অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मल्चिंगवरील भुईमुग यशस्वी

आत्मा'अंतर्गत महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प राबविला जातो. या प्रकल्पाच्या माध्यमातून उन्हाळी हगाम २०१४-१५ मध्ये चाळीसगाव (जि. जळगाव) तालुक्यात नावीन्यपूर्ण अशा प्लॅस्टिक आच्छादन तंत्रज्ञानावर आधारित भुईमूग पीक प्रात्यक्षिके 'आत्मा'च्या शेतकरी गटामार्फत राबविण्यात आली. भुईमूग पिकासाठी हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरत असल्याने प्लॅस्टिक मल्चिंग पद्धतीने भुईमूग पिकाची लागवड करण्यासाठी येथील शेतक-यांचा कल वाढला आहे.

पारंपरिक पद्धतीमुळे झाले नुकसान

मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पाभरीने पेरणी केली होती. लागवडीचे दोन ओळींतील अंतर ३0 x 10 सेमी ठेवल्यामुळे हेक्टरीं रॉपांची संख्या ३ लाख ३३ हजार ३३३ एक्ढी परिणाम झाला. या पद्धतीने लागवड केल्यामुळे लागवडीचे अंतर कमीजास्त झाल्यामुळे हेक्टरी झाडांचे प्रमाण २० टक्क्यांनी कमी झाले. तसेच पिकाचा कालावधीदेखील वाढला. त्यामुळे काढणी में महिल्याच्या शेवटच्या आठवड्यात आल्यामुळे पावसामुळे काढणी करण्यात व्यत्यय आला. परिणामी, उत्पादन कमी होऊन उत्पादन खर्चात वाढ झाली.

मल्विंगवर भुईमूग लागवडीचे फायदे

  1. मल्पिंग पेपर्मुले जमिनीचे तापमान ४ तें ५' से ने वाढते, त्यामुळे थंडीमध्येदेखील बियाण्याची उगवण चांगल्या पद्धतीने होते. पाण्याचे बाष्पीभवन कमी झाल्यामुळे पाण्याची व आद्रतेंची बचत झाली. २) खतांची बचत होते व झाडाला अन्नद्रव्य पुरवठा चांगला टोंकण पड़तीने हेक्टरी झाड़ांचीं संख्या नियंत्रित होते.
  2. शेंगा १०-१५ दिवस अगोदर काढणीस येतात; त्यामुळे चारार्देखील चांगल्या प्रतीचा मिळतो.
  3. मल्चिंगवर भुईमूग लागवड केल्यामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा सरासरी दुप्पट उत्पादन मिळते. पिकावर रोग व किंडीचा प्रादुर्भाव कमी होतो. या सर्व कारणांमुळे एकरी 10 छिंटल उत्पादन मिळाले. पावसामुळे भुईमुगाचा चारादेखील खराब झाला.

भुईमुगासाठी मल्चिंग

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, भडगाव व पाचोरा या तालुक्यांमध्ये केळी व कपाशी ही फ्केि मोठ्या प्रमाणात घेतली जातात. केळी व कापसाची काढणी झाल्यानंतर बहुतांश शेतकरी गहू, हरभरा, मका, कांदा व उन्हाळी भुईमूगा या पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. निसर्गाच्या लहरीपणामुळे, अनियमित पाऊस, बाढ़ते तापमान, थडींचा कमी-अधिक कालावधीं व खालावलेली भूजल पातळी यामुळे समस्यामुळे या पिकांच्या उत्पादकर्तेबाबत अनेक आव्हाने उभी आहे.

भुईमूग फिकाच्या बाबतीत थंडीमध्ये लागवड केल्यास उगवण शक्तींवर परिणाम होता, तर उशिरा लागवड केल्यास मॉन्सूनपूर्व पावसामुळे फ्किाचे नुकसान होते. या अडचणींमुळे तालुक्यातील भुईमूग फिकाचे क्षेत्र कमी झाले आहे. देशाची तेलबियांची गरज व भुईमुगास मिळणारा भाव लक्षात घेता, चागलें व्यवस्थापन केल्यास हैं पीक फायर्देशीर असें नगदी पीक ठरू शकतं. अशा परिस्थितीत चाळीसगाव ग्रंथील शेतकरी गटाने आत्मा' कार्यालयाशी संपर्क साधला. त्यावर भुईमुगाला पर्यायी पिकाचा विचार न करता मल्चिंग तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे प्रकल्प संचालक, आत्मा यांनी शेतक-यांना सुचविले.

'आत्मा व कृषि विभागाकडून शेतक-यांना प्रशिक्षण

या वर्षीभुईमूग लागवड करण्यासाठी प्रकल्प संचालक, 'आत्मा' व शास्त्रज्ञांशी चर्चा चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे, रांजणगाव, मुदखेडा आणि खेडी या गावातील शेतकरी गटांची सभा आयोजित केली. गटांच्या बैठका घेऊन त्या गटांशी चर्चा करून भुईमुगासाठी प्लॅस्टिक मल्चिंग, गादीवाफा,

सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाची प्राथमिक माहिती शेतक-यांना दिली. रांजणगाव येथील शेतकरी शास्त्रज्ञ, तेलबिया संशोधन केंद्र व कृषि विभागाच्या अधिका-यांनी मल्विंगवरील भुईमूग लागवड तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले. यानंतर चार २o शेतक-यांनी प्रत्येकी १ एकर याप्रमाणे २o एकर क्षेत्रावर प्लॅस्टिक आच्छादनावर भुईमूग पिकाची लागवड केली.

मल्विंगवर भुईमुगाची यशस्वी लागवड

शेतकरी गटाने जमिनीची मशागत करुन बेडची रुंदी ७o सेंमी. तयार करून त्यावर १o किलो नत्र, २0 किलो स्फुरद, १५0 किलो जिप्सम बेडवर टाकून मिसळले. त्यावर ७ मायक्रॉन जाडीचा पारदर्शक मल्चिंग पेपर अंथरुन त्यावर लागवडीसाठी २o × २0 सेंमी. वर झिंगझेंग पद्धतीने पाइपाने छिद्र करून प्रत्येक छिद्रामध्ये भुईमुगाचे टॅग-२४ जातीचे दोन बी टाकून जानेवारी महिन्यात लागवड केली. भुईमुगासाठी प्लॅस्टिक आच्छादन तंत्र वापरल्यामुळे थंडीच्या

चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील बाळू ,खंडू ,महाजन यांच्या मल्चिंगवरील भुईमुगाचे उत्पन्न व खर्च


दिवसांत जमिनीचे तापमान ४० ते ५° से. ने वाढले. त्यामुळे उगवण व सुरवातीची वाढ जोमाने झाली. थंडीच्या कालावधीतही लवकर पेरणी करणे शक्य झाले. चांगली उगवण व लागवडीचे अंतर एकसारखे ठेवले गेल्यामुळे एकरी रोपांची संख्या वाढली. तसेच पाण्याच्या बाष्पीभवनाचा रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास हे तंत्रज्ञान फायद्याचे ठरले. गादीवाफ्यामध्ये भुईमुगाच्या शेंगा चांगल्या पोसल्या गेल्यामुळे उत्पादनात वाढ झाली. सर्व शेतक-यांना सरासरी एकरी १८ ते २१ क्रिटल उत्पादन मिळाले.

उत्पादित मालाची थेट विक्री

शेतकरी गटाने उत्पादित माल थेट ग्राहकाला ओल्या शेंगा विक्री केल्या. त्यामुळे सर्व माल विना अडत हमाली वाहतूक खर्च कमी होऊन एकूण उत्पादन व विक्री यावरील खर्च कमी झाला. शेतकरी गटाच्या एकूण निव्वळ नफ्यात वाढ झाली. परिसरातील अनेक शेतक-यांनी या पीक प्रात्यक्षिकांना भेटी देऊन मल्विंगचे तंत्रज्ञान समजावून घेतले. जळगाव जिल्ह्यात 'आत्मा'च्या पुढाकाराने प्रथमच राबविण्यात आलेला हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. येत्या रब्बी व उन्हाळी हंगामांमध्ये चाळीसगाव व परिसरातील शेतक-यांनी या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर स्वत:च्या शेतावर ज्ञानेश्वर पवार व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक रवींद्र जाधव यांनी हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी योगदान दिले.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 8/3/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate