অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महिला संघटनेचा यशस्वी प्रयोग

महिला संघटनेचा यशस्वी प्रयोग

जरी शेतीच्या कामात महिला पूर्ण वेळ गुंतलेल्या असल्या तरी आपल्या समाजात अजूनही शेतकरी म्हणजे पुरुषच गणले जातात, महिला नाही. अगदी तामिळनाडू राज्यात देखील महिलांना पुरुषांसारखी शेत जमिनीची मालकी मिळालेली नाही. परिणामी त्यांना शेतीसाठी लागणा-या निविष्ट्रा, कर्ज इत्यादीपासून वंचित रहावे लागते. समाजात त्यांना सामाजिक दर्जा मिळत नाही . अशा अवस्थेत दलित महिला शेतकरीसोबत तामिळनाडू महिला संघटनेने १९९४ साली काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला आरोग्याच्या विविध प्रश्नांवर कामाला सुरुवात करून हळूहळू अत्रसुरक्षेच्या शाश्वत पर्यायावर कामाला चालना दिली. तसेही आरोग्य व आहार या बाबी एकमेकांवर अवलंबून असतात. महिला संघटनेच्या मते 'कृषी पर्यावरण' म्हणजे, पारंपारिक पद्धतीने शाश्वत व स्थानिक वातावरणाशी सुसंगत व लवचिक असणारी पीक पद्धती होय.


महिला संघटनेने सुरुवातीला 'आरोग्यदायी अत्र व आरोग्यदायी माती' या विषयावर अनेक कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले. पिकांच्या वाढीसाठी व सुरक्षेसाठी जैविक निविष्ट्रांची कशी निर्मिती करता येईल व वापरता येईल याबाबत शेतक-यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यातूनच स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले शेण, गोमूत्र, दूध इत्यादी साहित्य शेतीच्या निविष्ठासाठी वापरून , बाहेरील निविष्ठांवर अवलंबित्व कमी करण्याची सवय शेतक-यांना लागली. या पद्धतीमध्ये कष्ट व कामे कमी होत नसली तरी निविष्ट्रांचा खर्च बराच कमी होती आणि कुटुंबाची अन्नसुरक्षा अबाधित राहुन आरोग्यदायी कुटुंब अनुभवायला मिळते.

महिला सदस्यांना एकपीक पद्धतीऐवजी मिश्र पीक पद्धती घेण्यास प्रोत्साहित केल्या जाते, ज्यामुळे नैसर्गिक पर्यावरण व्यवस्था व जैवविविधता टिकवणे सुलभ होते, शिवाय मातीची सुपीकता वाढते व एकंदर पिकांचे उत्पादन देखील तुलनेने वाढते. विशेषतः महिला स्वतःच्या कुटुंबाच्या अन्नविषयक गरजा भागवण्याच्या हेतूने छोट्या स्वरूपात कृषी पर्यावरण टिकवणा-या कृषी पद्धती अवलंबतात . जरी संघटनेच्या सर्वच महिला सदस्यांना अशा प्रकारची शेती करण्यासाठी जमिनी उपलब्ध नसल्या तरी घराच्या मागील जागेत सेंद्रिय परस बाग उभ्या करण्यास प्रोत्साहन दिले जाते. (बॉक्स क्र. १ पहा)

येथील शेतक-यांना तृणधान्य (ज्वारी, बाजरी, नागली) घेण्यास प्रोत्साहित केले जाते. कारण येथील वातावरण व संस्कृतीशी ही हरितक्रांतीनंतर या पिकांच्या जागी तांदूळ पिकवण्यावर भर दिला गेला. वास्तविक पाहता पाण्याच्या टंचाईमुळे तामिळनाडूतील ब-याच जिल्ह्यामध्ये भाताचे पीक घेणे अवघड जाते आणि म्हणून महिला संघटनेने तणधान्याच्या उत्पादनाला जास्त प्रोत्साहन दिले. जेणेकरून पाणी टंचाईचा त्रास पिके घेताना महिलांना भेडसावणार नाही व कुपोषणावरसहजपणे मात करता येईल.

बॉक्स १

कल्पांजा ही नागरकॉईलपासून काही अंतरावर असलेल्या गावात राहणारी एक महिला. आरोग्याच्या काही व्याधीमुळे ती कामावर जाऊ शकत नाही. 'आरोग्यदायी अन्न' या विषयावरील कार्यशाळेत ऐकल्यावर ती स्वतःची परस बाग निर्माण करण्यास तयार झाली. सहा महिन्यापूर्वी सेंद्रिय पद्धतीने विविध भाज्या पिकवायला सुरुवात केली. शेणखत व स्वयंपाकघरातील काडीकचराखत म्हणून वापरला. परस बाग करणे हे तिच्या मते, जास्त कष्टाचे नाही. शिवाय सर्व लागत फुकटच असते. तिची मुले देखील प्रभावित होऊन शाळेवरून येताना नवनवीन रोप घेऊन येतात. यातून प्रेरणा घेऊन ब-याच महिला विविध प्रकारची बियाणं जमा करण्यासाठी तामिळनाडू महिला संघटनेची मदत घेऊ इच्छितात.

तामिळनाडू महिला संघटनेच्या एकूण १ लाख सदस्यांपैकी केवळ % टक्के महिलांच्या नावे शेतजमीन आहे

बॉक्स २

अशाच एका कार्यशाळेत कन्याकुमारी जिल्ह्यातील जमिला नावाच्या एका महिला शेतकरीसोबत फिलोमिना, समन्वयक कन्याकुमारी जिल्हा यांची भेट झाली. जमिलाकडे ३ एकर जमीन आहे. जमिलाने एका अटीवर आपल्या जमिनीवर महिला संघटनेला शेती मोफत करण्याची संधी दिली. ती अट म्हणजे जमिलाला महिला संघटनेचे सदस्यत्व देणे. सहा महिलांनी एक गट करून ती शेती समूह शेती म्हणून करायला घेतली. येणारा खर्च सर्वांनी समान करायचा व येणारे उत्पादन सर्वांनी वाटून घ्यायचे. जर काही उरलेच तर ते महिला संघटनेला विकायचे असे ठरले. अशा प्रकारे जमिला व महिलांचा गट यांच्यामध्ये तसा पाच वर्षांचा करार इमाला. केळी, साबुदाणा आणि भाजीपाला लागवड करण्याचे ठरले. महिला संघटनेने सुरुवातीला ४००० रुपये गुंतवणूक म्हणून मदत केली.

फिलोमिना आणि इतर सदस्यांना खात्री वाटत आहे की अनेक महिला या प्रयोगाची पुनरावृत्ती करतील. तामिळनाडू महिला संघटन हे नेटवर्क महिंलाच्या नावे शेती व औपचारिक बँक कर्ज अशा विषयावर काम करीत आहे. कारण दरमहा १०० रुपयेची बचत करते. त्यातून बीज, आरोग्य व शिक्षण या सोठी पैसे गरजू महिलांना कर्जरूपाने मिळतात. तामिळनाडूमध्ये महिलांच्या नावे शेती खूप कमी प्रमाणात आहे. तामिळनाडू महिला संघटनेच्या एकूण १ लाख सदस्यांपैकी केवळ १ टक्के महिलांच्या नावे शेतजमीन आहे.

एक नेटवर्क म्हणून महिला एकमेकीसोबत काम करण्याचा आनंद घेतातच शिवाय ही एक ताकद आहे असे त्यांना वाटते. शिवाय त्यांना व्यक्त होण्याच्या व नेतृत्वामध्ये येण्याच्या संधी देखील मिळतात. असे हे सामाजिक पातळीवरचे नेटवर्क महिलांना एका पातळीपर्यंत अत्र सुरक्षासाठी उपयुक्त ठरत आहे. तर दुस-या बाजूने सामूहिक शेतीमधून होणा-या वाढीव उत्पादनामुळे गरिबीवर मात करणे शक्य झाले आहे. त्यातून त्यांना आर्थिक व सामाजिक कुटुंबातील माता व भगिनी कुटुंबाच्या जबाबदा-या व नेतृत्व त्यांच्या हातात घेताना अनुभवत आहेत. त्या आपला आवाज सर्वत्र पोहोचवताना अनुभवत आहेत. या महिला नवीन पिढींतील महिलांना कृषी पर्यावरण कसे शाश्वत शेती व पारंपारिक शेती टिकवून ठेवते याची प्रेरणा देणारे उदाहरण बनल्या आहेत.


स्त्रोत - लिजा इंडिया

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate