অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शास्वत ऊस लागवड तंत्रज्ञान

शास्वत ऊस लागवड तंत्रज्ञान

शास्वत ऊस लागवड तंत्रज्ञान (SSI) ही प्रक नाविण्यपूर्ण कृषी उत्पादन पध्दती आहे ज्यामुळे पर्यावरणीय ऱ्हास कमी होतो. हे तंत्रज्ञान अतिशय वेगाने भारतातील ऊस उत्पादकांमध्ये प्रचलित होत आहे. (SSl) ला, त्याच्या जास्त उत्पादन, पाण्याचा कमी वापर व किमान कृषि निविष्ठा या गुंणामुळे एक  आदर्श ऊस लागवड तंत्रज्ञान लवकरच म्हणून लवकरच मान्यता मिळेल. विविध घटकांच्या समन्वयीत प्रयत्नांमुळे(SSl) चा फैलाव मदत होईल.

ऊस हे भारतात कापसानंतर दुस-या क्रमांकाचे कृषी- औद्योगीक पिक आहे. जगामध्ये ब्राझील पाठोपाठ दुसरया स्थानावर असलेले व 350 दशलक्ष टन वार्षिक उत्पादन असलेले हे पीक 5 दशलक्ष हे. क्षेत्रावर घेतल्या जाते. ऊस हे ग्रामीण भागात अंदाजे 9000 करोड (17 b|lon USD) रूपयाचे योगदानासोबत वीज व इथेनॉल उत्पादनाचा एक पर्याय सुध्दा आहे. आर्थिक व सामाजिक फायद्यामुळे ऊस हे भारतात भविष्यामध्ये महत्वाचे पीक असेल.

परंतु सध्या ऊस लागवडीत अनेक अडचणी आहेत. जसे कमी उत्पादन , वाणांची अवनती , कृषी निविष्ठांच्या वाढलेल्या किमती ,वाढलेल्या रोग व किडींचा प्रादूर्भाव. जमिनीची घसरलेली उत्पादकता, क्षारता, पाणी साचणे व दुष्काळ इ. मुळे ऊसाची लागवड सतत कमी होत आहे. पाणीटंचाइ हे देखिल उसाच्या कमी उत्पादनासाठी कारणीभूत आहे. ऊसाची पाण्याची मागणी ही 1500-3000 मि.मी. असून प्रमुख पिकांमध्ये ही सर्वात जास्त आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की, प्रत्येक एक किलो साखर तयार करन्यास अंदाज़े 2000 लीटर पाण्याची आवश्यकता असते. हयाचा अर्थ असा की, साखर उत्पादनासाठी भरपूर पाण्याची गरज लागते. SSI चा अवलंब केल्यास  फार मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर कमी करता येतो.

शास्वत ऊस लागवड़

तंत्रज्ञान SSI

SSI  हे तर उल्लेख केलेल्या विविध समस्यांचे निवारण करण्याचा प्रमुख पर्याय म्हणून सध्या उपलब्ध आहे. SSI हे कृषी तंत्रज्ञानाच्या विविध पध्दतीचा नाविण्यपूर्ण संच असून त्यामध्ये बेण्यांचा कमी वापर ,नर्सरीमध्ये रोपे तयार करणे , नवीन लागवड तंत्राचा वापर करणे,  झाडांमधील अंतर वाढविणे. अन्नद्रव्ये व पाण्याचे चांगले प्रबंधन इत्यादीमुळे ऊसाचे उत्पादन परिणामकार करित्या वाढविणे शक्य होते.

स्वतःच्या एस.एस.आय. प्लॉट मध्ये आनंदी शेतकरी

SSI  ची मुख्य तत्वे: जसे एक डोळा असलेला तुकडा वापरुन ऊसाची नर्सरी तयार करणे, 25-30 दिवसांची रोपे शेतात लावणे, दोन ओळीतील अंतर वाढविणे ( ४-६ *२ फुट )उसाला आवश्यक तेव्हडेच पाणी देणे, पाण्याचा अनावष्यक वापर टाळणे, सेंद्रीय खतांचा जास्तीत जास्त वापर करणे, चांगल्या आंतरमशागत व पीक संरक्षणाचे उपाय व आंतरपीक पध्दतीचा वापर ज्यामुळे जमिनीचा उपयोग अधिक कार्यक्षमतेने होतो. अशा कृषीपध्दती पूर्वीपासून वापरत होत्या षण त्या विष्काळीत होत्या. परंतु 2009 मध्ये डब्लूडब्लूएफ-इक्रीसँट(WWF-ICRISAT )च्या प्रकल्पात त्या प्रथमच एकत्रितरित्या राबविण्यात आल्या. एस.एस.आय SR| ही मुख्यतः R धानाच्या श्री (SR| ) पध्दतीच्या तत्यावर आधारलेली आहे. जी शेतक-यांमध्ये अतिशय फायद्याची ठरली आहे.

 

ऊसाची रोपवाटिका : एक नाविण्यपूर्ण एस.एस.आय.(SSI) पद्धती

पारंपारिक पध्दतीत ऊसाची लागवड ही उसाचे कांडे लावून केली जाते. परंतू SSI  पध्दतीत एक डोळा वापरुन रोपवाटिकेत तयार केलेले एक महिन्याचे रोप लावले जाते. त्यामुळे SSIला ‘बड ची टेक्नोलॉजी’ सुध्दा म्हणतात. ही पध्दती जरी अंदाजे 60 वर्षांपासून काही शेतक-यांना माहीत होती. परंतु शास्त्रशुध्द्र व एकात्मीकरित्य़ा हिला प्रसिध्दी देण्यात आली नव्हती. 1999 मध्ये SSIच्या नाविण्यपूर्ण पध्दतीची पुस्तिका  छापण्यात आली. ज्यामध्ये पिकाच्या प्रबंधनाची संपूर्ण माहिती चरणबध्द्र पध्दतीने दिली आहे.

SSI पध्दतीचे फायदे

SSI पध्दतीने लागवड  केलेल्या ऊस पिकात मुळांच्या जोमदार वाढीसोबतच जास्त फुटवे , जलद वाढलेली ऊसाची उंची व जाडी मिळते. ज्यामुळे जास्त उत्पादनासोबत साखरेचा उतारा सुध्दा वाढतो. ऊसाची  विरळ लागवड व पिकाच्या जलद वाढीमुळे किडी व रोगाची लागण फार कमी प्रमाणात होते. हा वेगळा फायदा SSI मुळे मिळतो. या शिवाय हेक्टरी सुमारे चार टन उसाची (कंडे) बचत, व रोपवाटिकेमुळे अगदी पहिल्याच महिण्यात ७% पाण्याची बचत होते. तसेच पिकाच्या संपूर्ण कालावधित विरळ लागवडी मुळे व ठिबक सिंचना  सारख्या तंत्राच्या वापरामुळे सुमारे 30% पाण्याची बचत होते. SSI पध्दतीमध्ये बीयाणे व उच्छादनाचे प्रमाण सुध्दा आश्चर्य कारक मिळेल. पारंपारिक पध्दतीने उस लागवड़ केल्यास 1:6 ते 1:8 असे है प्रमाण SSI पध्दतीमध्ये 9:60 ते 9:00  एवढे प्रचंड वाढते. त्यामुळे नवीन वाण्याची जलद वाढ पण होते.

SSI चा विस्तार

भारतात SSI ची संकलपना प्रायोगिक ततावर सर्वप्रथम भारतीय उपखंडातील आंध्रप्रदेशात व उत्तर प्रदेशात डब्लू डब्लू एफ –एक्रीसँट प्रकल्पांतर्गत राबविण्यात आली .२००९-२०१० मध्ये प्रत्येक राज्यात 10 हे वर  SSI  चे  यशस्वी प्रात्यक्षिक घेण्यात आले. याच कालावधीत दोन स्वयंसेवी संस्थाच्या सहकार्याने  13 हेक्टरवर SSI  चे  प्रात्यक्षिक ओडिशा राज्यात जो ऊसाचा सागरी किनारपट्टीचा प्रदेश आहे व पंजाब राज्यात 4 हे.क्षेत्रावर घेण्यात आले. उस  लागवडीच्या तीन वेगवेगळया प्रदेशात घेतलेल्या प्रात्यक्षिकांचे आशादायक व अपेक्षा जास्त यशामुळे एजोश्री AG SRI) ने प्रकल्पाच्या समाप्तीनंतर एफ-इक्रिसेंट घेतली.

2010 मध्ये स्थापन झालेली AG SRI ही संस्था SS। पध्दतीचे परिक्षण, सुधारणा व प्रसार भारतातील ऊस उत्पादक प्रदेशात करीत आहे SRI हया सामाजिक उपक्रमाअतर्गत SRI व SSI चा प्रसार भारतातल्या अनेक कृषी हवामान प्रदेशातील शेतकयांमध्ये उतादन खर्च व पाण्याचा वापर कमी करण्यासाठी करीत आहे आतापर्यंत साखर कारखाने व स्वयंसेवी संस्थांच्या सहयोगाने AG SRI ही संस्था SSI पद्धतीचे परीक्षण , सुधारणा व प्रसार भारतातल्या अनेक कृषी हवामान प्रदेशातील शेतकऱ्यांमध्ये उत्पादन खर्च व पाण्याचा वापर कमी कमी करण्यासाठी करीत आहे. उत्तर प्रदेश, ओडीशा , कर्नाटक, आंध्रप्रदेश  व महाराष्ट्रामध्ये सुमारे १००० एकरवर करण्यात आले हयाचे अतिशय चांगले परिणाम मिळाले. सर्व शेतात उत्पादनात परिणामकारक वाढ झालेली दिसली. AG  SRI ने हजारो शेतक-यांना SSl  वापरण्यासाठी प्रशिक्षण दिले व सोबतच त्यांच्या लहान रोपवाटिका तयार केल्या. AG  SRI ही पध्दती सुधारण्यासोबतच लागवड पध्दती तयार करणे व वाणांचा हवामानानुसार प्रतिसाद परिक्षण करण्याचे सुध्दा काम करीत आहे. सध्या  SSI अतिशय प्राथमिक अवस्थेत असून त्यामध्ये अनेक सुधारणा जसे गुणवत्ता सुधारणे. उत्पादन खर्च कमी करणे इ. करण्याचा वाव आहे. थोडक्यात नर्सरी तयार करण्याच्या आदर्श परीचलन पध्दतीचा अवलंब केल्यामुळे SSI  चे क्षेत्र वाढविण्यास फार मदत होईल. आणि AGS चं संस्था त्याच कामात सद्या गुंतवेल आहे.

समोरची वाटचाल

धानाच्या ‘श्री'(SRI) पध्दतीप्रमाणेच ss। सुध्दा ऊस लागवडीमध्ये गुणवत्त सुधारण्यासोबत उत्पादन वाढीसाठी चांगली संधी उपलब्ध करते . उस हे जास्त पाण्याची गरज असलेले  पीक आहे व SSI  ही पाण्याच्या टंचाईवर एक चांगला पर्याय देते. कमीत कमी संसाधने वापरून, उत्पादन खर्च कमी करून व ऊसाची उत्पादकता वाढवून SSI ही ऊसाची वाढती मागणी पूर्ण करण्याचा एकमेव उपाय आहे.

SSI ही पर्यावरणपुरक लागवड पध्दती असून ज्यामुळे पर्यावरणाचा कमीत कमी ऱ्हास होत असल्यामुळे फार वेगाने तिचा प्रसार भारतात तर होतच आहे. परंतु दुस-या देशांमध्ये जसे कयुबा इ. मध्ये सुध्दा तिचा प्रसार होत आहे.SSI  ही एक आदर्श ऊस लागवड  पद्धती म्हणून संपूर्ण भारतातील उस पट्ट्यात प्रचलित होईल . ह्याला काही कालावधी लागू शकतो परंतु पुढील दशकात भारतातील लहान व मध्यम शेतकरीच नव्हे तर जगातील अनेक देशात SSI चा वापर वाढलेला असेल. परंतू हयासाठी लोकांचे व सार्वजनिक उपक्रमाची व खाजगी उद्योग क्षेत्रात भागीदारी प्रभावी राहील .

हया सर्व बाबीसोबतच SSl ला वाढविणे, माहितीचा प्रसार, सार्वजनिक |Public) सहभागाने चालणा-या उस संशोधन संस्था जास्त चांगला साखरेचा उतारा मिळण्याची अपेक्षा असलेले साखर कारखाने यांच्यासोबत काम करणे हे एक आव्हानच आहे.

SSI च्या  कार्यपध्दतीच्या आहानासोबतच संशोधनाच्या काही बाबी जसे डोळ्याची (बडचीप ) गुणवत्ता सुधारणे, डोळा काढण्याचे सुधारित अवजार, ज्यामुळे हे काम जलद गतीने होईल व काढलेल्या ਨਦੀ न घसरता साठवणूक करण्याची पध्दती व रोपवाटीकेचा खर्च कमी करणे हयाकडे लक्ष द्यावे लागेल. ज्यामुळे AG श्री ही त्यांच्याजवळ असलेल्या मर्यादित संसाधनाद्वारे ह्यापैकी काही विषयांवर कार्य करीत आहे.

 

स्त्रोत - लिजा इंडिया© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate