दख्खनच्या पठारावरील आंध्र प्रदेश ह्या दक्षिण भारतीय राज्यातल्या मेडक जिल्ह्यातील झाहिराबाद क्षेत्र. येथील माती काळी आहे पण काही छोटे भाग रेतीयुक्त आहेत आणि काळी चिक्कण जमीन देखील दिसते. एकूण पाऊस अनियमित आणि असाधारण ७०० ते ८५० मिमी आहे. लाल मातीची खोली ६-८ इंचापेक्षा जास्त नाही. अशा शेतकी आणि हवामानाच्या कमतरतेचा मुकाबला करण्यासाठी शेतक-यांनी विभिन्न धोरणे आखली आहेत. पिकाचे विविधिकरण हे त्यांपैकी एक आहे.
डेक्कन डेवलपमेंट सोसायटी (डीडीएस) ही मेडक जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रांच्या तळागाळात काम करणारी एक स्वयंसेवी संघटना आहे. गेली पंधरा वर्षे अशेती पदार्थाच्या भूमिका पाहण्याचे काम ती करत आहे, जेणेकरुन गरीब ग्रामिणांचे जीवन सुधारेल. ८० पेक्षा जास्त अशेती पदार्थांचे, भाज्या, हिरव्या वनस्पती आणि फळे (बेरीज्), असे वर्गीकरण करण्यात आले आहे.
ह्यातील जास्तीत जास्त पिके दलित महिला काढतात ज्या सामाजिक-आर्थिक शिडीच्या सर्वात खालच्या पायरीवर असतात. संसाराला हातभार लागावा म्हणून त्या शेतमजुरीचे काम करतात. शेतात घेतल्या जाणा-या पिकांच्या विविधतेमुळे त्यांना अनियमित आणि असाधारण जलवायु परिस्थितिंशी झगडण्यास आणि त्यातूनही चांगले उत्पादन घेण्यास मदत होते. त्या कमीत ८-१२ पिके एकावेळी घेतात.
ग्रामीण भागातील लोकांसाठी, खास करुन गरिबांसाठी, अशेती हिरव्या भाज्या हे अशेती विभागातील महत्वाचे अन्न आहे. हा त्यांच्या जीवनाचा मुख्य स्त्रोत असून, तो गरिबांचा सर्वात पोषक स्त्रोत आहे. ब-याच प्रकारचा हिरवा पाला हा भाज्या म्हणून वापरण्यात येतो, आणि त्यातील जास्तीत जास्त भाज्यांत भरपूर प्रमाणात कॅलशियम, लोह, कॅरॉटीन, व्हिटॅमिन-सी आणि फॉलीक ऍसिड असते. अशेती हिरव्या भाज्यांमध्ये असलेली कितीतरी पोषक तत्त्वे आरोग्यपूर्ण वाढीसाठी आवश्यक स्रोत असतात. अशा हिरव्या भाज्या खासकरुन भरपूर प्रमाणात गर्भवती महिला, मुले आणि नव्यानेच आई झालेल्यांना खायला दिल्या जातात.
संगम मध्ये आंगणवाडीत, लहान मुलांना वेगवेगळ्या हिरव्या भाज्या कधी कडधान्य, पोळी आणि डाळींबरोबर रोज खायला दिल्या जातात. म्हणून, वाढीच्या सुरुवातीच्या वर्षांत, मुलांना स्थानिक, विविध, स्वादिष्ट आणि पौष्टिक तसेच सर्वात सुरक्षित अशा स्त्रोतापासूनचे भोजन दिले जाते. रोज ते शेतांमधून, परसदारातून अशेती हिरव्या भाज्या गोळा करतात. ज्या महिला रोज गवत खुरपायला जातात त्या रोजच्या जेवणासाठी अशेती हिरव्या भाज्या शोधून घरी नेतात.
हिरव्या भाज्यांचा गरिबांच्या जीवनातील आरोग्यवर्धक ऊपयोग जाणून घेण्यासाठी ह्या अशेती हिरव्या भाज्यांचे वैज्ञानिक विश्लेषण केले जात आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या सर्वाधिक हंगामाच्या महिन्यांत महिलांच्या सहयोगाने हिरव्या भाज्या थेट शेतातून गोळा केल्या गेल्या. हैदराबादच्या राष्ट्रीय पोषण संस्थेत त्यांतील पोषक तत्त्वांचे विश्लेषण केले गेले. त्यात असे लक्षात आले की “जनाचमचेली” ह्या अशेती भाजीत त्याच्या खाद्य भागात ३२३७ एमजी कॅलशियम प्रति १०० ग्रॅ. आणि १११.३ एमजी लोह आहे; “आडवी पुल्लाकुरा”, ही भाजी वर्षभर ऊपलब्ध असते, ज्यात लोह आणि कॅलशियम भरपुर प्रमाणात आढळते, जसे कॅलशियम ३३१ एमजी आणि लोह १३९ एमजी; आणि “तूम्मीकूरा”, जी अत्यधिक शुभ आहे आणि प्रत्येक परिवारातून खाल्ली जाते ज्यामध्ये, लोह ८१.६ एमजी प्रति १०० ग्रॅ पाने. परत एकदा असे सिद्ध झाले की आपल्याकडील महिला कितीतरी हुषार आहेत.
शेतकरी आपल्या शेतात पिकांची विविधता घेत राहतात आणि ही विविधता घेतांना ते हिरव्या अशेती भाज्यांची देखील विविधता मोठ्या श्रद्धेने आपल्या शेतीच्या आजूबाजूला घेत राहतात. असेच एक उदाहरण आहे "शून्यम पंडूगा उत्सव", हा ऊत्सव डिसेंबर मध्ये साजरा केला जातो, जेव्हा जास्तीत जास्त खरिप आणि रब्बी हंगामी पिके तयार झालेली असतात. शेतकरी या वेळी शेतात फिरतो आणि धरणी मातेला धन्यवाद देतो, उत्सवाला साजेशी गाणी म्हटली जातात आणि खास अन्नपदार्थ २० अशेती पदार्थांमधून तयार केले जाते आणि खाल्ले जातात.
अनुभव सांगतो की अशेती पिके या क्षेत्रातील खाद्य प्रणालींमधील अविभाज्य हिस्सा आहेत. पर्यावरणातील कृषि जैव विविधतेचे संरक्षण आणि शेती व्यवसाय (मिश्र शेती, पिकांची विविधता आणि कीटनाशके आणि जंतुनाशकांचा वापर टाळणे) ह्यामुळे आपल्या भोजन आणि संस्कृतीत अशेती हिरव्या भाज्यांसारख्या खाद्य पदार्थांची निरंतरता निश्चित होईल. असे घटक गरिबांच्या जीवनात फायदे आणतात आणि त्यांच्यासाठी ऊपयूक्त देखील ठरतात आणि स्थानिय अन्न म्हणून सक्षम करतात. या अशेती भाज्यांसारख्या खाद्य पदार्थांमध्ये नैसर्गिकपणे सूक्ष्म पोषक तत्त्वांचे अधिकांश प्रमाण आढळते – उदा. बीटा केरॉटिन, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह इ. आणि म्हणूनच अशांना निरुत्साही करण्यापेक्षा प्रोत्साहन देणे आणि त्यांना कृत्रिमरीत्या पाठिंबा देणे गरजेचे आहे.
बी.सॅलोम यसूदास
डेक्कन डेव्लपमेंट सोसायटी (डीडीएस), पास्तापूर, झहिराबाद, मेडक जिल्हा, आंध्र प्रदेश, भारत.
स्त्रोत: LEISA India, Vol 6-1
अंतिम सुधारित : 7/27/2020
ही गोष्ट आहे अकोल्याच्या ज्योतीताईंची...! अकोला जि...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
नैसर्गिक आपत्तीने अनेक वेळा दस्तक दिल्यानंतर आता र...
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील संपतर...