অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

समूह शेतीमधून बदलले सुकळी

अकोट तालुक्यातील सुकळी हे गाव सातपुड्याच्या पायथ्याशी असणारे एक सामान्य शेतकरीबहुल गाव. सातपुड्याच्या पायथ्याशी असल्यामुळे सुपीक जमिनीचा प्रदेश. जवळच ५ किलोमीटरवर पोपटखेड प्रकल्प, पण सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी. त्यामुळे सिंचनाची सोय म्हणजे विहिरी आणि बोअरवेल. पण तरीसुद्धा इथल्या शेतक-यांचे जगणेही इतर सामान्य शेतक-यांसारखे खडतर. कारण, तुकड्यांमध्ये विभागलेली शेती; त्यामुळे शेतीवर वाढता उत्पादन खर्च, वातावरणाचे आव्हान, शेतमाल वाहतुकीच्या अपु-या सोई, मालवाहतुकीचा खर्च, शेतमाल विक्रीव्यवस्थेत होणारी शेतक-यांची लूट या सर्व गोष्टींमुळे शेती व्यवसाय हा तोट्याचा व जोखमीचा बनला होता. हे चित्र समूहू शेतीच्या एकीने सुकळीतील काही तरुण शेतक-यांनी बदलवले. गावातील तरुण शेतकरी व अनुभवी व्यक्तींनी 'आत्मा ' आणि कृषि विभागाच्या सहकार्याने शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्थेचा आविष्कार घडवून समूहू शेती यशस्वी केली.

समूहू शेतीचा ब्रँड

९ जुलै २०१२ रोजी गावातील युवकांनी एकत्र येऊन आदर्श शेतकरी स्वयंसहायता बचत गट, सुष्कळीची स्थापना केली. तुकड्यातुकड्यांमध्ये केल्या जाणा-या शेतीवर होणा-या अवास्तच उत्पादन


खर्चातून वाचून समूहाने शेती करत कमी खर्चात जास्त नफा मिळविण्याच्या हेतूने गटाचे कार्य सुरू झाले. समूह गट शेतीकरिता शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेत गटातील शैतक-यांच्या शैतमालाची एकत्रित विक्री करत नफा मिळवत आर्थिक फायदा मिळविण्यात आला.

गव्हाचे विक्रमी उत्पादन

पहिल्या वर्षी गटातील सदस्याच्या ८० एकर शेती क्षेत्रावर मध्य प्रदेशातील शरबती तथा सागर वन या वाणांची लागवड करण्यात आली. या प्रकल्पात एकरी १२ ते १४ क्रॅिटलच्या सरासरीने विक्रमी ९oo क्रॅिटल गव्हाचे उत्पादन घेण्यात आले. कोड, रोग, नैसर्गिक आपत्ती आदींवर मात करत मिळवलेल्या शैतमालाचा योग्य मोबदला शैतक-यांना मिळत नसल्याची भावना कमी अधिक प्रमाणात सर्वच शेतक-यांना भेडसावते. यावर मात करायची म्हणून गटाने आपला माल ह्य आपणच शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्थेद्वारे विकायचा, असे ठरवून त्याकरिता अकोट शहरातील खासगी आस्थापनाद्वारे गव्हाची योग्य प्रतवारी व प्रक्रिथा करून घेण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांची योग्य विक्री पॅकिंग करुन घेण्यात आली. अशा प्रकारे अकोट शहरात थेट शेतकरी ते ग्राहक या तत्त्चावर विक्री सेवा केंद्र सुरू करण्यात आले. बाजारभावापेक्षा कमी किमतीत माल मिळत असल्याने ग्राहक या उपक्रमाकड़े आकर्षित झाले.

श्री गणेश द्वंड या उपक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी अकोट शहरात हॅडबिल - छापून वृत्तपत्राद्वारे वाटण्यात बाह्ययला लागली. मोबाईल फोनद्वारे नांदणी, घरपोंच सेंचा ५0 किलो सोईस्कर पॅकिंग आर्दीमुळे अकोट ` शहरात शेतक-यांचा 'श्री गणेश बेंड' अल्पावधीतच लोकप्रिय व विश्वासार्ह  झाला. या उपक्रमामुळे शेतकरी गटाकड़े ४,000 ग्राहकांशी नाते जोडले गेले आहे. पण, गटाला इथेच थांबायचे नव्हते. जसजशी मागणी वाढत गेली, तसतशी गटाची लागवड क्षेत्र व त्याप्ती वाढायला लागली. सुरवातीला गटाच्या पातळीवर  राबवलेल्या या उपक्रमामुळे गेल्या — वर्षी लागवड क्षेत्र हे १२० ते १८० खर्चातून वाचून समूहाने शेती करत कमी खर्चात जास्त नफा मिळविण्याच्या हेतूने गटाचे कार्य सुरू झाले. समूह गट शेतीकरिता शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेत गटातील शैतक-यांच्या शैतमालाची एकत्रित विक्री करत नफा मिळवत आर्थिक फायदा मिळविण्यात आला.

गव्हाचे विक्रमी उत्पादन

पहिल्या वर्षी गटातील सदस्याच्या ८० एकर शेती क्षेत्रावर मध्य प्रदेशातील शरबती तथा सागर वन या वाणांची लागवड करण्यात आली. या प्रकल्पात एकरी १२ ते १४ क्रॅिटलच्या सरासरीने विक्रमी ९oo क्रॅिटल गव्हाचे उत्पादन घेण्यात आले. कोड, रोग, नैसर्गिक आपत्ती आदींवर मात करत मिळवलेल्या शैतमालाचा योग्य मोबदला शैतक-यांना मिळत नसल्याची भावना कमी अधिक प्रमाणात सर्वच शेतक-यांना भेडसावते. यावर मात करायची म्हणून गटाने आपला माल ह्य आपणच शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्थेद्वारे विकायचा, असे ठरवून त्याकरिता अकोट शहरातील खासगी आस्थापनाद्वारे गव्हाची योग्य प्रतवारी व प्रक्रिथा करून घेण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांची योग्य विक्री पॅकिंग करुन घेण्यात आली. अशा प्रकारे अकोट शहरात थेट शेतकरी ते ग्राहक या तत्त्चावर विक्री सेवा केंद्र सुरू करण्यात आले. बाजारभावापेक्षा कमी किमतीत माल मिळत असल्याने ग्राहक या उपक्रमाकड़े आकर्षित झाले.

श्री गणेश द्वंड या उपक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी अकोट शहरात हॅडबिल - छापून वृत्तपत्राद्वारे वाटण्यात बाह्ययला लागली. मोबाईल फोनद्वारे नांदणी, घरपोंच सेंचा ५0 किलो सोईस्कर पॅकिंग आर्दीमुळे अकोट ` शहरात शेतक-यांचा 'श्री गणेश बेंड' अल्पावधीतच लोकप्रिय व विश्वासार्ह | झाला. या उपक्रमामुळे शेतकरी गटाकड़े ४,000 ग्राहकांशी नाते जोडले गेले आहे. पण, गटाला इथेच थांबायचे नव्हते. जसजशी मागणी वाढत गेली, तसतशी गटाची लागवड क्षेत्र व त्याप्ती वाढायला लागली. सुरवातीला गटाच्या पातळीवर  राबवलेल्या या उपक्रमामुळे गेल्या — वर्षी लागवड क्षेत्र हे १२० ते १८० शेतीमुळे पीक उत्पादनासाठी होणा-या खर्चातून सूट मिळाली. समूहू शेतीमुळे यांत्रिकीकरणापासून मशागतीपर्यंत खर्चातून होणा-या त्रासातून शेतक-यांची सुटका झाली. यामुळे गटाला कृषि विभागाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पांतर्गत १०० एकरांचे बियाणे, सूक्ष्म अन्नद्रव्ये, तणनाशक, बुरशीनाशक, संजीवके आर्दी कृषि विभागाकडून विविध कार्यशाळा प्रकल्प भेटी आदींचे आयोजन करण्यात आले. या प्रात्यक्षिकांमधून उत्पादित गहू बाजारभावाने गावामध्येच आदर्श गटामार्फत खरेदी करण्याविषयी करार करण्यात आला. प्रकल्पांतर्गत हिरकणी शेतकरी उत्पादक कंपनी, बोडीं या उत्पादक कंपनीचा आदर्श उत्पादक गट हा एक भाग आहे. त्याप्रमाणे उत्पादित मालाची एकूण ८oo क्रॅिटलची खरेदी गटामार्फत हिरकणी शैतकरी उत्पादक कंपनीच्या सहाय्याने करण्यात आली.

गटाला मार्गदर्शन

हंगामाच्या शेवटी १०० एकरांमधून एकूण ८०० किंटल गहू उत्पादन मिळाले. थेट विक्रीच्या दृष्टीने सदर बियाण्यांची प्रक्रिया साठवणूक वाहतुकीसाठी शेतक-यांना ३ ते ४ लाख रुपये खर्च येणार होता. तसेच खासगी प्रक्रियादारावर अवलंबून राहण्याची वेळ होती. या खर्चामध्ये बचत करून धान्य सफाई व प्रतवारी केंद्र गावामध्येच सुरू करण्याबाबत 'आत्मा' यंत्रणेतील अधिका-यांनी शेतकरी गटाला मार्गदर्शन केले. तसेच मागील वर्षी उत्पादन ते थेट विक्रीदरम्यान आलेल्या अडचणी व चुका या गोष्टींवर मात करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. त्यानंतर गावातील १९ शेतक-यांनी पुढाकार घेऊन नियोजनानुसार एकूण रु. २२.८७ लाख इतक्या रुपयांच्या सामूहिक धान्य प्रक्रिया व प्रतवारी केंद्राची उभारणी केली. त्याकरिता 'आत्मा' यंत्रणेतील महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पांतर्गत कृषि उद्योजकता घटकांतर्गत रु. ६.०० लाख अनुदान मंजूर करण्यात आले.

प्रकल्प तपशील

  1. प्रकल्पाचे नाव ; सामूहिक धान्य प्रक्रिया व प्रतवारी केंद्र
  2. गटाचे नाव : आदर्श स्वयं सहाय्यता शैतकरी गट
  3. गट सदस्यसंख्या
  4. प्रकल्पाचे ठिकाण : मौजे सुकली, ता. अकोट, जि. अकोला
  5. एकूण प्रकल्पाची किंमत : रु. २२.८७ लाख
  6. लाभाथीं हिस्सा : रु. ९.९cy लाख
  7. बँक कज़ :U9.0.C.
  8. प्रकल्प अनुदान : २, ५.१७ लाख


गावस्तरावर मिळाली बाजारपेठ

श्री गणेश ग्रँडच्या यशाने गन्ह्याच्या थेट विक्रीसाठी गावस्तरावरच विक्रीसाठी वाहनखर्च, अडत, बाजारभावातील फसवणुकींपासून सुटका मिळाली आहे. त्यामुळे शेतक-याच्या उत्पादन खर्चात कपात, तर उत्पन्नात वाढ झाली आहे. अशा प्रकारे शैतक-यांना गावस्तरावरच बाजारपेठ मिळाली.

अधिका-यांच्या भेटी

'आत्मा'चे प्रकल्प संचालक श्री. अशोक बाणखेले व प्रकल्प उपसंचालक श्री. कुरबान तडची तसेच श्री. नरेंद्र पाटील, कृषि पणन तज्ज्ञ यांनी शेतक-यांना वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व प्रोत्साहन यांमुळे प्रकल्पाच्या कार्याला गती आली. एप्रिल २०१५मध्ये जिल्ह्याधिकारी श्री. अरुण शिंदे, नीडल अधिकारी श्री. शितोळे, राज्यस्तरीय अधिकारी व जिल्ह्या अधीक्षक कृषि अधिकारी श्री. प्रमोद लहाळे यांच्या उपस्थितीत प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन झाले आहे.

गटाचा विविध पुरस्कारांनी गौरव

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी राज्यस्तरीय कार्यशाळेत आदर्श स्वयंसहायता गटाला उपक्रमांची माहिती देण्याची संधी मिळाली. गटाच्या कामगिरीबद्दल रोटरी क्लबातर्फे 'दीपस्तंभ पुरस्कार' व लोकमत समूह्यमार्फत 'कृषिरत्न पुरस्कार' मिळाले आहेत.

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

अंतिम सुधारित : 8/3/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate