অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या हिरवा चारा निर्मित

हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या हिरवा चारा निर्मित

असमाधानकारक पर्जन्याच्या पार्श्वभुमीवर निर्माण हणा-या चारा टंचाईवर मत करण्यासाठी तसेच चारा टंचाईच्या प्रश्नावर आधुनिक  तंत्रज्ञानाच्या मदतीने आगामी काळात कायमस्वरुपी उपाययोजना थेट दुग्धोत्पादक शेतक-यांच्या दाराशी/ गोठ्याशी यावी म्हणून महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत कमी खर्चाचे हायडोपोनिक तंत्रज्ञानाव्दारे हिरवाचारा निर्मिती प्रकल्प उभारणीचा कार्यक्रम सन २०१५-१६ या वर्षांमध्ये राज्यासाठी मंजुर करण्यात आला. या अंतर्गत सोलापुर जिल्ह्यात १३४ प्रकल्प (युनिट) कार्यान्वयित होऊन १३४ शेतक-यांना प्रती युनिट रु. ६000/- या प्रमाणे एकुण रु. ८.o४ लाख अनुदान वितरित करण्यात आले.

  • हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतक-यांच्या शेतावर सकस व मुबलक चारा निर्मिती प्रकल्पांची उभारणी शक्य आहे. तथापी, मोठ्या आकाराच्या व नियंत्रित वातावरण सुविधा असलेल्या हायड्रोपोनिक वैयक्तिक मालकीच्या पशुधनांची संख्या मर्यादित असल्यामुळे अशा प्रकारचे प्रकल्प शेतक-यांच्या शेतावर उभारणे प्रत्यक्षात शक्य होणार नाही. सबब, शेतक-यांकरीता कमी खर्चाच्या हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे चारा निर्मिती प्रकल्प उभारणीकरिता राष्ट्रीय कृषि विकास योजनेतंर्गत अर्थसहाय्य शेतक-यांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
  • किमान ५ जनावरांसाठी कमी खर्चाच्या हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाद्वारे चारानिर्मिती प्रकल्पाच्या/ युनिटच्या उभारणीचा आराखडा तयार करण्यात आला. ८.५ फूट x ४.५ फूट x ७.५ फूट आकारमानाचे युनिट उभारणीसाठी रु. २४ooo/- एवढी अंदाजीत प्रकल्प किंमत असून त्यासाठी प्रकल्प किंमतीच्या २५ टक्के म्हणजे रु. ६०००/- प्रती युनिट याप्रमाणे शेतक-यांना अर्थसहाय्य करण्यात आलेले आहे.
  • तयार होणा-या हिरव्या चान्याद्वारे भरपुर मेदाम्ले, प्रथिने , एन्झाईन्स, व पशुधनास सहज पचवता येणारी विविध खनिजद्रव्ये उपलब्ध होतात. चारा तयार करण्याकरिता मका, गहु, ओट वापरुन साधारणपणे १ किलो बियाण्यापासुन ९ किलो खाद्य निर्मिती होते. साधारणपणे युनिटचा वापर सुरु झाल्यापासुन २ ते ३ महिन्यात भांडवली गुंतवणुक मुक्त होते. मनुष्यबळ कमी लागते, पाण्याची बचत होते.
  • जिल्ह्यामध्ये हायड्रोपोनिक युनिटसाठी शेतक-यांमध्ये प्रचार, प्रसिध्दी तसेच जागृतीसाठी तालुकास्तरावर /ग्रामस्तरावर प्रत्यक्ष मॅडेल उभारणी करुन शेतक-यांना मार्गदर्शन केले. तसेच शेतक-यांना सहजपणे युनिट उभारणी करता येणे शक्य व्हावे, म्हणून दर्जेदार साहित्य उपलब्ध होण्यासाठी तसेच वाहतुक खर्चात बचत व्हावी, यासाठी शेतकरी समुह तयार करुन युनिट उभारणा-या शेतक-यांना सेवापुरवठादारांनी सहकार्य या पालखी मार्गावर तालुका कृषि अधिकारी, माळशिरस यांनी युनिट उभारणी करुन शेतक-यांना मार्गदर्शन केले.
  • जिल्ह्यातील दुग्धोत्पादन सहकारी संस्थानी त्यांच्या सभासद शेतक-यांसाठी युनिट उभारणीकरिता अर्थसहाय्य देऊ करुन भांडवली खर्चाचा बोजा दुष्काळी परिस्थीतीमध्ये उचलून शेतक-यांना आर्थिक मदतीचा हात दिला. तसेच शेतक-यांकडून संस्थेस पुरवठा होणा-या दुधसंकलनातुन मासिक तत्वावर टप्प्याटप्याने रकम वळती करुन घेतली. माळशिरस तालुक्यातील शिवामृत दुधउत्पादक सहकारी संघ मर्यादित, अकलुज या संस्थेने त्यांच्या सभासदांना याप्रमाणे मदत करुन ७५ युनिट समुह/गट स्वरुपात उभारणी केले आहेत.
  • सदर समुहास जिल्ह्यातील इतर शेतकरी भेटी देऊन प्रकल्पाची यशस्विता अंगीकारित आहेत. गतवर्षीच्या चारा टंचाईकाळात पशुधनास हिरवा चारा कमी खर्चात उपलब्ध झालेला आहे. सर्वसाधारणपणे शेतमजुर, अल्पभुधारक शेतकरी या प्रकल्पासाठी निवडण्यात आल्याने ख-या अर्थाने गरजू दुग्धोत्पादक शेतक-यांना दुष्काळाच्या परिस्थितीत शाश्वत आर्थिक हातभार लागत आहे. यावर्षीसुध्दा सदरची योजना राबविण्यात येत आहे.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate