অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शेती उत्पादक संस्था

मुत्तलूरचे शेतकरी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक संस्था (FPO) स्थापन करून शेतमालाच्या ग्राहक विक्रीमुल्यात जास्तीत जास्त वाटा मिळवीत आहेत. उत्पादक संस्था स्थापन केल्यामुळे शेतक-यांची व्यापारी व दलाल यांच्यामार्फत होणारी लूट तर थांबलीच, परंतु नविन बाजारपेठा, वेळेवर पतपुरवठा व उत्कृष्ठ कृषिनिनिष्ठा उपलब्ध झाल्या. हे सर्व शेतक-यांच्या सामुहिक व संघटीत प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे.

प्रस्तावना

करानुसार सुक्ष्म पाणलोट क्षेत्रातील बहुतांश शेतकरी हे भुमीहिन किंवा सीमांतर व लहान शेतकरी आहेत. जवळपास 500 हेक्टरचे हे सुक्ष्म पाणलोट क्षेत्र तामिळनाडू राज्यातील निळूपूरम जिल्ह्यातील वानुर तालुक्याच्या नल्लातून उपपाणलोट क्षेत्रामध्ये येते. या भागात पावसाचे प्रमाण सुमारे 1200 मि.मि असून जिल्ह्यामध्ये सरासरी पेक्षा थोडे कमी आहे.

या पट्टय़ातील माती रेताळ गाळाची व चिकट गाळाची या प्रकारची असून जवळपास 10 टक्के जमीन ही चोपन आहे. हवामानातील विविध घटकांमुळे या भागातील शेती ही आर्थिकदृष्ट्या फायद्याची नसल्यामुळे अन्नधान्य उत्पादन व उत्पन्न याची शाश्वती नव्हती. या सर्व बार्बी तेथील शेतकल्यांच्या अस्थिर जीवनमानाला कारणीभूत होत्या.

करासनुर व त्यालगतच्या परिसरामध्ये भात व कांदा ही मुख्य पिके होती. या भागातील शेतक-यांची जमिनधारणा 2 ते 3एकर असून अंदाजे 250 एकर क्षेत्रावर कांदा लागवड केल्या जाते. हे शेतकरी कांद्याच्या मुत्तलूर हया स्थानिक वाणाची लागवड करतात. ह्या वाणाच्या विशिष्ट उग्रतेमुळे हया वाणाला निर्यातींसाठी व स्थानिक बाजारपेठेत चांगलीच मागणी असते. कांद्याच्या हया वाणाला 2 ते 4 फूटने असून ह्याचा साठवण कालावधी हा अंदाजे 15 दिवसांचा आहे. ह्या वाणाचे बियाणे तामिळनाडू जिल्ह्यातील कुइडालोर जिल्ह्यांतून उपलब्ध होते. शेतकरी कांद्याची काढणी झाल्याबरोबर, कांदे लगेचच व्यापाऱ्यांना विकत होते. कारण जास्त कालावधीपर्यंत साठवून ठेवल्याने कांद्याच्या वजनात 80 टक्के घट येत होती. गावातच विक्री केल्यामुळे शेतक-यांना  विक्रीचा पैसा लगेचच उपलब्ध होत होता. कांद्याचा उत्पादन खर्च हा  अंदाजे रुपये 27,388/- प्रती एकर असून त्यामध्ये जवळपास 58 टक्के मजूरीवर खर्च होतात. कांद्याचे सरासरी उत्पादन44 क्विंटल प्रती एकर आल्यास, शेतक-यांना रु.44,000/- उत्पन्न मिळत होते.

व्यापारी शेतक-यांकडून घेतलेल्या मालाची चिल्लर किंवा घाऊक विक्री व साठवणुकीद्वारे जास्त नफा मिळवत होते. काही व्यापारी  कांद्याला वाळवून , प्रतवारी व साठवणुकीद्वारे जास्त नफा मिळवत होते . काही व्यापारी कांद्याच्या निर्यांतीसाठी चांगला व गुणवत्तापूर्वक माल खरेदी करून मलेशिया, सिंगापूर इत्यादी ठिकाणी नियतिकालाविकत होते. काद्याच्या उत्पादनामध्ये ह्या शेतक-यांची जवळपास 74.7 टक्के गुंतवणूक लागत होती. तसेच व्यापारी, घाऊक विक्रेते व किरकोळ विक्रेते ह्यांचा गुंतवणूक खर्च अनुक्रमे 6.42 %, 15.12%, व 3.75% होता. नफ्याचा विचार केल्यास व्यापारी 18.8% घाऊक विक्रेता 42.78% व चिल्लर विक्रेता 21.63% कमवित होते. परंतू शेतक-याला मात्र फक्त  १७.४३% नफा मिळत होता. म्हणजेच कांदा उत्पादन घाऊक व चिल्लर  विक्रेते कमी जोखमीमध्ये व गुंतवणूकीमध्ये जास्त नफा कमवित होते. परंतुशेतक-यांला मात्र जास्त जोखीम घेऊन जास्त खर्च करुन कमी नफा मिळत होता.

हवामानाला पुरक शेती पद्धतीचा अवलंब

एम.एस. स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन, चेन्नई या संस्थेद्वारे 2007 मध्ये ‘समुहाद्वारे', 'नैसर्गिक संसाधनाचा समतोल ढापर व जीवनमान उंचावण्यासाठी जेंव- ऑद्योगिक पाणलोट क्षेत्र विकास' (Community  managed Bio-industrial water shades for sustainable used of natural resources and enhanced livelihood)  हा  प्रकल्प करासनुर पाणलोट क्षेत्रासोबतच भारतातील चार राज्यातील पाच कृषी हवामान विभागातील क्षेत्रांवर राबविण्य़ात आला. संस्थेने ग्रा प्रकल्पाअंतर्गत शेतक-यांच्या शेती शाळेद्वारे प्रत्येक गावात शेतकरी उद्योग

स्त्रोत - ए. एल. सी. आय. चा बी. आय . डब्लू .एस . अहवाल

समूह (FBG: Farmer's Business Groups) शेतकऱ्यांना सूक्ष्म  पतपुरवठा व इतर सुविधा उपलब्ध व्हाळ्या ग्रा उद्देशाने स्थापन करण्यात आले . शेतकरी उद्योग समुहाच्या सदस्यांच्या बैठकीत शेतीच्या विशेषतः कांदा लागवडीसाठी येणा-या विविध समस्यांचे जसे निकृष्ठ विष्याणे, लागवडीच्या वेळेतील अनियमितता, अपूरा क् अनियमित पाऊस, किंड क् रोगांचा प्रादुर्भाव व उत्पादीत मालाला मिळत असलेला अत्यल्प भात इत्यादींवर चर्चा करुन त्याचे विश्लेषण करण्यात आले. वरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी चरणवठ्ठ उपाययोजना तयार केल्या गेल्या. हया सर्त उपाययोजना सर्व समुद्दाला मान्य, पर्यावरणाला पुरफ तसेघ आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही याची संपूर्ण खातरजमा करण्यात आली

शेतक-यांच्या शेती शाळेत, शेतकरी उद्योग समुहाच्या बैठकीत ठरविण्यात आलेल्या लागवट्टपूर्व (Presowing), पिक उत्पादन (Cropproduction)d (Post Harvest ) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.. ह्या तंत्रज्ञानाच्या वापरातून मिळालेला फायदा व निरिक्षणे यांच्या नोंदी घेण्यात आल्या. शिवार फेरींमध्ये ह्या तंत्रज्ञानाची माहिती प्रात्यक्षिक कार्यक्रमात प्रशिक्षित शेतक-यांद्वारे समुहातील इतर शेतक-यांना देऊन परिक्षणाद्वारे ठरविलेले आवश्यक भुसुधारके, सरी वरंभा पद्धती, प्रती Uकरी रोपांची संख्य़ा (88000 प्रती प्रकर), दोन ओळीतील अंतर 45 सें.मी., रोपातील अंतर 10 सें.मी. अतिरिक्त पाण्य़ाचा निचरा, एकत्मिक कीड़ व रोग नियंत्रण इत्यादी वावींचा अवलंब करून लवकर व Uकाच वेळेस कांद्याची लागवड करण्यास प्राधान्य देण्यांत आले. लवकर लागवडीमुळे पावसाळयापुर्वी कांद्याची काढणी करणे शक्य झाले. गावात असलेल्या हवामान केंद्राच्या हवामान वाबतच्या सूचना या गावातील माहिती केंद्राद्वारे (VKC : Village Knowledge Centre) द्वारे शेतक-य़ाना वेळोवेळी देण्यात आल्या. गांवातील हवामान जोखीम प्रबंधकाद्वारे शेतक-यांना हवामानात होणा-या बदलांचे पिकांवर  होणारे परिणाम व घ्यावयाची  काळजी ग्रांचे प्रशिक्षण देण्य़ात आले.

व्यापाऱ्यांशी चर्चा करताना शेतकरी

पुटूचेरीतील पिल्लीयारफुप्पम गावातील ग्रामसंसाधन केंद्र (VKC : Village Knowledge Centre) ने नल्लाहूर गावातील ग्राममाहिती केंद्राशी VKC संलग्न असून, ग्राम माहिती केंद्रासाठी जागा, वीज व एका कर्मचा-याचे वेतन हे ग्रामपंचायतीद्वारे देण्यांत येते. दहा पाणलोट क्षेत्रातील असलेल्या गावातील शेतकरी व महिला या दररोज WKC ला भेट देऊन दैनिक हवामानाचा अंदाज , पिक उत्पादनात येणाऱ्या समस्या शासनाच्या  विविध योजना, नविन तंत्रज्ञान व बाजारपेठ इत्यादी विषयी माहिती घेतात. या प्रकल्पातील सर्व शेतकरी दर पंधरवाड्यात ग्रामसंसाधन केंद्राशी VKC मोबाईलद्वारे एस.एम.एस. किंवा आवाजी एस.एम.एस. द्वारे संपर्कात राहून, शेती शाळेत (FFS : Farmer's Field School) मध्ये पिकांच्या लागवडीसंबंधी आवश्यक सूचना व माहिती प्राप्त करतात. दर महिन्यात एकदा फोनद्वारे विशेषज्ञांशी संपर्क करुन पिकांच्या उत्पादनाबाबत माहिती घेतात.

या प्रकल्पामुळे 2008 मध्ये कांदा उत्पादन घेणा-या सदस्य शेतक-यांची संख्या 23 वरुन वाढून 400 पेक्षा जास्त झाली व कांद्याचे उत्पादन 25  शेतकरी  उद्योग समूहाच्या ४०० च्या वर सभासद शेतकरी असून कांदा व धान लागवड करीत आहे . या संघाचे कार्य स्वामिनाथन फाउंडेशन हे माहिती   व तंत्रज्ञान पुरविण्याचे कार्य सांभाळत आहेत . शेतकरी उत्पादक संघाची कार्यकारी समिती मासिक बैठका , विविध कृषी निविष्ठांची खरेदी , उत्पादित मालाची विक्री , आर्थिक नियोजन व संचालनाचे काम करते .शेतकरी उत्पादक संघातील सदस्यांच्या इतर संघाला दिलेल्या अभ्यासपूर्व भेटीमुळे शेतकर्यांना संघाचे कार्य चांगल्या पद्धतीने चालविणे शकत झाले. शेतकर्यांना शेतकरी उत्पादक संघ  शेतमालाच्या  विक्री  व्यवस्थेसाठी व व्यापाऱ्यांशी  विक्री व्यवहार  करण्यासाठी 2011 मध्ये विपणण समितीची (Marketing Committee) स्थापना करण्यात आली. या समितीद्वारे कांद्याच्या बाजारभावाची नजिकच्या व चेन्नई येथील बाजारपेठां मधील अद्यावत माहिती ग्राम माहिती केंद्रात (VKC) शेतक-यांना उपलब्ध होत होती. कांदा विक्रीसाठी मुदतीच्या करार केल्यामूळे त्यांना या प्रक्रियेत आणणे एक प्रकारचे आक्ष्हान होते. शेतकरी उत्पादक संघामुळे वेंध व्यापार पद्धतीचा अवलंब होतून मालाला चांगली किंमत, अचूक वजन व इतर सुविधा मिळू लागल्या. संघाला कांद्याच्या एका बेंगला 1200 रु. निर्यात मुल्यावर चेन्नईला भाव मिळाला व स्थानीक बाजारपेठेत B50 रु.प्रती गोणी हा भाव मागणे शक्य झाले. 2012 मध्ये आजूबाजूच्या गांवातील शेतकरी उत्पादक संघ FPO एकत्रित येतून शेतक-यांनी कांद्याचे उत्पादन हे चेन्नईला निर्यांतीसाठी पाठविले व त्यामुळे शेतक-यांना स्थानीक बाजारपेठेतील  900  रु. प्रती गोनी या भावाएवजी १७०० रु.प्रती गोनी हा भाव मिळणे शक्य झाले. यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढवून संघाच्या कार्यपद्धती  मध्ये संघटितपणे काम करण्याची प्रेरणा मिळाली . शेतकरी उत्पादक संघांनी भाविश्यांमध्ये मालाची प्रतवारी , वळवणे तसेच शास्त्रशुद्ध साठवनुकीद्वारे  शेतमालाची गुणवत्ता मूल्यवर्धन  करून त्याद्वारे चांगली किंमत मिळविण्याची योजना आखली आहे.

 

स्त्रोत - लिजा इंडिया

अंतिम सुधारित : 7/27/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate