অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सेंद्रिय कृषी उत्पादन पद्धती

सेंद्रिय कृषी उत्पादन पद्धती

शेतीतील नविन पिढी जी रासायनिक शेती पध्दतीवर जास्त अवलंबून आहे, अशा जगभरातील युवा व्यावसायीकांना सेंद्रीय शेती पध्दतीचे शिक्षण देण्यासाठी डब्लू.डब्लू.ओ.ओ.टफ इंडिया (wwoof-India) त्यांना भारतातील सेंद्रीय शेतीच्या संपर्कात आणण्याचे कार्य करीत आहे. पुर्वी राबवित असलेल्या अनेक उपक्रमांतून ते शोतकरयाना सेंद्रीय शेती पध्दती शिकविण्यासोबतच जगभरातील विद्यार्थ्यांना जे सेंद्रीय शेती पध्दती शिकू इच्छितात त्यांना अशा शेतांवर प्रत्यक्ष काम करण्याची व त्याद्वारे विविध देशांतील सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्याची संधी उपलब्ध करून देते. आज शेतीत वापरल्या जाणारया विविध कृषी रसायनांमुळे पर्यावरणाला होणारी हानी तसेच आरोग्यावर होणा-या दुषपरिणामांमुळे खाद्यान्नाच्या गुणवत्तेविषयी ग्राहक जागरूक होत आहे. जागतिक पातळीवर ग्राहक हा सेंद्रीय उत्पादनांना सुरक्षित व दुष्परिणाम विरहीत समजत आहे. विकसित व विकसनशील देशांमध्ये सेंद्रिय उत्पादनांनी मागणी दिवसेंदिवस अंदाजे 20-25 टक्के प्रती वर्ष या दराने वाढत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा फायदा संयोजाकांसोबत शेतात सेंद्रिय शेती शिकताना स्वयंसेवक भारताला सेंद्रीय शेतीत भरपुर संधी उपलब्ध आहेत. सेंद्रीय शेती ही पुर्वीपासूनच भारतीय शेतीचा एक अविभाज्य अंग आहे. भारत हा सेंद्रीय शेतीसाठी आवश्यक असलेल्या अनेक बाबी जसे पशुधन, विविध कृषि हवामान आधारित जैवविविधता हयांनी समृध्द्र आहे तसेच मोठ्या प्रमाणात लहान व सिमांत शेतकरी आहेत. त्यामुळेच सेद्रिय शेती ही संस्कृतीच आहे देशाच्या अनेक भागात जसे पर्वतीय व कोरडवाहू शेतीत अतिशय कमी प्रमाणात कृषी निविष्ठांचा वापर करण्याच्या पध्दतीमुळे शेतक-यांना सेंद्रीय शेतीकडे वळणे सोपे होऊन, सतत वाढत असलेल्या देशीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा फायदा घेण्याची मोठी संधी उपलब्ध आहे व त्यामुळे रासायनिक शेतीवर अवलंबून असलेल्या नविन पिढीला सेंट्रीय शेतीचे शिक्षण देणे ही आता काळाची गरज आहे .

डब्लू.डब्लू.ओ.ओ.टफ-भारत (wwoof-India) ची निर्मिती

भारतात अनेक वर्षापासून रासायनिक शेती पध्दतीच्या उपयोगामुळे सेंद्रिय शेती किंवा अरासायनिक शेती विषयी अतिशय कमी माहिती व विशेषज्ञ उपलब्ध आहेत. सरकारी योजना व कृषि विस्तारात रासायनिक शेती पध्दतीचाच प्रवार मोठ्या प्रमाणात करतात. परंतू सेंद्रिय शेतीच्या प्रसारात विशेष लक्ष देत नाही.

2007 मध्ये अस्तित्वास आलेली woof-India (डब्लू डब्लू ओ ओ एफ वर्डवाइड अँपॉरच्युनिटीज ऑनऑरगँनिक फार्मस इंडिया) ही सेंद्रीय शेती करू इच्छिणाच्या शेतक-यांना आवश्यक ते सेंद्रीय शेतीचे ज्ञान देण्याचे कार्य करीत आहे.

 

 

 

 

 

संयोजकासोबत शेतात सेंद्रिय शेती शिकताना स्वयंसेवक सुरूवातीला 2007 मध्ये फक्त 14 सेंद्रीय शेतीफार्म असलेल्या नेटवर्कमध्ये आता तब्बल 180 पेक्षा जास्त सेंद्रीय शेतीफार्मस् असून त्यामध्ये अनेक स्वयंसेवी संस्थांचा समावेश आहे. सध्या woof-India चे जाळे भारतातल्या 18 राज्यांमध्ये पसरलेले आहे. woof India चा मुख्य उद्देश हा शेतक-यांना सेंद्रीय शेती उत्पादन पद्धतीचा अवलंब करण्यास मदत करणे , तसेच विविध देशातील विद्यार्थ्यांना सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमांतर्गत सेंद्रीय शेतीत प्रत्यक्ष काम करण्याची संधी उपलब्ध करून देणे, तसेच सेंद्रीय/बायोडायनॅमिक जीवन पध्दती समजावणे व त्यात आवड निर्माण करणे हा आहे.

woof- India हया कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या ठिकाणांची यादी तयार करुन ती जागतिक स्तरावर इच्छूक स्वयंसेवकांना ज्यांना 'woofers सुध्दा म्हणतात. त्यांना उपलब्ध केल्या जाते, ज़्यायोगे लोकांना विविध देशामध्ये प्रवास करण्यास प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे ज्ञान वाढविण्याची संधी तर मिळतेच. परंतु तेथील संस्कृतीची व जीवनपध्दतीची माहिती मिळते. हा उपक्रम यजमान शेतक-यांद्वारे राहण्याची व खाण्याची व्यवस्था तर सभासदांद्वारे श्रमाची मदत या तत्वावर राबविल्या जाते. यामुळे सभासदांना अतिशय कमी खर्चात हयात सहभागी होता येते.

सेंद्रीय शेतीच्या संशोधनात मार्गदर्शन स्थानिक शेतकऱ्यांस जमीन तयार करण्यास मदत करताना स्वयंसेवक
सेंद्रिय शेती पध्दती व स्वयंसेवकांचे जाळे हयांचा विस्तार सतत होण्यासाठी wwoof- India ने 4 “इब्लू डब्लू ओ ओ एफ ग्लोबल व्हिलेज' (WGr& WGv) ची भारतात स्थापना केली आहे. ही गांवे भविष्यात सेंद्रीय शेतीच्या संशोधनात मार्गदर्शक राहतील. पहिले डब्लू जी व्ही हे मध्यप्रदेशातील सुरजपुरा गांवात 4 .5 एकर जमिनीतर स्थापन केले आहे, जे जगप्रसिध्द्र खजुराओ मंदिर, केन नदी व पन्ना व्याघ्र प्रकल्पाच्याजवळ आहे गेल्या पाच वर्षात अमेरिका व युरोपमधिल अनेक विद्यापीठातील 15 प्रशिक्षार्थी व सुमारे 2000 च्या वर स्वयंसेवक यांचे ‘सेंद्रिय शेती' संदर्भातील प्रशिक्षण झाले आहे.

 

 

 

 

 

 

स्थानिक शेतकरयास जमीन तयार करण्यास मदत करताना स्वयंसेवक

शेती शिक्षण कार्यक्रम

सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमात स्वयंसेवक किंवा प्रशिक्षणार्थी म्हणून शेतक-यांच्या किंवा डब्लू ही जी च्या कार्यात सहभागी होता येते .

स्वयंसेवी पद्धती (volunteering)

यामध्ये वेगवेगळया देशांतून आलेले युवक निवडलेल्या शेतक्यांच्या शेतात किंवा डब्लूजीही मध्ये सेंद्रीय शेतीत आपली सेवा देऊन स्थानिक सेंद्रीय शेती पध्दतीची व संलग्न अनेक मुद्यांची माहिती घेतात. ते सेंद्रीय शेतीत राहून सेंद्रीय शेती पध्दती शिकतात.निवडलेल्या शेतीतील शेतकरी हे सेंद्रीय पध्दतीने अन्नधान्याचे उत्पादन घेतात व अत्यंत साधेपणाने शास्वत जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. ते सेंद्रीय उत्पादन पध्दती, शाश्वत व पर्यावरणपुरक जीवन जगण्याचे आपले ज्ञान व अनुभव शेतकरी हया स्वयंसेवकांना चांगले भोजन, सुरक्षित व स्वच्छ राहण्याची सुविधा उपलब्ध करून देतात. त्या बदल्यात स्वयंसेवक शेतात 4-6 तास काम करून सेंद्रीय शेती पध्दतीचे प्रत्यक्ष अनुभव व ज्ञान घेतात व शेतक-यांना मदत करतात. प्रतिदिन 4.6 तास काम करून हे स्वंयसेवक शिकत असतात.

प्रशिक्षणार्थी कार्यक्रम {Internship Programme )

संशोधनावर आधारित सेंद्रीय व शास्वत शेती पध्दती आणि पर्यावरणाच्या विविध मुद्यांवर तज्ञांच्या व प्रेरणा दायक वातावरणातील नेटवर्कमध्ये शैक्षणिक प्रशिक्षण घेण्यासाठी woof-India प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. हे प्रशिक्षार्थी वेगवेगळया विद्यापीठाध्ये शेवटच्या वर्षात शिकणारे असतात. हयामध्ये प्रकल्प आधारित प्रशिक्षण एकटयाने किंवा समुहाने राबविण्यात येतो. सेंद्रीय पध्दती व कौशल्य

12 आठवड्याचे लांब कालावधीचे प्रशिक्षण जे प्रशिक्षणार्थी स्वतःच्या प्रकल्पावर संशोधन, नियोजन राबवू इच्छितात त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. 4 ते 8 आठवड्यांचा कालावधी हा ज्यांना woof- India ने दिलेले प्रकल्प राबवू इच्छितात त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. Internship ही तीन चरणात विभागलेली असून, संकल्पनेला समजणे व त्याचे मार्गदर्शन प्रथम चरणात केले जाते. हयाची सुरुवात फिल्डवर जाण्याअगोदर wwoof-India व यजमान शेतकरयांशी उद्देश्पूर्ण व फायदेशीर संबंध जोडतात ह्याच काळात प्रकल्पाची निवड केली जाते.

द्वितीय चरणात निवडलेल्या प्रक्ल्पाच्या संशोधनासाठी विध्यार्थ्याचा वेळ हा निश्चित केला जातो. प्रक्ल्पाच्या मध्यावर झालेल्या अभ्यासाचे पुनरावलोकन केल्या जाते. ज्यामुळे विधायक समीक्षण व प्रतिसादाची संधी उपलब्ध होते. प्रकल्पाच्या अंतीम सादरीकरणात आवश्यक संशोधन संपवून प्रत्यक्ष कृती सुरू करण्यात येते .तिस-या चरणात प्रशिक्षणार्शी निवडलेल्या प्रकल्पाला यजमान शेतक-यांच्या शेतात राबवितात. काही प्रशिक्षणार्थी हे WGV मध्ये प्रशिक्षण घेतात. आजूबाजूच्या गांवातील शेतकरी, स्वयंसेवक व प्रशिक्षणार्थी हे वेगवेगळ्या जसे सेंद्रिय पद्धतीने रोपांची नर्सरी तयार करणे , बंधारे बांधणे, नर्सरीसाठी सावली वाफे तयार करणे व कम्पोस्ट युनिट तयार करणे इ. कामात सहभागी होतात.

प्रशिक्षणार्थी सायोजकाच्या शेतात प्रकल्पाची अंमलबजावणी करताना प्रशिक्षण कालावधीच्या शेवटी प्रशिक्षणार्थी त्याने राखविलेल्या प्रक्ल्पामध्ये तीनही चरणात अनुभवलेल्या व अभ्यासलेल्या संशोधनात्मक बार्बींवर सादरीकरण करतात. प्रकल्पाच्या सुरूवातीपासून ते शेवटपर्यंतच्या सर्व नोंदी प्रशिक्षणार्थी व संपूर्ण woof-India प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र प्रदान करतात. ज्यामध्ये त्याने शिकलेल्या व प्राप्त केलेल्या अनुभवाचे विषेश वर्णन केलेले असते

आतापर्यंतचा प्रवास

प्रत्येक वर्षी woof-India ला जुळणाच्या स्वयंसेवक व सेंद्रीय पध्दती व कौशल्य हे वाढले आहे. उदाहरणार्थ : आता त्यांना पिकाची फेरपालट, प्रतिकारक जाती, कम्पोस्टोंग, मिश्र पीक पध्दती, शुन्य मशागत पीक उत्पादन व क्रिड प्रतिबंध, हिरवळीची खते,अच्छादने , पिकांची पोषक तत्वांची साखळी,उपलब्ध साधनांचे पुनप्रर्क्रिया इत्यादी बाबींचे ज्ञान वाढले आहे. त्यांनी विविध किडी व रोग प्रबंधनाच्या योजना तयार करून राखविल्या आहेत. ज्यामध्ये निरिक्षण, प्रतिबंध व नोंदी ठेवणे हया महत्वाच्या बाबी आहेत. काळजीपुर्वक करायच्या सेंद्रीय प्रक्रिया पध्दतीच्या महत्वाच्या गरजा त्यांना समजल्या.

 

 

 

 

प्रशिक्षणार्थी संयोजकाच्या शेतात प्रकल्पाची अंमलबजावणी करताना

असेंद्रीय पदार्थ व उत्पादनाच्या भेसळोखावत ते चर्चा करतात. आता त्यांना सेंद्रीय उत्पादनाच्या बाजारपेठेच्या व wwoof च्या यजमान शेतकऱ्यांच्या विक्री तंत्राची माहिती झाली आहे . त्यांना विविध विक्री पद्धती (जसे- थेट विक्री. शेतकरी बाजार, विशेम विक्रीचे दुकाने व किरकोळ विक्रेते इ.) व त्यांचे वैशिष्टये समजली आहेत. त्यांना प्रमाणीकरनाच्या पद्धती व निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली.woof- India ची मदत अनेक शेतक-यांना, स्वयंसेवकांच्या सहाय्याने सेंद्रिय शेतीकडे वळण्यास झाली आहे. संपूर्ण भारतातील 50 पेक्षा जास्त यजमान सेंद्रीय शेतकरी हया प्रकल्पामध्ये सहभागी झाले आहेत. पुढील 5 वर्षात woof-India 1000 पेक्षा जास्त सेंद्रीय शेती फार्म ज्यामध्ये 5000 पेक्षा जास्त स्वयंसेवक व 2000 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्शीचा सहभाग वेगवेगळया प्रक्ल्पामध्ये करण्याचे उद्दिष्ट आहे. यजमान शेतकरी व स्वयंसेवक हयांना एकत्र आणून व लोकांनी एकमेकांच्या सहकार्याने व अनुभवाने जीवनाला शाश्वत पध्दतीने जगण्यातून एक स्वस्थ जग निर्माण करण्याचे कार्य woof-India करीत आहे. हया कार्यक्रमामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक देवाण-घेवाण होते.

 

लेखक - लिजा इंडिया© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate