অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बँका आणि शेती पतपुरवठा

बँका आणि शेती पतपुरवठा

शेतीविषयक क्षेत्रातील बँकस्

बँकांचे राष्ट्रीयीकरण शेती हे मुख्य क्षेत्र असलेल्या अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमधील कर्जाला दिशा दाखविण्यासाठी उचललेले एक फार मोठे पावूल होते. एका गतिमान आणि वाढ होत असलेल्या शेतकी क्षेत्राला चौतर्फा वाढीची गति वाढविण्यासाठी बँकांकडून पुरेशा पैशांची गरज असते. सरकारने बँकांना सन् 2004-05 पासून तीन वर्षांत शेतकी क्षेत्रामध्ये  त्यांच्या ऋणाचा प्रवाह दुप्पट करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने गंभीरपणे लक्ष घातल्यामुळे आणि 11व्या पंचवर्षीय योजनेमध्ये शेतीच्या क्षेत्रात विशेष बजट वाटणी केल्यावर, बँकांतर्फे देण्यात येणारया योजनांपासून किती फायदा घ्यायचा ते आता  शेतकारयाच्या हाती आहे. काही राष्ट्रीयकृत बँकांकडून देण्यात येत असलेल्या ऋणांची यादी खाली दिलेली आहे:

अलाहाबाद बँक (www.allahabadbank.com)

  • किसान शक्ति योजना स्कीम
  • कर्जाचा वापर मनाप्रमाणे करण्यास शेतकरी स्वतंत्र आहेत.
  • गरजेपेक्षा जास्त रक्कम ठेवण्याची (बँकेत) गरज नाही.
  • सावकारांकडून घेतलेल्या रकमेच्या परतफेडीसकट कर्जाच्या 50 टक्के रकमेचा वापर वैयक्तिक/घरगुती कारणांसाठी करता येईल.

आंध्र बँक (www.andhrabank.in)

  • आंध्र बँक किसान ग्रीन कार्ड
  • वैयक्तिक अपघात विमा योजनेमध्ये (पीएआयएस) (PAIS) अंतर्भाव

बँक ऑफ बडोदा (www.bankofbaroda.com)

  • कोरड्या जमिनीवरील शेतीसाठी वापरलेल्या ट्रैक्टरच्या खरेदीची योजना
  • डीलर/वितरक/व्यापारयांना शेती/गुरेढोरे यांच्यासाठी चालू भांडवलाची गरज
  • शेतीविषयक यंत्रसामुग्री भाड्याने घेण्यासाठी
  • बागवानी शेतीच्या विकासा करीता
  • डेरी, डुक्कर पालन, कोंबडी पालन, रेशमाच्या किड्यांचे पालन इत्यादि काम करणारया एककांसाठी चालू भांडवल
  • अनुसूचित जाति/अनुसूचित जमातींना शेतीची उपकरणे, हत्यारे, बैलजोडी, पाणीपुरवठ्याच्या सोयींच्या निर्मितीसाठी आर्थिक मदत करणे

बँक ऑफ इंडिया (www.bankofindia.com)

  • स्टार भूमिहीन किसान कार्ड भागीदारीने शेती करणारयांस, भाडोत्री शेतकरी आणि तोंडी मुदत भाडेकरू शेतकरी
  • किसान समाधान कार्ड पिकाचे उत्पादन आणि इतर संबंधित गुंतवणुकींसाठी किसान क्रेडिट कार्ड
  • बीओआय शताब्दि कृषि विकास कार्ड शेतकरयांना कोठे ही केव्हां ही बँकेचे व्यवहार करता यावेत या साठी इलेक्टाªनिक कार्ड
  • हायब्रिड बियाणे उत्पादन, कापूस कारखाना, ऊसाचा कारखाना इत्यादिंच्या कंत्राट शेतीसाठी आर्थिक मदत करणे
  • एसएचजीज् आणि स्त्री सशक्तिकरणासाठी विशेष योजना
  • स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (एसएसपीएस) (SSPS), शेतकÚयांना उद्यमांचे प्रशिक्षण देण्यासाठी एका नवीन पुढाकाराची सुरूवात
  • पिकासाठी कर्ज: 7 टक्के वार्षिक व्याजावर रू.3 लाख पर्यंतचे कर्ज
  • आनुषंगिक जामीन: रू.50,000/- पर्यंतच्या कर्जांवर कोणत्या ही तारणाची गरज नाही, पण रू.50,000/- पेक्षा जास्त कर्जासाठी, आरबीआयच्या निर्देशांचे पालन करण्यात येते

देना बँक (www.denabank.com)

  • देना बँक ही गुजराथ, महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि दादरा व नगर हवेलीमध्ये  सर्वात जास्त सक्रिय आहे.
  • देना बँक किसान गोल्ड कार्ड योजना
  • जास्तीत जास्त कर्ज सीमा रू.10 लाख पर्यंत
  • मुलांच्या शिक्षणा सहित 10 टक्के घरगुती खर्चाची तरतुद
  • परतफेडीसाठी 9 वर्षांपर्यंतचा दीर्घ काळ
  • शेतीविषयक कोणत्या ही प्रकारच्या गुंतवणुकीसाठी कर्ज उपलब्ध आहे जसे शेतीची अवजारे, ट्रैक्टर, शिंपडण/ठिबक सिंचन पध्दती, ऑइल (तेलाचे) इंजिन,
  • विजेचा पंप सेट, इत्यादि.
  • अल्पकालीन पिकासाठी 7 टक्के दरावर रू.3 लाख पर्यंतचे कर्ज
  • अर्ज केल्यावर 15 दिवसांच्या आत कर्जाचे वितरण
  • शेतीसाठी रू.50,000/- पर्यंतच्या कर्जांवर आणि शेतकी चिकित्सालय व शेती व्यवसाय एककांची स्थापना करण्यासाठी रू.5 लाखांपर्यंत कोणत्या ही आनुषंगिक तारणाची गरज नाही.

ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स (www.obcindia.co.in)

  • ओरिएन्टल ग्रीन कार्ड (OGC) योजना
  • शेतीविषयक कर्जासाठी संयुक्त क्रेडिट योजना
  • शीतगृहे/गुदामांची स्थापना
  • दलालांना आर्थिक मदत करण्यासाठी

पंजाब नॅशनल बँक (www.pnbindia.in)

  • पीएनबी किसान संपूर्णऋण योजना
  • पीएनबी किसान इच्छापूर्ती योजना
  • शीतगृहाच्या पावतीच्या तारणावर बटाटा/फळांचे उत्पादन
  • स्वत: गती घेणारे कंबाइन कापणी यंत्र
  • वृक्षसंगोपन नर्सरीचा विकास
  • पडित जमिनीचा विकास
  • मशरूम/कोळंबी कल्चर (संवर्धन) आणि मशरूम अळंबी उत्पादन
  • दुधारू जनावरांची खरेदी आणि त्यांचा प्रतिपाळ
  • डेअरी विकास कार्ड योजना
  • मत्स्यपालन, डुक्कर पाळणे, मधमाशा पाळणे इत्यादिंसाठी योजना

स्टेट बँक ऑफ हैदराबाद (www.sbhyd.com)

  • पिकासाठी कर्ज आणि शेतीविषयक सुवर्ण कर्ज
  • शेतीच्या उत्पादनांची विक्री (विपणन)
  • शीतगृह/खाजगी गुदाम
  • किरकोळ सिंचन आणि डग वेल योजना/जुनी विहीर योजनेचा विकास
  • भू-विकासासाठी आर्थिक मदत
  • ट्रैक्टर, विद्युत नांगर आणि अवजारे यांच्या खरेदीसाठी
  • शेतकरयांसाठी वाहनाकरीता कर्ज
  • ठिबक सिंचन आणि शिंपडण साधने
  • स्वयं सहाय्य समूह (सेल्फ हेल्प ग्रुप)
  • शेती चिकित्सा आणि शेती व्यवसाय केन्द्रे
  • युवा कृषि प्लस योजना

स्टेट बँक ऑफ इंडिया (www.statebankofindia.com)

  • पिकासाठी कर्ज योजना (एसीसी)
  • उपजेचा संग्रह त्यांच्या स्वत:च्या परिसरात करणे आणि नव्या हंगामासाठी कर्जाचे नूतनीकरण करणे
  • किसान क्रेडिट कार्ड योजना
  • भू-विकास योजना
  • किरकोळ सिंचन योजना
  • संयुक्त कापणी यंत्राची खरेदी
  • किसान गोल्ड कार्ड योजना
  • कृषि प्लस योजना ग्रामीण युवांद्वारे परंपरागत पध्दतीनेट्रैक्टर भाड्याने घेण्यासाठी
  • अर्थियस प्लस योजना दलालांसाठी
  • ब्रॉयलर प्लस योजना ब्रॉयलरच्या उत्पन्नासाठी
  • लीड बँक योजना

सिडिकेट बँक (www.syndicatebank.in)

  • सिंडिकेट किसान क्रेडिट कार्ड (एसकेसीसी)
  • सोलर वॉटर हीटर योजना
  • शेती-चिकित्सालय आणि शेती व्यवसाय केन्द्र

विजया बँक (www.vijayabank.com )

  • स्वयं सहाय्य समूहांना कर्ज
  • विजया किसान कार्ड
  • विजया प्लान्टर्स् कार्ड
  • कारागीर आणि ग्रामीण उद्योगांसाठी (KVIC) मार्जिन मनी योजना

इतर बँकांकरीता लिंक्स्


स्त्रोत : पोर्टल कंटेंट टीम

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate