অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विस्ताराचे धडे

विस्ताराचे धडे

सधन धान लागवड पद्धती ही ज्ञानावर आधारित पद्धती आहे आणि ती सतत विकसीत होत आहे. ह्या पद्धतीचा जास्तीत जास्त व शाश्वत प्रसार करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करावे लागतील. ज्ञान वृद्धी सहभागिता सततचे मार्गदर्शन, ढाच्यांगत समन्वयन आणि सरकारी मदत यांची नितांत गरज यासाठी लागेल.

पारंपारिक पणे आंध्रप्रदेश, कर्नाटक व तामिलनाडू या दक्षिणेकडील राज्यातील दुष्काळी जिल्हातील छोटे शेतकरी, दुष्काळी परिस्थितीशी तग धरुन वाढणारी पण सकस पीके घेत असत. त्यांच्या रोजच्या अज्ञाच्या गरजा यामधून भागविल्या जात होत्या परंतु कामानुसार ह्या शेतक-यांनी आपल्या पिकामध्ये फरक केला अणि अगदी सिंचनाची पुर्ण व्यवस्था नसतांना देखिल बाहय लागतीच्या जोरावर धानाचे पिक घ्यायला सुरुवात केली. सततचा दुष्काळ व वेळी अवेळी पडणारा पाऊस यामुळे पानी टंचाई अधिकच या भागात वाढली. एवढेच नव्हे तर अव्याहत जमिनी खालच्या भरमसाठा उपसा आणि जलसंधारण्याचा अभाव यामुळे जमिनीला ओलावा सुद्धा कमी जाणवू लागला. परिणामी उत्पादन प्रमाण ढासळले व नैसर्गिक संसाधनाची गुणवत्ता लयाला गेली. अश्या परिस्थितीशी झुंजणाच्या कोरडवाहू शेतक-यांना मदत करण्यासाठी व तुटपुंजा पाण्याचा योग्य वापर करण्याचे हेतुन ए.एम.ई. फाऊंडेशन ने एस.आरआय पद्धती ला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. सुरुवात धानाच्या पिकापासून केली. व हळुहळु रागी हरभरा सारख्या पिकामध्ये देखिल ही पद्धती आणली.

नवे प्रयत्न  

2004-2005 मध्ये आंध्रप्रदेशातील काही शेतकरी सतत घटणा-या उत्पादनामुळे चिंतित होते. उत्पादन वाढी साठी काय वाटेल ते करण्याची त्यांची मानसिकता बनली होती. तेव्हाच एसं आर आय ही नविनच कल्पना आली होती. ए एम ई फाऊंडेशन सोबत काम करणा-या काही शेतक-यानी एस आर आय पद्धतीचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्याचे ठरविले. पहिल्याच वर्षी त्यांचे उत्पादन भरमसाठ वाढले यामुळे आनखी काही शेतकरी प्रभावित होऊन त्यांनी पण पुढील हंगामात एस आर आय पद्धतीचा वापर केला. एकूनच झालेल्या उत्पादन वाढीमुळे प्रभावित होउन ए एम ई फाऊंडेशन ने इतर भागातील शेतक-यांना आंध्रमधील शेतक-यांच्या शेतीला भेटी देऊन अभ्यास करावा म्हणून आणले. अशा त-हेने 2008 पर्यंत केवळ आंध्रप्रदेश नव्हे तर कर्नाटक, तामिळनाडू राज्यातील देखिल 250 शेतक-यांनी एस आर आय पद्धतीने धान पिके घेतली.

2008-2009 हेच काम वाढवण्यासाठी ए एम ई फाऊंडेशनला डब्ल्यु डब्ल्युएफ व देशपांडे फाऊंडेशनची आर्थिक मदत मिळाली. हळूहळू 9 जिल्ह्यातील शेतक-यांसोबत हे काम पुढे सरकले. आंध्रप्रदेश मधील मेहबुबनगर व चितोर जिल्हे, तामिलनाडूमधील धर्मापूरी, पेरामाबलूर, पुडूकोढाई आणि तिरुची जिल्हे व कर्नाटक मधील धारवाड आणि हस्सन जिल्हे . धारवाड मधील पावसाच्या पाण्यावर एस आर आय पद्धत राबविल्यामुळे ए एम ऐइ फाउंडेशनला बरीच आव्हाने झेलावी लागली 2009-10 पर्यंत 4900 शेतक-यांनी एस आर आय पद्धती अवंलबली त्याच वेळी नाबार्ड च्या आर्थिक सहयोगाने ए एम ई फाउंडेशन 2010-11 मध्ये 13000 शेतकरी 2011-12 मध्ये 16000 शेतकरी तर 2012-13 मध्ये 19000 शेतकऱ्यानपर्यंत पोहचू शकली.

शिकवण, नाविन्य व समक्षीकरण

एसआरआय पद्धती ही ज्ञानावर आधारित असल्यामुळे शेतक-यांमध्ये ह्या पद्धतीची मूळतत्वे पक्की व्हावी यावर भर दिला.ह्यासाठी शेतशाळा हि रणरिती अवलंबिली ज्याच्यामुळे पूर्ण  हंगामभर पाहणी, निरीक्षण, परिक्षण याद्वारे ज्ञान वाढ़वण्याची संधी उपलब्ध झाली. अशा शेतक-याचे गट स्थापन केले गेले. अगदी पारंपारिक पद्धतीने व संपूर्ण पाण्याने तूडुंब भरलेल्या शेतामध्ये भात पिक घेण्याची परंपरा व त्या आधारे निर्माण झालेली शेतक-यांची मानसिकता बदलण्यासाठी ह्या पद्धतीची गरज होती. ह्या सतत च्या मार्गदर्शनामुळे शेतक-यांमध्ये एसआरआय पद्धती बाबत आत्मविश्वास निर्माण झाला. सोबतच ह्या शेतक-यासाठी क्षेत्रभेठी, प्रात्याक्षिके, प्रशिक्षण, शेतकरी ते आदान प्रदान इ. प्रयत्न प्रसार प्रचारासाठी महत्वाचे ठरले .

दरवर्षी   दरवर्षाँ साधारणत: 250 प्रक्षिशण कार्यक्रमः, दोन वेळ्ळा3भादान प्रदान कार्यक्रम, हंगामाच्या शेवटी प्रत्येक गावामध्ये क्षेत्रिय भेटी आयोजित केल्या होत्या . आपल्या परिस्थितीमध्ये जुळून येण्याच्या उद्देशाने योग्य मशागत पद्धती काय व कशा आसाव्या हे स्वतः शेतक-यांच्या लक्षात यावे म्हणून प्रत्यक्ष शेतावर शास्त्रीय दृष्टीकोनातून विविध प्रयोग करण्यास शेतक-यांना सतत प्रोत्साहन देण्यात आले. याला आम्ही शेतक-यांच्या शेतावर विविध प्रयोग करुन विशिष्ट्र प्रकारच्या पाणी त्याच्या मात्रा अशा विविध अवस्थांमध्ये विविध शेतावर  विविध प्रयोग केले गेले अशा एकूण १६ वाचण्या केल्या गेल्या. ह्या कल्पना राबवू लागले. उदा. लोखंडी तिफन वापरणे, शेतक-याला जड व त्रासदायक वाटायचे म्हणून लाकडी तिफन करन वापरायला सुरवात केली. तसेच आनखी एका ठिकाणी सायकलला लोखंडी पात्याचा वापर करुन पिकातील तन काढणे, कोळपणी व ओल्या जमिनीनी नांगरणी करणे सुद्धा सोपी जाते. हे सिद्ध केले.

सहभागी प्रक्रीयामुळे शेतक-यामंध्ये नाविण्य करुन पाहण्याचा उत्साह निर्माण झाला. शेतीशाळांच्या दरम्यान अनेक शेतकरी तिविध प्रकारच्या नविन गोष्ठी इतरांना सांगू शकेल

नाचणीच्या शेतात शेतकरी कृषी पर्यावरण व्यवस्थेचे विश्लेषण करताना

अर्थात या सर्व नविन गोष्टी एका एकी आत्मसात करणे एवढे सोपे नाही. व अनेक शेतक-यांना अडचणी जाणवत होत्या पण या सर्व प्रक्रीयेमध्ये ए.एम.ई. फाउंडेशनच्या च्या बाजुने सतत मार्गदर्शन होत राहीले. शंकाचे समाधान केले गेले. यातून शेतक-यांना एक शास्त्रीय आधार वाटला. एक वेळ सोमानाका गावातील शेतक-यांना योग्य वेळी धानाची रोपे रोवणी करण्यासाठी मजूर मिळत । त्यावेळी रोवणी यंत्र त्यांना उपलब्ध करन दिले ह्याच्या वाप्रामुळे अगदी वेळेत व कमी पैशात काम झाले. त्यामुळे मजुराचा प्रश्न सुटला. शिवाय मजुरीवर खर्च होणारा पैसा एक ष्ठष्टांश एवढा कमी झाला,

गावतल्या गावात फैलाव

एम.आर.आय. एक नविन व पारंपारिक पद्धतीला आव्हान देणारी पद्धती असल्यामुळे अगदी बारीक बारीक मुद्यावर व प्रत्येक हे आवश्यक आहे. जस जसे शेतकरी वाढू लागले तसे सर्व शेतक-यांना हे सततचा मार्गदर्शन व सोबत देण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ ए एम. ई. फाऊंडेशन कडे शक्य नव्हते. म्हणून शेती मध्ये काम करण्याच्या अशा अनेक लोकांना निवडून त्यांना शास्त्रीय न साचेबद्धप्रशिक्षण दिले व गावोगावी "शाश्वत शेती प्रसारक’ तयार केले.

ह्या युवा प्रसारकांनी त्यांना दिलेल्या नवनविण प्रयोग स्वतःच्या पातळीवर करु लागले व गावातील इतर शेतक-यांना देखील ते मदत व मार्गदर्शन करु लागले. अशा प्रकारे 500 पेक्षा जास्त शेतकरी युवांना प्रशिक्षीत केले व त्यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात एस.आरआय चा प्रसार होऊ लागला. अशा प्रशिक्षत युवाची गावातल्या गावात सहज उपलब्धीमुळे अनेक शेतक-यांनी या पद्धतीचा अवलंब करण्याचे धाडस केले. डीपीहल्ली  हे कोलार जिल्हयातील असे एक गाव आहे की जेथिल सर्वच्या सर्व  शेतकर्यांनी एसआरआय  पद्धती अवलंबली आहे.

ढाच्यागत एक केंद्राभिमुखता 

मोठ्या प्रमाणात प्रसार होण्याच्या हेतुने एमई फाऊंडेशनने समविचारी स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवी संस्थांची नेटवर्क यांच्याशी एकत्र येऊन काम करण्यास सुरुवात केली. अशा रितीने तामिळनाडू मध्ये पीएसएसएस , बी.ई.एस.टी व एस.पी.पी.डी आणि आंध्रप्रदेश इकोक्लब व ओव्हीएफ यांच्या सोबत काम सुरु केले. अशा काही भागामध्ये जेथे टि एम ई फाऊंडेशन प्रत्यक्षात पोहोचू शकले नव्हते प्रयत्न केले. जसे 2009 मध्ये कर्नाटकातील हस्सन जिल्ह्यातील सकलेशपूर तालुक्यामध्ये कृषि विभागासोबत संबंध जोडले तर तामिलनाडूमध्ये पाच जिल्ह्यातील कृषि विभागातर्फे आयोजित शेतीशाळेच्या “ कार्यक्रमात एएमई फाउंडेशन साधन संस्था म्हणून उपस्थित  राहिली. या शेतीशास्त्रामध्ये एसआरआय हाच प्रमुख विषय होता.

विशेष अभियान

एमई फाऊंडेशनने त्यांच्या पुढे जाऊन विशेषत्वाने एसआरआय अभियान या नावाने अभियान सुरु केले. 2009  मध्ये केवळ शेतकरीच  नव्हे तर विविध संघटना, प्रसारमाध्यमे लोक प्रतिनिधी की जे एसआरआय पद्धतीसाठी विविध मार्गाने सहकार्य करतील अशा सोबत हे अभियान पोहोचवले. याचा तातडीने फायदा असा झाला की 35 गावातील सुमारे 1500 शेतकरी प्रथमच एस.आरआय करायला तयार झाले. त्याच पद्धतीने कर्नाटक मधिल कोलार व बल्लारपूर येथे देखिल प्रयत्न झाले भिंती पत्रके, बँनर्स, तक्ते , व्हीडिओ अशा विविध साधनांचा वापर करुन धारवाड जिल्ह्यातील ३० गावामध्ये अभियानाने प्रसार केला मोठ्या प्रमाणात  शेतक-यांनी याला प्रतिसाद दिला.

एसआरआई-इतर पिकाकडे कूच

धानाच्या पिकासाठी एस.आरआय ची तत्त्वप्रणाली पद्धती वापरल्याने बराच फायदा झाला म्हणून नागली आणि तूरी सारख्या पिकामध्ये देखिल असे करुन पाहावे असे शेतक-यांना वाटले.

2010-11 मध्ये सुमारे 290 शेतक-यांनी एसआरआय च्या मूलभूत पद्धती, जसे बियाणाची मात्रा कमी, निंदन व्यवस्थापन इ. कोलार जिल्ह्यातील 14 गावातील या शेतक-यांनी 209 एकरामध्ये या पद्धतीने नागलीचे पीक घेतले. यामुळे त्यांना 22 टक्के जास्त उत्पादन व 33 टक्के जास्त उत्पन्न मिळाले. पुढेकाही वर्षात आनखी काही शेतक्यांनी ही पद्धती स्विकारली. आणि आता 900 शेतकरी या पद्धतीने नागली पिकवत आहेत. याचा प्रमाणे कोलार जिल्ह्यातील पाच गावातील35 शेतक-यांनी 16 एकरावर तुरीचे पिक घेऊन सुमारे 70 टक्के उत्पादन वाढीचा अनुभव घेतला.

शिकवण 

आज एसआरआय पद्धती तांदुळ पिकविण्याच्या 19000 शेतक-यांपर्यंत नागली पिकवणाच्या 977 तरतूर पिकवण्याच्या 70 शेतक-यापर्यंत पोहोचवली आहे. विशेतः कोरडवाहू शेतीमध्ये 8 वर्षे मागे वळून पाहील्यास असे दिसते की या यशाच्या मागे अनेक कारणे आहे. त्यामध्ये संपूर्ण हंगामाभर शेतक-यांच्या सहभागी प्रक्रियांचा सर्वात मोठा वाटा आहेत. एसआरआय मध्ये ज्ञानाला जास्त महत्न आहे. आणि लागतीला नाहे शेती शेतीशाळा व सहभागी तंत्रविकास या पद्धतीमध्ये शेतक-यांना करन, नविन पर्याय शोधणे, समजून घेणे यासाठी चांगला वेळ, संधी मिळाली. अर्थात या पद्धतीने उत्तम परिणाम'  उत्पादन व उत्पन्न वाढ' हे तर नवीन शेतकर्यांना खात्री देणारच ठरले .

त्याचप्रमाणे शेतक-यांसोबत गटा गटातून  काम केल्यामुळे एकमेकाकडून शिकल्याने खूप चांगला परिणाम झाला खर तर ज्या शेतकर्यांसोबत  हे काम केले जात आहे ते लहान शेतकरी आहेत आणि माहिती व खात्री नसलेले प्रयोग करणे त्यांना परवडणारे नाही. त्यामुळे सतत त्यांची सोबत देऊन मार्गदर्शन करण्याची गरज ए एमई फाऊंडेशनच्या लक्षात आली किमान ही गरज सुरुवातीच्या  3  हंगामापर्यंत असते. त्यांसाठी शास्वत  शेती क्षमता, वृद्धी  करण्यावरच जास्त उपयोगात आली.

या अनुभवातून असे लक्षात येते की संपूर्ण जिल्हाच नव्हेतर एस.आरआय प्रसार पलिकडे जाऊन अनेक जिल्हे, राज्ये येथे प्रसार करण्यासाठी इतर घटक, संस्था सोबत करणे हे आवश्यक आहे. ह्याचाच अर्थ असा की आपल्याला समान क्षेत्रातील अनेक घटकांनी मिळून "एक केंद्राभिमुख’ पद्धती अवलंबल्यास त्याचे परिणाम चांगले व दुरगामी होतात. मग तो आदर्शवाद असो की एकादी पद्धती. यासाठी गारज3सते च. खरंतर अगदी मोठ्या प्रमाणावर या पद्धतीचा अवलंब वाढणे आवश्यक आहे.

ज्यामुळे उत्पादन वाढ, संसाधन संवर्धन व संबंधित राज्यसरकारांनी याकडे लक्ष देऊन भरघोस सहाय्य नाही केले तर असले अनमोल प्रयोगा मर्यादित राहतील. ज्ञान वाढविणे, संशोधन करणे, विस्तार शिक्षण इत्यादी क्षेत्रातील सहाय्य म्हणून लहान शेतक-यांसाठी महत्वाचे आहे. छोटे शेतकरीना तर सोबत पण हवी असतेच पण त्याशिवाय तांदूळ पिकविणाच्या मोठ्या शेतक-यांना सुद्धा या पद्धतीकडे वळविणे महत्वाचे आहे. अलिकडे मोठ्या शेतक-यांना एस.आरआय पद्धती नारायला अनेक कारणांनी अडचणीचे जात आहे.

अशा शेतक-यांसाठी सरकारने कमी मजुराच्या आधारे चालविता येणारी छोटी छोटी साधने, यंत्रे बनविण्यात पैसा गुंतवावा. सर्वात महत्वाचे म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतक-यांनी अशी पद्धत अवलंबने हे आपण तीह पद्धत शेतक-यापर्यंत कशी पोहोचवतो यावर अवलंबुन राहते. एसआयआर ही इतर तंत्रज्ञानासारखी शेतक-यांच्या डोक्यावर मारुन चालणार नाही. तर प्रत्येक व खोदलत्या परिस्थिानुसार विकसीत करण्याची ही पद्धत आहे. आणि त्यासाठी शासनाला अगदी तळागाळात काम करण्याच्या छोट्या छोट्या संस्थासोबत काम करावे लागेल. सहभागी तत्वावर कार्यपद्धती ठेवावी लागेल. आणि तरच एसआरआई पद्धती सर्वदूर व दूरगामी पोहोचेल /टिकेल.

 

स्त्रोत - लीजा इंडिया© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate