অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मोरणे येथील शेतातील पाणी बचत

मोरणे येथील शेतातील पाणी बचत

मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्याच्या ठिकाणाहून ३० कि.मी. दूर निदान हे गाव वसले आहे. जौरा तालुक्यातील या गावात जुलै ते ऑगस्ट या महिन्यांत वार्षिक सरासरी ४५० मि.मि. पाऊस पडतो. बहुतांश शेती ही कोरडवाहू असून रबी हंगामात पाण्याचा मुख्य स्रोत हा बोअरवेल्स असतो. या गावात बहुतांशी दुष्काळी परिस्थिती असते. तसेच कमी पाऊस पडल्यास बहुतांश बोअरवेल्स देखील कोरड्या होतात. गावाच्या जमिनीचा पृष्ठभाग

असमतल असल्यामुळे खोलगट भागातील जमिनी, जास्त पाणी साचल्यामुळे खरीप हंगामात त्या पडीक राहतात तर उंच भागात असलेल्या जमिनी रबी हंगामात हिवाळयातील धुक्यांमुळे त्रासदायक ठरतात. पिकांवर किडी व रोगांचा प्रार्दुभाव नेहमी असतो. तसेच सुधारित बियाणे व शेतीची यंत्रसामग्री उपलब्ध नसते. मजुरांची कमतरता हे प्रश्न या गावात सतत जाणवतात. ज्वारी, तूर, गहू व मोहरी ही पिके प्रामुख्याने गावात घेतली जातात. या भागात तुरीनंतर रबीमध्ये गव्हाची लागवड ही शाश्वत पीक पद्धती मानल्या जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून तुरीचे क्षेत्र हे अनेक कारणांमुळे घटत आहे.

तूर काढणीनंतर लगेच फार मशागत न करता गव्हाची पेरणी कल्याने कष्टही वाचले व पलेवा (पहिले सिचिन टाळून पाणी बचत करता आले.

प्रथमतः अनियमित पावसामुळे शेतक-यांना वेळेत पेरणी व लागवड करणे कठीण होते. त्यामुळेच आधीच २२०-२५० दिवस अशा जास्त कालावधीच्या या पिकाचा या जास्त कालावधी आणखी पुढे ढकलल्या जात होता. तसेच थंडीच्या दिवसात पडणा-या धुक्यामुळे मर व वांझ मोझेंक रोगामुळे पिकाचे उत्पादन कमी येत होते.

जास्त कालावधीच्या पिकामुळे त्यांना इच्छा असून सुद्धा उत्पत्र मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्याच्या ठिकाणाहून ३० कि.मी. दूर निदान हे गाव वसले आहे. जौरा तालुक्यातील या गावात जुलै ते ऑगस्ट या महिन्यांत वार्षिक सरासरी ४५० मि.मि. पाऊस पडतो. बहुतांश शेती ही कोरडवाहू असून रबी हंगामात पाण्याचा मुख्य स्रोत हा बोअरवेल्स असतो. या गावात बहुतांशी दुष्काळी परिस्थिती असते. तसेच कमी पाऊस पडल्यास बहुतांश बोअरवेल्स देखील कोरड्या होतात.

गावाच्या जमिनीचा पृष्ठभाग असमतल असल्यामुळे खोलगट भागातील जमिनी, जास्त पाणी साचल्यामुळे खरीप हंगामात त्या पडीक राहतात तर उंच भागात असलेल्या जमिनी रबी हंगामात हिवाळयातील धुक्यांमुळे त्रासदायक ठरतात. पिकांवर किडी व रोगांचा प्रार्दुभाव नेहमी असतो. तसेच सुधारित बियाणे व शेतीची यंत्रसामग्री उपलब्ध नसते. मजुरांची कमतरता हे प्रश्न या गावात सतत जाणवतात. ज्वारी, तूर, गहू व मोहरी ही पिके प्रामुख्याने गावात घेतली जातात. या भागात तुरीनंतर रबीमध्ये गव्हाची लागवड ही शाश्वत पीक अनेक कारणांमुळे घटत आहे.

तूर काढणीनंतर लगेच फार मशागत न करता गव्हाची पेरणी केल्याने कटही वाचले व पलेवा (पहिले सिचंन टाळून पाणी बचत करता आले.

प्रथमतः अनियमित पावसामुळे शेतक-यांना वेळेत पेरणी व लागवड करणे कठीण होते. त्यामुळेच आधीच २२०-२५० दिवस अशा जास्त कालावधीच्या या पिकाचा या जास्त कालावधी आणखी पुढे ढकलल्या जात होता. तसेच थंडीच्या दिवसात पडणा-या धुक्यामुळे मर व वांझ मोझेंक रोगामुळे पिकाचे उत्पादन कमी येत होते.

जास्त कालावधीच्या पिकामुळे त्यांना इच्छा असूनसुद्धा उत्पन्न वाढविण्यासाठी दुसरे पिक घेणे शक्य नव्हते. असे सुद्धा आढळून

आले की तुरीनंतर घेतलेल्या गव्हाचे उत्पादन उशिरा पेरल्यामुळे मार्च महिन्यातील वाढलेल्या तापमानामुळे गव्हाचे उत्पादन कमी येत होते. ही समस्या मध्य भारतातील सर्वदूर प्रदेशांमध्ये जिथे तूर या पिकांची लागवड मुख्यत्वे होते तिथे गेल्या काही वर्षात आढळून येत होती.

उपाययोजना

यावरील एक उपाय म्हणजे कमी कालावधीच्या जाती तयार करणे. परंतु त्यांना ओलिताची व्यवस्था आवश्यक होती. तसेच हे सुद्धा निदर्शनास आले की कमी कालावधीच्या तुरी ज्याची पेरणी जुलैच्या पहिल्या आठवड्यात होऊन डिसेंबरच्या पहिल्या आठवडयात संपते. तेव्हा शेतात ५ ते ८ मशागती व ओलीत करणे गरजेचे असते. यामुळे गव्हाच्या पेरणीला उशीर होतो. सर्वसाधारणपणे पेरणीला झालेल्या प्रत्येक दिवसाच्या उशिराला प्रति दिवशी उत्पादनामध्ये १ ते १.५ टक्क्यांची घट येते. तसेच नंतर घेण्यात येणा-या पिकांना जास्त संसाधने जसे ऊर्जा, बियाणे, खते व ओलिताची गरज भासते ज्यामुळे उत्पादन खर्चात खूप वाढ होते.

पर्यायस्वरूप याच परिसरातील कृषी विज्ञान केंद्राने नॅशनल इनिसिएटीव्ह ऑन क्लायमेट रेझिलेंट अॅग्रीकल्चर (NICRA) या कार्यक्रमांतर्गत ओलिताच्या नवीन प्रबंधन पद्धतीचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. २०११ मध्ये 'पर्यावरण बदलानुसार भारतीय कृषीची लवचिकता/अनुरूपता' वाढविण्यासाठी हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आला. यामध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या देशाच्या १०० संवेदनशील जिल्ह्यामध्ये मार्गदर्शन व प्रात्यक्षिके देण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

या अंतर्गत दुष्काळाला सहनशील गव्हाच्या वानाची उपलब्धता करण्यात आली. गव्हाच्या लागवडीची वेळ अलीकडे घेतली गेली. ज्याच्यामुळे पुढे उष्णतेची झळ पिकाला मारक ठरणार नाही. पद्धतीत बदल करण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधण्यास सुरुवात केली. निधान गावातील शेतक-यांनी कृषी विज्ञान केंद्राद्वारे घेण्यात त्यांच्या शेतात अतिशय कमी मशागतीचा पर्याय ज्यामध्ये एक वखरणी, दोन नांगरणी, सपाटीकरण व गव्हाच्या जीडब्लू-३६६ किंवा एमपी-१० १० वाणाची पेरणी याचा समावेश केला. गव्हाची पेरणी ओळीत बी व खते या एकत्रित पेरणी यंत्राणे केली.

धैचा या हिरवळीच्या खतांचा सुद्धा वापर करण्यात आला. तुरीच्या पिकानंतर कोरड्या मातीत गव्हाची पेरणी करण्यात आली. यामुळे गादी वाफ्यावर बियाणे पेरणीसाठी लागणा-या वेळेची बचत झाली. तसेच पहिल्या ओलितामध्ये (ज्याला स्थानिक भाषेत पलेवा म्हणतात) लागणारा जवळजवळ १० ते १५ दिवसाचा कालावधी वाचला. या पद्धतीमुळे जमिनीची मशागत करण्यासाठी लागणारी ऊर्जा वाचली व त्याचबरोबर पाण्याची देखील बचत झाली. या पद्धतीमुळे सर्व पीक एकसारखे वाढताना आढळले. पाण्याच्या कमी होणा-या पातळीची धोक्याची घटा लक्षात घेता शेतक-यांनी या पद्धतीचा अवलंब केला.

पाळी पेरणी झाल्यानंतर लगेचच पिकाची चांगली उगवण होण्यासाठी व दुसरे पाळी पहिल्या पाण्याच्या पाळीनंतर ४०-४५ दिवसानंतर देण्यात आली. शेतामध्ये ओलीत करण्यासाठी वाफे व सरींचा वापर करण्यात आला. ज्यामुळे पाण्याचा जास्त कार्यक्षम उपयोग करण्यात आला. ज्यामुळे गव्हाची उत्पादकता ५३.८ गावातील जवळपास १२५ शेतकरी कुटुंबांनी या पद्धतीचा अवलंब केला. तुरीच्या काढणीच्या अगोदर दिलेल्या ओलिताची व तूर काढणीनंतर दिलेल्या ओलितामुळे आलेल्या उत्पादनाची तुलना करण्यात आली. यामध्ये असे आढळून आले की नंतरच्या

परिस्थितीत उत्पादनात जवळपास ११ टक्के वाढ होती. गावातील ३२ शेतक-यांनी शून्य मशागतीचा अवलंब केला. त्यांना २०१२-१३ मध्ये जवळपास ५० हेक्टर गहू शून्य मशागतीने लागवड करण्याच्या पद्धतीमुळे ११२ क्विंटल गव्हाचे अतिरिक्त उत्पादन मिळाले. यामुळे १.८८ लक्ष रुपयाची बचत गावात झाली. नावीन्यपूर्ण शून्य मशागतीचे तंत्र जिल्ह्यातील लगतच्या गावांमध्ये पसरले. २०१३ मध्ये अंदाजे २०० हे क्षेत्रावर या हे आता ठामपणे म्हणता येते की, या पद्धतीमुळे जास्त उत्पादन होऊन उत्पन्न वाढण्यास मदत झाली. शेतकरी याकडे शेती करण्याचा नवीन मार्ग म्हणून पाहू लागले आहे व सर्वात महत्वाचे म्हणजे बदलत्या पर्यावरणानुसार शेती पद्धतीमध्ये उत्पादनाच्या शाश्वतीसाठीचा हा एक नवीन मार्ग ठरला आहे.


स्त्रोत - लिजा इंडिया© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate