पावसाला उशिरा सुरवात झाल्याने आपत्कालीन परिस्थितीत शेतीची कामे, पिकांचे नियोजन आणि पेरणीच्या अनुषंगाने बदल करणे आवश्यक आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पाऊस लांबल्यास खरीप ज्वारी, बाजरी, तूर, सोयाबीन, कापूस, सूर्यफूल पिके घ्यावीत. अशा परिस्थितीत मूग, उडीद यांसारखी पिके योग्य ठरत नाहीत.
कृषी हवामानानुसार महाराष्ट्राचे नऊ उपविभाग असून, चार 4 कृषी विद्यापीठे कार्यरत आहेत. या कृषी विद्यापीठांमार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्यायी पीक नियोजन शिफारशी दिल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर तर खानदेशातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश होतो.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पाऊस लांबल्यास पावसाच्या अपेक्षित कालावधीनुसार करावयाच्या पिकांच्या नियोजनाच्या दिलेल्या शिफारशी पुढीलप्रमाणे आहेत.
जुलै दुसरा पंधरवडा - सूर्यफूल, राळ, भुईमूग, एरंडी, तूर, हुलगा, आंतरपीक - बाजरी, सूर्यफूल + तूर (2.1) एरंडी + गवार (1.2).
जुलैचा दुसरा पंधरवडा - सूर्यफूल, तूर, हुलगा, राळा, एरंडी आंतरपीक सूर्यफूल + तूर (2.1) तूर + गवार (2.1)
ऑगस्टचा पहिला पंधरवडा - सूर्यफूल, तूर, एरंडी, हुलगा. आंतरपीक सूर्यफूल + तूर (2.1) एरंडा + दोडका मिश्र पीक
ऑगस्टचा दुसरा पंधरवडा - सूर्यफूल, तूर, एरंडी. आंतरपीक सूर्यफूल + तूर (2.1)सप्टेंबर पहिला पंधरवडा - रब्बी ज्वारी.
मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली व उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश होतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पावसाच्या अपेक्षित आगमन कालावधीनुसार आपत्कालीन परिस्थितीसाठी दिलेले पीक नियोजन.
जुलै दुसरा पंधरवडा - सं. बाजरी, सूर्यफूल, तूर, सोयाबीन, बाजरी + तूर, एरंडी + धने, एरंडी आणि तीळ. कापूस सं.ज्वारी भुईमूग.
ऑगस्टचा दुसरा पंधरवडा - सं. बाजरी, सूर्यफूल, तूर, एरंडी + धने. कापूस सं.ज्वारी, भुईमूग आणि रागी.
सप्टेंबर दुसरा पंधरवडा - रब्बी ज्वारी, करडई आणि सूर्यफूल, हरभरा, जवस आणि गहू.
ऑक्टोबर पहिला पंधरवडा - रब्बी ज्वारी, करडई आणि जवस गहू, रब्बी गहू.
ऑक्टोबर दुसरा पंधरवडा ते नोव्हेंबर पहिला पंधरवडा - हरभरा, करडई, जवस आणि गहू, रब्बी ज्वारी आणि सूर्यफूल.
अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यासाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी पुढीलप्रमाणे उपाययोजना दिल्या आहेत. कृषी हवामानशास्त्राच्या दृष्टिकोनातून विदर्भ हमखास पावसाचा प्रदेश, मध्यम पावसाचा प्रदेश व जास्त पावसाचा प्रदेश अशा तीन उपविभागांमध्ये विभागला जातो. या तिन्ही उपविभागांत ढोबळ मानाने एकाच वेळी पाऊस पडतो. या विभागांसाठी अभ्यासाअंती काही ठळक शिफारशी विद्यापीठाने दिल्या आहेत.
1) नियमित पावसाळा चार आठवड्यांपेक्षा जास्त उशिराने सुरू झाल्यास (16 ते 22 जुलै) पिकांचे खालील प्रकारे नियोजन करावे.
डॉ. सुदामराव अडसूळ, 94220848333
(लेखक कृषी आयुक्तालय, पुणे येथे कृषी संचालक- विस्तार व प्रशिक्षण आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन १७ जुलै २०१४
अंतिम सुधारित : 10/7/2020
कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य आपत्ती, अपघात य...
लोकसंख्या नियंत्रणाबद्दल खूप प्रचार केला गेला आहे....
१५ ते ४० वयोगटातील स्त्रियांनी पाळणा लांबवण्याचा प...
या विभागात कुटुंब नियोजन साधनांचा उपयोग कोणत्या वे...