पुणे ते बंगळूर महामार्गावर काशीळपासून पश्चिमेस सहा किलोमीटरवर पाल गाव आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील लाखो भाविकांचे कुलदैवत श्री खंडोबा देवस्थान याच गावात आहे. गावच्या शेतीचे संपूर्ण क्षेत्र मध्यम प्रतीचे आहे. शेतीत ऊस, आले, झेंडू या मुख्य पिकांबरोबर भाजीपाला पीक पद्धत आहे. तारळी नदीवरील सिंचन व विहिरीद्वारा समप्रमाणात गावच्या शेतीला पाणी मिळते. गावातील संजय बाबासाहेब गोरे अलीकडील दहा वर्षांत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीतच प्रगतशील शेतकरी म्हणून पुढे आले आहेत.
गोरे यांची वडिलोपार्जित 12 एकर शेती. खरेदी आठ एकर व खंड स्वरूपाने 10 एकर अशा एकूण 30 एकर शेतीचे ते व्यवस्थापन सांभाळतात. थोरले बंधू दयानंद सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात प्रशासन विभागात नोकरीस आहेत. ते रविवारी संजय यांना शेतीत मदत करतात. गोरे यांच्याकडे 10 महिला व दोन मजूर बारमाही कार्यरत आहेत. गेल्या चार-पाच वर्षांत त्यांनी आले, पपई पिकात झेंडू व पपईच्या आंतरपिकावर भर दिला आहे. शेतीत साखळी पद्धती राबवल्याने आर्थिक नफा कमावणे शक्य झाले आहे. सध्या त्यांच्याकडे आडसाली ऊस, आले, कलिंगड, सोयाबीन, पपई व झेंडू अशी पीक पद्धत आहे.
आल्यात पपई व झेंडू तसेच पपईतही झेंडू आहे. पपईतील झेंडूची सध्या काढणी सुरू आहे. पपई व झेंडू पिकाची साखळी पद्धतीने लागवडी करून त्याद्वारा मुख्य पीक ऊस व आल्याचे निव्वळ उत्पन्न हाती घेण्याच्या दृष्टीने लक्ष केंद्रित केले आहे. झेंडूचे पीक फेरपालट म्हणून घेतले जाते. ऊस व आले पिकातून उत्पादन मिळेपर्यंत झेंडू व पपईतून टप्प्याटप्प्याने उत्पन्न सुरू ठेवण्याचा गोरे यांचा प्रयत्न राहिला आहे. झेंडू व पपईच्या उत्पन्नातून बियाणे, खते व आंतरमशागतीचा खर्च पेलला जातो. यंदा 5 मे, 10 मे व 25 मे अशी पाण्याच्या नियोजनानुसार टप्प्याटप्प्याने आले लागवड केली आहे. आल्यात झेंडूची लागवड आहे. त्याच प्लॉटमध्ये दोन ओळींमधील अंतर नऊ फूट ठेवून पपई लागवड केली आहेपीक पद्धतीच्या बदलास सुरवातसन 1995 मध्ये बीए झाल्यानंतर नोकरी न करता गोरे शेतीकडे वळले.
सुरवातीला प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या. प्रायोगिक तत्त्वावर थोडक्या क्षेत्रात आले घेतले. उत्पन्न वाढवण्यासाठी पारंपरिक शेतीला बगल देत 2002 मध्ये सूक्ष्म सिंचनाद्वारा आले पिकाची बेडवर (गादीवाफा) लागवड केली. एक एकर क्षेत्रात 20 गाड्यांचे (प्रति गाडी 500 किलो) उत्पादन मिळाले. अडीच लाख रुपयांचा नफा मिळाला. तेथून शेतीत नवे तंत्रज्ञान व पीकबदल या बाबींचा अवलंब सुरू केला. शेताला नदीवरील सिंचन व विहिरीचे पाणी मिळते. नदीपासून वडिलोपार्जित क्षेत्र आठ हजार फूट अंतरावर असल्यामुळे पाइपलाइन करताना सुरवातीला तीन हजार फुटांपर्यंत पाइपलाइन करून त्याशेजारील चार एकर क्षेत्र खंडस्वरूपाने घेतले. त्यात टोमॅटो, वांगी, आले व ऊस ही पिके घेतली. मिळालेल्या उत्पन्नातून पुढे दोन हजार फूट पाइपलाइन केली. त्या टप्प्यात वडिलोपार्जित तीन एकर क्षेत्र पिकाखाली आले. पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर कमी कालावधीची पीक पद्धत सुरू केली.
गेल्या वर्षी सात एकरांत आले पिकातून पहिल्या टप्प्यात 55 टन उत्पादन मिळाले. उत्पादित मालाची मुंबई बाजारपेठेत विक्री केली. त्यास प्रतिटन 60 हजार रुपये दर मिळाला. आंतरपिक झेंडूतून एकरी सव्वादोन टन उत्पादन मिळाले. त्यास प्रति किलो सरासरी 35 रुपये दर मिळाला. पाच लाख 51 हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले. बारा एकर लागवड व खोडवा उसाचे एकूण 750 टन उत्पादन मिळाले.
दर वर्षी तीन टप्प्यांत झेंडू लागवड होते. सध्या चार एकर पपईतील झेंडूच्या दोन तोड्यांपासून 92 क्रेट (प्रति क्रेट 12 किलो) माल उत्पादित झाला. त्यास दादर (मुंबई) येथील मार्केटला प्रति किलो सरासरी 60 रुपये दर मिळाला. दीड एकरात मार्च 2014 मध्ये कोलकता वाणाच्या झेंडूची लागवड केली. आतापर्यंत 15 टन माल उत्पादित झाला. त्यास प्रति किलो 30 रुपये दर मिळाला. गोरे यांना
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
कोणी जख्मी झाले किंवा अचानक अजारी पडले, अशा संकटक...
या पध्दतीचा उपयोग केवळ पाळणा लांबवण्यासाठी नाही तर...
आल्याचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठ...
१५ ते ४० वयोगटातील स्त्रियांनी पाळणा लांबवण्याचा प...