वैयक्तिक अपघात विमा योजना
योजनेची ठळक वैशिष्ट्ये
- सुरक्षेची व्याप्ती –सर्व किसान क्रेडिट कार्डधारकांना ही योजना ह्या देशांत मृत्यु किंवा कायम अपंगत्वाच्या प्रसंगी सुरक्षा देते.
- सुरक्षाप्राप्त व्यक्ती – 70 वर्षे वयापर्यंतचे सर्व किसान क्रेडिट कार्डधारक
- जोखमीची व्याप्ती – ह्या योजनेचे फायदे खाली दिले आहेत;
- बाह्य परिस्थिति, हिंसा किंवा दृश्य साधनांमुळे मृत्यु आल्यास: रू.50,000/-
- कायमचे संपूर्ण अपंगत्व – रू.50,000/-
- दोन हात व दोन डोळे किंवा एक हात व एक डोळा गमावल्यास: रू;50,000/-
- एक हात किंवा एक डोळा गमावल्यास: रू.25,000/-
- मास्टर पॉलिसीचा अवधि – 3 वर्षांसाठी वैध.
- विम्याचा अवधि – बँकेकडून वार्षिक प्रीमियम प्राप्त झाल्याच्या तारखेपासून एक वर्षांपर्यंत विम्याची सुरक्षा वैध असेल. तीन वर्षांच्या कवरसाठी, प्रीमियम मिळाल्याच्या तारखेपासून तीन वर्षांपर्यंतचा काळ विम्याचा कालावधि असेल.
- प्रीमियम – प्रत्येक केसीसी धारकाकडून घेतलेल्या वार्षिक प्रीमियममधून रू.15/-, बँक प्रत्येक केसीसी धारकासाठी रू.10/- भरते आणि केसीसी धारकाकडून रू.5/- वसूल करावे लागतात.
- संचालनाची पध्दत – व्यवसायाच्या सेवा ह्या चार विमा कंपन्यांद्वारे क्षेत्रीय पातळीवर चालवण्यात येतील- युनायटेड इंडिया इंशुरन्स कं. लि. ही आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, अंदमान व निकोबार, पाँडेचेरी, तामिळनाडु आणि लक्षद्वीपला कवर करते.
- कार्यान्वयन करणार्या शाखांना ज्या शेतकर्यांना केसीसी कार्डे देण्यात आली असतील त्यांचा विमा प्रीमियम त्यांच्या यादी बरोबर मासिक स्वरूपात भरावा लागतो.
- दाव्याची पध्दत – मृत्यु, कायमचे अपंगत्व आणि बुडण्यामुळे मृत्यूच्या प्रसंगी: दाव्याचे व्यवस्थापन विमा कंपनीच्या कार्यालयाद्वारे करण्यात येईल. वेगळ्या पध्दतीचा अवलंब करण्यात येईल.
अंतिम सुधारित : 6/5/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.