অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मळेगावची जलसमृद्धीकडे यशस्वी वाटचाल

मळेगावची जलसमृद्धीकडे यशस्वी वाटचाल

श्री क्षेत्र नर्मदेश्वर नागनाथ महाराजांच्या पदस्पशनेि पावन झालेले बार्शी ते तुळजापूर रस्त्यावर मळेगाव हे बार्शीपासून १६ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. मागील ४० वर्षापासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत असलेले सोलापुर जिल्ह्यातील मळेगाव हे एकमेव गाव आहे. मागील २o वर्षापासून गावात एकही मोठा तंटा अथवा भांडण झाले नसल्याने महाराष्ट्र शासनाचा 'विशेष शांतता पुरस्कार' तत्कालीन मुख्यमंत्री यांचेहस्ते प्राप्त झाला आहे.

तसेच रस्ते व परिसर नेहमीच स्वच्छ ठेवण्याची गावक-यांच्या सतर्कतेची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्यावतीने 'संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता'अभियान अंतर्गत जिल्ह्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. गावाच्या सभोवताली व मोकळ्या परिसरात गावातील नागरिक तसेच विद्याथ्र्यांच्या मदतीने मागील २० वर्षापासून एक व्यक्ती एक झाड या संकल्पनेनुसार मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाकडून मागील सलग तीन वर्षापासून पर्यावरण संतुलीत 'समृध्द ग्राम पुरस्कार' या गावास प्राप्त झाला आहे.

गावाची सर्वसाधारण माहिती

केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम सन २o१o११ मध्ये प्रकल्प क्र. WMP34 (SA3283) अंतर्गत मळेगावचा समावेश करण्यात आला आहे. गावाचे भगोलेिक क्षेत्र २१७८ हेक्टर आहे. गावातील १८९१ हेक्टर क्षेत्र वहितीखाली आहे. त्यापैकी ३५५ हेक्टर बागायत व १५३६ हेक्टर जिरायत क्षेत्र आहे. गावाची लोकसंख्या २५२९ असून एकुण खातेदार संख्या ९७२ असुन कुटूंब संख्या ५o८ आहे. गावातील एकुण विहिरींची संख्या ११o असून ६५ विंधनविहीर, १ पाणीपुरवठा विहीर असून गावात २ पाझर तलाव व १ गाव तलाव आहे. गावामध्ये वार्षीक सरासरी ५५0 तें ६५0 मेिं.मेिं. पाऊस पड़ती.

एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे ग्रामसभेव्दारे पाणलोट सर्मिती स्थापन करण्यात आलेली आहे. ग्रामसभेच्या

मान्यतेनुसार प्रेरक प्रवेश उपक्रमांतर्गत गावात ७ सौंरपथ दिवे, कृषेि वाचनालय, कृषि अवजारे बँक व दृक्ष लागवड करुन ६३ ट्री गार्ड अशा विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली. सन २o१२-१३ मध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये १७४.00 हेक्टर क्षेत्रात कंपार्टमेंट बंडींगची कामे पुर्ण करण्यात आली असून सन २o१३-१४ मध्ये उर्वरित ५७४.00 हेक्टरचे काम पुर्ण झाले. सन २०१४-१५ मध्ये सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र-२o१९ अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान ही योजना जाहीर झाली व त्यामध्ये प्रामुख्याने टंचाईग्रस्त गावे निवडण्यात आल्याने मौजे मळेगावचा समावेश झाला. सदर योजनेच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे ग्रामसभेमध्ये कंपार्टमेंट बंडींग १२२६ हेक्टर, ४ सिमेंट नालाबांध, १४ शेतातळी, ११ सिमेंट नालाबांधातील गाळ काढणे व दुरुस्तीकरण, विहीर पुर्नभरण, सुक्ष्मसिंचन, तुषारसिंचन, मल्विंग, वनराई बंधारे व १ पाणीपुरवठा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यापैकी सन २o१४-१५ मध्ये १५0 हेक्टर कंपार्टमेंट बर्डींगची कामे पुर्ण झाली असून मे-२o१५ अखेर गावामध्ये ६२६ हेक्टर कंपार्टमेंट बंडींग,

लोकसहभागातून ४o विहीर पुर्नभरण, ६ हातपंप, विंधन विहीर पुर्नभरण, ५ वनराई बंधारे, २ लोकसहभागातून सिमेंट नालाबांधातील गाळ काढणे-खोलीकरण व १ स्ता अशी कामे पुर्ण करण्याचे प्रस्तावेित करण्यात आले. २o१४-१५ व २o१५-१६ मधील झालेल्या कामामुळे ३७oटीसीएम पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व कामामुळे १३८o टीसीएम प्रस्तावित अडविल्या जाणा-या अपधावांपैकी ११७७.५o ठीसीएम अपश्धाव अडविण्यात

आला आहे. मौजे मळेगावमध्ये दि. १२.g४.२o१५ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे काम पुर्ण झालेले सर्व स्ट्रक्चर पुर्णक्षमतेने भरुन वाहिले व उन्हाळ्यात शेतक-यांना दिलासा मिळाला. तसेच संरक्षित पाण्याची सोय झाली. त्यामुळे अवकाळी पावसाचे पाणी वाहून न जाता शेतातच अडविण्यात आले. त्याचा फायदा या परिसरातील ५o ते ६o विहीरीतील व २५ ते ३g बोअरच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास झाला आहे. त्याचा परिणाम म्हणजे शेतक-यांनी उर्वरित कंपार्टमेंट बंडींगची कामे लवकर पुर्ण करण्याची मागणी केली. दि. ७ व ८ जून २०१५ रोजी सलग २/३ दिवस पडलेल्या ९१ मि.मी. पावसाचे पाणी शेतात अडल्यामुळे व विहीर पुनर्भरण केल्यामुळे या परिसरातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाली.

उन्हाळ्यात ३५ ते ४० फूट अंतरावर असलेले विहीरीचे पाणी १० ते १५ फूट अंतरावर येऊन थांबले. तर काही विहीरीचे तट ४ ते ५ फूट अंतरावर येऊन पाणी थांबले. पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतक-यांनी सोयाबीन पेरणी व कांदा रोपे टाकण्यास सुरुवात केली. जेणेकरुन हे पिक निघाल्यानंतर रब्बीमध्ये दुसरे मिश्र पिक घेता येईल. पुर्वी याच विहीरीला ऑगस्ट/ सप्टेंबरपर्यंत पाणी वाढत नव्हते तर काही विहीरी जून महिन्यामध्ये कोरड्या पडत असत. परंतु एकत्रित कामाचा परिणाम म्हणजे यावर्षी विहीरीचे पाणी काठावर बसून घेता येवू लागले आहे. सन २०१२-१३ पासून एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम व २०१४-१५ पासून जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमाच्या एकत्रितपणे अंमलबजावणीतून लोकसहभागातून नाला खोलीकरण करण्यात आले. त्यामुळे गावातील पाण्याची पातळी वाढू लागली आहे.

गावातील शेतक-यांचा कल फळबाग लागवडीकडे वाढला असून २२ शेतक-यांनी रोहयो योजनेतून १३.७० हेक्टर क्षेत्रावर कागदी लिंबु व १.00 हेक्टर क्षेत्रावर अांब्याची मागणी केली आहे. त्यापैकी १९ शेतक-यांनी ११.०० हेक्टर कागदी लिंबू व १ हेक्टर आंबा लागवड केली. पुर्वी हे प्रमाण १ ते २ हेक्टर होते. तसेच सन २०१४-१५ मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (म्तया) अंतर्गत क्षेत्र विस्तार योजनेतून २० शेतक-यांनी १७.०० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाची मागणी केली व द्राक्षे रुष्टस्टॉकवर कलमीकरण केले. सर्व क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा वापर करुन पाण्याची बचत करण्याकडे शेतक-यांचा कल वाढत आहे.

आजअखेर गावात १२७.00 हेक्टर क्षेत्रावर ठिबक असून त्यापैकी ७९.oo हेक्टर फळबाग व ४८ हेक्टर ऊस व इतर पिकासाठी वापर सुरु आहे. फळबागेमध्ये ५ ते ६ हेक्टर क्षेत्रावर पपई या पिकाची नव्याने लागवड करण्यात आली असून ५ ते ६ हेक्टर क्षेत्रावर कलिंगड या पिकासाठी मल्चिगचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे गावामध्ये एका तरुणाने भाजीपाला, फळबाग तसेच फुलझाडे नर्सरी सुरु केली व त्यास रोजगार मिळाला.

गावामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (म्त) योजने अंतर्गत २ शेतक-यांनी सामुहिक शेततळी उभारली आहेत. त्यामुळे संरक्षित बँक आली व अर्थसहाय्यास मदत झाली आहे. अशाप्रकारे गावाच्या जडणघडणीत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम व जलयुक्त शिवार अभियानाचा मोठा वाटा आहे.

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate