অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सेंद्रिय मिश्रपिकाची शेती - उत्पादन आले भरघोस हाती

सेंद्रिय मिश्रपिकाची शेती - उत्पादन आले भरघोस हाती

सेंद्रिय पद्धतीने मिश्रपीक शेती

सेंद्रिय पद्धतीने विविध भाजीपाला व मिश्रपिकांची यशस्वी लागवड पूर्वी मिश्रपीक पद्धतीनेच शेती करण्यात येत होती. कपाशीमध्ये तुरीच्या ओळी, ज्वारीमध्ये बरबटी/चवळी, मूग, उडीद तर तुरीच्या ओळीत ज्वारी, हरभरा इ. लागवड करण्यात येत असल्यामुळे उत्पादन चांगले येत होते.

२५-३० वर्षापासून संकरित बियाणे विकसित झाल्यापासून त्यामुळे पिकाची पद्धती बदलली. त्यात मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन, कपाशी, ज्वारी सातत्याने घेतल्याने उत्पादनात घट येऊ लागली. परिणामी रासायनिक खते आणि विषारी कोडनाशकांचा वापर अधिक प्रमाणात वाढला. कारण आलेल्या संकरित जातीचे बियाणे काही नवीन रोग व किडी घेऊन आले.

जरी सुरुवातीला उत्पादनात वाढ दिसली तरी झाल्या, पाणी व हवा प्रदूषित झाले. शेतकरी कर्जबाजारी झाला. कारण तो निसर्गनियमाच्या विरोधात गेल्यामुळे ज्या काळ्या मातीला आपण आई समजतो तिचे काही ठिकाणी तणही न उगविणा-या जमिनीत रुपांतर झाले. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वाहून गेले, सोबत माती व अन्नद्रव्ये गेली. दूधउत्पादन वाढीसाठी परदेशी संकरित गायी आल्या. परिणामी देशी गाईचे प्रमाण कमी झाले. गाववार राखीव चराई क्षेत्र व देवराई कमी झाल्यामुळे स्थानिक गाई कत्तलखान्यात गेल्या. पूर्वी १oo किलो धान्याचे पोते सहज उचलणारा आज एकही माणूस नजरेस पडत नाही. म्हणून ५० आणि २५ किलोचे पोते झाले. मानवाने उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक शेती सुरू ठेवली तर भविष्यात २५ किलोच्या पोत्याऐवजी १o किलोचे पोतेही येण्यास वेळ लागणार नाही.

एकंदरीत शेतक-याचे परंपरागत वैभव रासायनिक शेतीने खलास केले. शेतीच्या उत्पन्नाची शाश्वतता न राहिल्यामुळे शेतक-याची मुले शेती करण्यास नकार देऊ लागली आणि फक्त रु. २000 ते ३000 च्या नोकरीत मग ती शिपायाची का असेना, त्याच्या शोधात खेडं सोडून शहराकडे निघाली. शेतकरी शेतीतून दुस-या व्यवसायाकडे वळले. परंतु या परिस्थितीतही कळमेश्वर तालुक्यातील सेलू येथे मी स्वतः सेंद्रिय पद्धतीने मिश्रभाजीपाला व फळपिकांची लागवड करून वर्षभर भरघोस उत्पादन घेतले. माझ्याकडे एकूण ७ एकर शेती असून ती संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने केली जाते. ज्यामुळे पूर्वीच्या रासायनिक पद्धतीपेक्षा निम्म्या खर्चात उत्तम प्रतीचा भाजीपाला निर्माण होऊन जमिनीचे शाश्वत आरोग्य टिकविणे सोयीचे झाले. पिकांचा जोम व वाढ सेंद्रिय शेतीत झपाट्याने होत असल्यामुळे प्रतिकारकक्षमता निर्माण होऊन पिकांवर कोड व रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला.

मिश्रपिक पद्धतीचे फायदे

कृषि खात्याकडून सेंद्रिय शेतीचे फायदे सांगितल्यामुळे तसेच शासनाने ९00 हेक्टरवर नागपूर विभागात सेंद्रिय शेती प्रकल्प राबविताना मी सुध्दा सेंद्रिय पद्धतीने १०-१२ गुंठ्यात चवळी, वांगी, टोमॅटो, पोपट वाल, पातकांदा, लसूण यासारख्या पिकांची लागवड केली. मिश्रपिक पद्धतीचे अनेक फायदे आहेत. त्यात अनेक पिके एका वेळेला सलग पद्धतीने घेतल्यामुळे एखाद्या पिकावर रोग-किडीचा किंवा वातावरणाचा विपरीत परिणाम झाला तरी इतर पिकांतून उत्पन्न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत नाही. तसेच एखाद्या पिकाला कमी भाव मिळाला तर दुसरे पीक तो तोटा भरून काढते, म्हणून नुकसान कमी होते. मी ७ एकर शेतीत १oगुंठ्यात मिरची, १oगुंठ्यात वाल पापडी, १५ गुंठ्यात संत्रा रोपवाटिका, १ एकरात भाजीची केळी लावली, जी कडक उन्हाळतातही भाजीपाल्याला सावली देण्याबरोबरच उत्पन्नही देते. या सगळ्या पिकात आंतरपीक म्हणून मी पालक, चवळी, माठ आणि १.५ एकरात कपाशी व त्यात आंतरपीक म्हणून तुरीचे पीक घेतो. माझी ६ वर्षांची ३oo संत्रा झाडे असून दोन्ही बहार यशस्वीरीत्या घेण्यात सेंद्रिय शेती पद्धतीचा मोठा फायदा होत आहे.

केळीमध्ये आंतरपीक म्हणून चवळी-पालक ६ooo रोपे, कपाशी ७ क्रॅिटल, संत्रा १,00,000/- रुपये, मिरची ८,000/- रुपये, मूळा व कांदा रु.१६,000/- प्रमाणे मला उत्पन्न मिळाले आहे. तसेच दोन ओळीत लावलेल्या देशी तुरीची ५o झाडे लावल्यामुळे त्यातील ३५ झाडे जगली. त्यापासून १ वर्षात रु. ४,000/- च्या हिरव्या शेंगा विकल्या आणि त्याच तांबड्या तुरीचे बियाणे व भाजीपाल्याचे बियाणे मी स्वतः टिकवून ठेवले आहे. त्याच तुरीची जून महिन्यात कमीतकमी ४ फुटावर छाटणी करून पाणी दिले, जिवामृत दिले व ऑक्टोबर महिन्यात खोडवा तुरीच्या झाडावर तांबड्या शेंगा परिपक्र झाल्या त्या विकून पैसा मिळाला. पुन्हा तुरीला फुलोरा आला. या शेंगा मार्चपर्यंत मिळतील या काळात तुरीची झाडे ९-१० फुटापर्यंत वाढली आहेत. अधूनमधून पाण्याच्या पाळ्या दिल्या. जिवामृताची फवारणी केली. त्यामुळे रोग आलाच नाही. पानांवर, शेंगावर अळीचा प्रादुर्भाव दिसल्यास बाभळीचा पाला १० लि. गोमूत्रात भिजवून ८ लि. होईपर्यंत शिजविला व ते द्रावण एका फवारणी पंपाला ५०० मि.ली. घेऊन तुरीवर फवारणी केली त्यामुळे बुरशीजन्य रोग दूर झाले, मोहर करपला नाही. तसेच कीड-रोगाच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अकर्णांची फवारणी केली आणि १ महिन्यात सर्व भाजीपाला पिकांवर १५ दिवसांच्या अंतराने जिवामृताची फवारणी केल्यामुळे आणि जमिनीतून घनजिवामृत दिल्यामुळे रोग-कोड कमी होऊन जमीन भुसभुशीत झाली व सेंद्रिय पध्दतीने विविध पिकांचे उत्पादन माझे असे अनुभव आहेत की, मुख्य पिकात २-३ आंतरपिके घेतली तरीपण त्याच्या उत्पादनात घट येत नाही आणि सलग पीकपद्धतीचे तोटे कमीतकमी करता येतात.

नैसर्गिक सेंद्रिय शेती पद्धतीचा वापर

सोयाबीन पिकात ३-४ ओळीनंतर एक तुरीची ओळ टाकली किंवा दोन तासानंतर/ओळीनंतर १ चवळीची ओळ पेरली तर चवळीचे उत्पादन भरपूर येऊन दुस-या पिकाला नत्र मिळतो. मी माझे बियाणे दरवर्षी पिकवितो आणि इतरही सेंद्रिय शेती करणा-या माझ्या सोबत्यांना देतो. त्यांच्याकडील वायगांव हळदीचे बियाणे ज्यामध्येजास्तीत जास्त कुरकुमीन आहे, त्याला चंगला भाव मिळत असल्यामुळे मी ते वायगांव येथून सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून घेतो. तुरीच्या पिकात ज्वारीचे बियाणे मिसल्यामुळे ज्वारीच्या दांड्यावर पक्षी बसून तुरीवर येणाऱ्या अळ्या व किडी खून फस्त करतात. म्हणून ज्वारीचे पिक उत्तम सापळा पिकाचे काम करते. त्यामुळे कीडनाशक फवारण्याची आवश्यकता कमी होते. चवळी झेंडू हे अंतरपीक घेतले तर मुख्य भाजीपाला पिकावर सूत्रकृमिच्या गाठी कमी होऊन चवळीतून नत्र मिळतो. नैसर्गिक सेंद्रिय शेती पद्धतीचा वापर करताना स्वतः शेतकरी आपल्या शेतावर जिवामृत, बिजामृत, निमास्त्र किंवा निमार्क (निंबोळी बियांचा अर्क), अग्रेिअस्त्र तयार करून कोड-रोग निवारणाकरिता वापर करू शकतो. झेंडूपासून दसरा व दिवाळीच्या टप्प्यात फुलांचे भरपूर पैसे मिळतात. सेंद्रिय भाजीपाला व फळपिकांना वेगळी विक्रीव्यवस्था कमीतकमी जिल्ह्याच्या ठिकाणी होणे आवश्यक वाटते. त्या अनुषंगाने शासनाने धोरणात ठरविल्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सेंद्रिय शेतीमाल विक्री केंद्र स्थापित करणे अत्यावश्यक आहे. तसे झाल्यास सकस, स्वादिष्ट, आरोग्यदायी व रासायनिक कीड-अंश विरहित सेंद्रिय भाजीपाला, फळे, तृणधान्ये, तेलबिया आणि प्रक्रिया पदार्थाना निश्चितच जागरूक नागरिकांकडून २०-५० टक्के अधिक भाव रासायनिक पध्दतीने उत्पादित मालाच्या तुलनेत मिळू शकतो. कमीतकमी सध्याच्या बाजारपेठेत पुण्याच्या धर्तीवर काही गोळे तरी सेंद्रिय शेतमाल विक्रीकरिता नागपूर बाजारपेठेत राखीव ठेवणे अगत्याचे वाटते.

माझ्या सेंद्रिय शेती उपक्रमास नैसर्गिक शेतीतज्ज्ञ तसेच कृषी पर्यवेक्षक श्री. हेमंत चव्हाण व श्री. साहेबराव धोटे (निसर्ग संस्था) आणि डॉ. शंकरराव राऊत (सेंद्रिय शेतीतज्ज्ञ) यांनी स्वत: शेतावर येऊन आणि २ दिवसांची कार्यशाळा घेऊन महत्वाचे मार्गदर्शन केले आहे. कृषि सहाय्यक सेंद्रिय गटशेती केली तर खरेदीदार शेतावर येऊन शेतक-याचा माल विक्रीचा त्रास वाचवू शकतो. त्यामुळे सेंद्रिय गटशेतीला गावोगावी प्रोत्साहन देऊन शासनाचे सेंद्रिय शेती धोरण, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि शेतीचे शाश्वत आरोग्य अभियान त्याचबरोबर अशाप्रकारच्या इतरही योजनामधून सहाय्य देवून सेंद्रिय शेतीस चालना देता येईल. त्याचा फायदा राज्यातील शेतक-यांना होईल.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate