहकार्याने त्यांनी शेतीची सगळी कामे करून वाहने चालवण्याचे ज्ञान संपादन केले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेती


सौ.जाधव या बैलजोडीच्या सहाय्याने कुळवणी, पेरणी, मशागतीसह भांगलणी, पाणी देणे, खत टाकणे, ऊसलागण करण्यापासून ते ऊसतोडणी होईपर्यंत सर्व कामे स्वतः इतर मजुरांना साथीला घेऊन करतात. तसेच ट्रॅक्टरच्या सहाय्याने एखाद्या पुरुषाला लाजवेल अशी नांगरणी, रोटरने फणपाळी, पॉवर टिलरने ऊस फोड़णे अशी कामें तथा सहज़ासहजी करतात, याशिचाय, अशा कामामुळे त्या गावातच नव्हे तर परिसरात धाडसी बिजलीताई म्हणून प्रसिद्ध आहेत.

शेतीमध्ये नवनवीन प्रयोग

शैतीमध्ये सतत नवनवीन प्रयोग करून ऊस, आले, टोमॅटो, भुईमूग, झेंडू, फ्लॉवर, गहू आदी पिके घेत त्या प्रगतिशील शैती करतात. सन २01३ मध्ये त्यांनी २ गाड्या आल्याची लागवड करत त्यातून १८ गाड्या आले काढण्याची किमया स्वकर्तृत्चाने केली आहे. शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा त्या नेहमी प्रयत्न करतात. त्यामुळे आजकाल मुलींना संदेश देताना त्या म्हणतात, की शैतीइतका कशातच फायदा नाही. लग्राच्या वेळी बिजलीताई यांच्या सासरी फक्त एम-८० ही दुचाकी होती; पण शेतीच्या जिवावर दुचाकी, चारचाकी, दोन ट्रॅक्टर, दोन स्वतःच्या पाइपलाइनसह विहिरी, असा लवाजमा आहे.

सौ. जाधव यांचा अनुभव

जीवनातील अविस्मरणीय क्षणाविषयी त्यांना विचारल्यानंतर त्या सांगतात, की २०१३ मध्ये 'लेक वाचवा अभियाना'अंतर्गत कोरेगाव तालुक्यात चित्ररथ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १६ शाळा सहभागी झाल्या होत्या; परंतु फक्त एका शाळेच्या चित्ररथाच्या चालकाचे काम एक स्त्री करत आहे, हे पाहून अनेकजण अवाकू झाले. त्या वेळी अनेक उचशिक्षित स्त्रियांनी माझे कौतुक केले. पुढे मी चालक झालेल्या त्या चित्ररथाचा व विद्यालयाचा या स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. त्या वेळी नगरच्या सुप्रसिद्ध लेखिका सुधा कांकरिया यांनी केलेला माझा सत्कार व पाठीवर दिलेली शाबासकीची थाप आजही मला प्रेरणा देऊन जाते. अशा था बिजलीताईंनी स्वकर्तृत्वावर, जिद्दीने व मेहनतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत केलेली प्रगतशिील शैती व संसारांची प्रगती जिल्ह्यातील नव्हे, तर महाराष्ट्रातील जिद्द व आत्मविश्वास हरविलेल्या महिलांना एक नवी ऊर्जा मिळवून देईल.


स्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate