অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

खरीप हंगाम २0१६ : निविष्ठांचे नियोजन

खरीप हंगाम २0१६ : निविष्ठांचे नियोजन

खरीप हंगाम २0१६ : निविष्ठांचे नियोजन

सन २०१६ च्या खरीप हंगामासाठी कृषि विभागाने आवश्यक बियाणे, खते, औषधे इत्यादी निविष्ठांचे नियोजन केले आहे. जेणेकरून शेतक-यांना त्या नेिविष्ठा उपलब्ध करून देणे सोईचे होईल.

खरीप हंगाम २0१६ करिता बियाणे पुरवठा नियोजन

राज्यामध्ये खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, भात, मका, तुर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, सुर्यफूल, तिळ व कपाशी ही प्रमुख पिके घेतली जातात. खरीप हंगाम २o१६ मध्ये अन्नधान्य पिकांचे १५o.३४ लाख हे क्षेत्र लागवडीखाली अपेक्षित आहे. सदर क्षेत्रावरील पेरणीकरीता बियाणे बदलाच्या दरानुसार अन्नधान्य पिकांचे १४.९९ लाख किं बियाण्याची गरज आहे. बियाणे गरजेच्या तुलनेत महाबीज ५.३९ लाख. क्रॅि., राष्ट्रीय बिंज निगम १.४६ लाख किं. व खाजगी उत्पादकामार्फत ११.०५ लाख किं. असे एकूण १४.९५ लाख किं. बियाणे उपलब्ध होणार आहे.

खरीप २0१६ हंगामाकरिता बियाणे गरज व अपेक्षित उपलब्धता (बियाणे किं. मध्ये)

अ.क्र. पिक एकूण अपेक्षित क्षेत्र ( हे) बियाणे बदल दरानुसार बियाणे गरज अपेक्षित बियाणे उपलब्धता
महाबीज राबिनी खाजगी एकूण
सं. ज्वारी ८६४००० ६४८०० ८०८५ १५०० ५५३६१ ६४९४६
सु. ज्वारी १५३००० २९०७ १० ३६४० ३६५०
सं. बाजरी ९३२००० २३३०० २६४ २३११५ २३३७९
सु.बाजरी २१६००० ६९१२ २३६५ १००० ७३६३ १०७२८
भात १४९२००० २०५८९६ ७५८५८ ७००० १२३२०२ २०६०६०
मका ८१०००० १२१५०० १०३५० २४००० १२६२०० १६०५५०
तूर ११९५००० ६२७३८ १८३७० २८०० ४३६८९ ६४८५९
मुग ५३५००० १६०५० २२९७ ५०० ८५०० ११२९७
उडीद ४४८००० २३५२० १५५०१ २००० ६१०० २३६०१
१० भुईमुग २९९००० १७९४० १०२५ २००० १६४३० १९४५५
११ तीळ ७००० ९२८ २२४ ७१६ ९४०
१२ सोयाबीन ३९००००० ८७७५०० ४०३८९० १०५००० ५९७७०९ ११०६५९९
१३ बी.टी. कॉटन ४०००००० ७२००० ९० ९०००० ९००९०
१४ सु.कापूस १२००० ३६०० ५६७ ३२५० ३८१७

एकूण १५०३४००० १४९९५९० ५३८८९६ १४५८०० ११०५२७५ १७८९९७१

बियाणे बदल दर

केंद्र शासनाने भात, तुर, मुग, उडीद, भूईमूग, तीळ, सोयाबीन, रब्बी  ज्वारी, गहू, हरभरा इत्यादि स्वपरागीत पिकंकरिता ३५ ट्क्के व सुधारित बाजरी, मका, सुर्यफूल, करडई इ. परपारागेित पिकांकरीता ५० टक्के तर संकरित ज्वारी, संकरित बाजरी इत्यादी संकरित पिकांकरिता १oo टक्के बियाणे बद्धल दराचे लक्षांक नेिश्र्धारित केले आहे.


खरीप २o१६ करिता केंद्राने व राज्याने निश्चित केलेल्या लक्षांकाची माहिती पुढील तक्त्यात दर्शविण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यातील खत पुरवठा नियोजन व उपलब्धता

रासायनिक खत वापर

राज्यात रासायनिक खतांचा वार्षिक खत वापर सरासरी सुमारे ६० लाख मे.टन इतका असून त्यापैकी खरीप हंगामात सरासरी ३३ लाख मे.टन तर रब्बी हंगामात सरासरी २७ लाख मे.टन वापर होतो. रासायनिक खत वापरास राज्यात ख-या अर्थाने सन १९८o-८१ पासून चालना मिळाली आहे. सन १९८०-८१ मध्ये असलेला २१.४ कि.ग्रॅ. प्रति हेक्टर अन्नद्रव्ये स्वरुपातील खत वापर वाढून तो सन २०१४-१५ मध्ये १२५.९0 कि.ग्रॅ. प्रति हेक्टरपर्यंत पोहचला आहे. सन २o१३-१४ व २o१४-१५ मध्ये रासायनिक खतांच्या मागणीत व खत वापरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तथापी राज्यात सन २०१५-१६ मध्ये पर्जन्यमानाअभावी खत वापरात घट झाल्याचे दिसून येते. राज्यातील मागील तीन वर्षांचा रासायनिक खत वापर (लाख मे.टन)
अ.क्र. पिक खरीप २०१६ करिता लक्षांक
केंद्र राज्य
सं. ज्वारी १०० १००
सु.ज्वारी ४५ १९
सं.बाजरी १०० १००
सु,बाजरी ४५ ८०
भात ३५ ४६
मका १०० १००
तूर ३५ ३५
मुग ३५ २०
उडीद ३५ ३५
१० भुईमुग ३५
११ तीळ ३५ ५३
१२ सोयाबीन ३५

३०

महाराष्ट्र राज्यातील खत पुरवठा नियोजन व उपलब्धता

रासायनिक खत वापर

राज्यात रासायनिक खतांचा वार्षिक खत वापर सरासरी सुमारे ६० लाख मे.टन इतका असून त्यापैकी खरीप हंगामात सरासरी ३३ लाख मे.टन तर रब्बी हंगामात सरासरी २७ लाख मे.टन वापर होतो. रासायनिक खत वापरास राज्यात ख-या अर्थाने सन १९८o-८१ पासून चालना मिळाली आहे. सन १९८०-८१ मध्ये असलेला २१.४ कि.ग्रॅ. प्रति हेक्टर अन्नद्रव्ये स्वरुपातील खत वापर वाढून तो सन २०१४-१५ मध्ये १२५.९0 कि.ग्रॅ. प्रति हेक्टरपर्यंत पोहचला आहे. सन २o१३-१४ व २o१४-१५ मध्ये रासायनिक खतांच्या मागणीत व खत वापरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तथापी राज्यात सन २०१५-१६ मध्ये पर्जन्यमानाअभावी खत वापरात घट झाल्याचे दिसून येते. राज्यातील मागील तीन वर्षांचा रासायनिक खत वापर (लाख मे.टन)
अ.क्र. वर्ष खरीप रब्बी एकूण मागील वर्षाच्या तुलनेत वाढ (अ)/ घात (-)टक्के
२०१३-१४ ३१.६४ २७.२७ ५८.९१ (+)८
२०१४-१५ ३४.४५ २६.५५ ६१.०१ (+)४
२०१५-१६ ३२.४२ २६.४४ ५८.८६ (-)४

खरीप, २o१६

मागणी व मंजुर नियोजन : राज्य शासनाने मागील पाच वर्षातील खत वापर, बदलती पीक पध्दती, उपलब्ध सिंचनक्षमता, जिल्ह्यांची मागणी इत्यादी बाबींचा विचार करुन खरीप, २०१६ साठी ४३.७५ लाख मे.टन खताची मागणी केंद्र शासनाकडे केली होती. दिनांक ४ फेब्रुवारी, २०१६ रोजी नवी दिली येथे झालेल्या विभागीय खत परिषदेमध्ये केंद्र शासनाने राज्याला खरीप हंगाम, २०१६ साठी एकूण ४०.२५ लाख मे.टन खत पुरवठा नियोजन मंजूर केले आहे.
अ.क्र खत प्रकार खरीप २०१६ साठी मागणी
खरीप २०१६ साठी मंजूर नियोजन
युरिया १८.०० १५.५०
डीएपी ५.०० ४.००
एमओपी २.७५ २.७५
संयुक्त खते १२.०० १२.००
एसएसपी ६.०० ६.००
एकूण ४३.७५

४०.२

खरीप, २o१६ साठी महिनानिहाय मंजुर नियोजन

केंद्र शासनाने खरीप हंगाम २o१६ करिता मंजूर केलेल्या खत नियोजनानुसार माहे एप्रिल ते सप्टेंबर २०१६ पर्यंत  महिनानिहाय पुरवठा नियोजन केले   असून जिल्हानिहाय खतसाठा मंजूर केला आहे. जेणेकरून शेतकरी बंधूंना खते उपलब्ध करून देणे सुलभ होईल.

किटकनाशके

रासायनिक किटकनाशके

विविध शासकीय योजनांतर्गत रासायनिक किटकनाशकांचा अनुदानावर तालुकास्तरापर्यंत पुरवठा करण्यासाठी संयुक्त खते  शासनाने महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ या संस्थेची एकमेव एसएसपी 8.00 8.00 शासननियुक्त पुरवठा संस्था म्हणून नियुक्ती केली आहे. विविध  योजनांतर्गत रासायनिक किटकनाशकांची मागणी जिल्हास्तरावरुन परस्पर  पुरवठा संस्थेकडे नोंदविण्यात येते.

जैविक किटकनाशके

विविध शासकीय योजनांतर्गत जैविक किटकनाशकांचा अनुदानावर तालुकास्तरापर्यंत पुरवठा करण्यासाठी शासनाने महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ या संस्थेची एकमेव शासननियुक्त पुरवठा संस्था म्हणून नियुक्ती केली आहे. विविध शासकीय योजनांतर्गत लागणा-या जैविक किटकनाशकाची मागणी जिल्हास्तरावरुन एकात्मिक कोड नियंत्रण या संकल्पनेस प्रोत्साहन देण्यासाठी तसेच रासायनिक किटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी ट्रायकोडर्मा, बिव्हेरिया बॅसियाना, व्हर्टीसिलीयम लेकॅनि, एचओएनपीव्ही, मेटॅरिझियम, स्युडोमोनास आणि अझेंडरीक्टीन या सारख्या जैविक किटकनाशकांच्या वापरांत वाढ होत आहे

बियाणे खरेदी करतांना शेतक-यांनी घ्यावयाची काळजी

● बियाण्याची खरेदी करताना कंपनीचे प्रतिनिधी किंवा विक्रेते यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून करू नये. तसेच, कंपन्यांच्या जाहिराती वाचूनही बियाण्याची खरेदी करू नये. बियाणे अभ्यासपूर्वक खरेदी करावे.

● खरेदी करावयाच्या बियाणे वाण/जात यांची आपल्या भागासाठी शिफारस केली आहे का, हे जाणून घ्यावे. निवडलेला वाण कोणत्या किडीसाठी अथवा रोगासाठी प्रतिकारक्षम किंवा सहनशील आहे का, याची माहिती घ्यावी.

● निवडलेला वाण किती कालावधीचा आहे, त्याची वैशिष्ट्ये कोणती

● भाजीपाला बियाण्याच्या बाबतीत तो वाण कोणत्या हंगामासाठी शिफारस केलेला आहे व कोणत्या कालावधीपर्यंत लागवड करायचा, हे जाणून घ्यावे. शिफारस केलेला लागवड कालावधी उलटून गेल्यानंतर लागवड करू नये.

● वाणाची निवड करताना जमिनीचा प्रकार, हवामान, लागवडीचे अंतर, कोरडवाहू / बागायत यांचा विचार करावा. वाणाची निवड करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

● कृषि विद्यापीठाच्या शिफारसीनुसार एकरी लागणारे बियाणे यांची माहिती

● खासगी क्षेत्रातील संशोधित केलेले टूथफुल (सत्यतादर्शक) बियाणे निवडायचे असेल, तर एकच वाण सर्व क्षेत्रासाठी न निवडता क्षेत्राप्रमाणे दोन-तीन वाण निवडावेत. या वाणांचा लागवडीनंतर चांगला अभ्यास o अधिक उत्पादनाचे प्रलोभन कुणी दाखविल्यास ते वाण अपरििचत असतील, तर निवड करू नये. यातून फसगत होऊ शकते. अशा अपरिचित जातीपासून नवीन कोड व रोगांचा आपल्याकडे शिरकाव होऊ शकतो.

● खरेदी केलेल्या बियाण्याची विक्रेत्याकडून पकी पावती घ्यावी. या अंतिम तारीख, शेतक-याचे नाव, पूर्ण पत्ता इ. स्पष्ट लिहावे. पावतीवर विक्रेत्याची व शेतक-याची सही असणे आवश्यक आहे.

● बियाण्याच्या पिशवीवरील किमतीपेक्षा जास्त भावात बियाणे खरेदी करू नये. पिशवीवर किंमत छापली नसल्यास किंवा आहे त्या किमती पेक्षादुकानदार जास्त पैसे मागत असल्यास जिल्हा वजनमापे निरीक्षकांकडे तक्रार करावी. छापलेल्या किमतीपेक्षा जास्त पैसे घेणे गुन्हा आहे.

  • प्रमाणित (सर्टिफाईड) बियाण्याची पिशवी तिन्ही बाजूंनी आतून शिवलेली असते. वरच्या बाजूने प्रमाणपत्र शिवलेले असते व त्याला सील लावलेले असते. अलीकडे प्लॅस्टिक बॅगमध्ये बियाणे उपलब्ध होत आहे. त्यालाही पॅकिंग असते व त्यावर आवश्यक मजकूर छापलेला असतो.
  • बियाणे खरेदी करताना लेबलवरील माहिती पाहावी. लेबलवर पिकाचे नाव, जात, उगवणशक्ती, भौतिक व आनुवंशिक शुद्धता टक्केवारी, बियाणे चाचणी, तारीख, महिना व वर्ष, बीजप्रक्रियेला वापरलेले रसायन,
  • बियाणे खरेदी बिलावर छापील बिल क्रमांक असावा. पेरणीवेळी पिशवी खालच्या बाजूने फोडावी. त्यामुळे पिशवीवर असलेले लेबल व बीज प्रमाणिकरण यंत्रणेचा टॅग व्यवस्थित राहतील.
  • पेरणीनंतर टॅगसह रिकामी पिशवी, बिल जपून ठेवावे. उगवण कमी झाली रिकाम्या पिशव्या, डबे यांची विक्री करू नये.
  • मुदतबाह्य तसेच पॅकिंग फोडलेले सुटे बियाणे खरेदी करू नये. सरळ वाणाचे बियाणे दरवर्षी खरेदी करून उत्पादन खर्च वाढवू नये. एकदा पिशवीतले बियाणे खरेदी केल्यानंतर त्यापासून चांगले बियाणे करून ते तीन ते चार वर्षे वापरता येते. वजनाविषयी शंका आल्यास ते वजन करूनच घ्यावे.
  • काही कंपन्या बीटी कापसाचे बियाणे विकताना ते लाल्या प्रतिबंधक किंवा अन्य रोगास प्रतिकारक आहे, अशी जाहिरात करतात. बीटी कापूस बियाणे हे फक्त बोंडअळीस प्रतिकारक असल्याचे शेतक-यांनी समजून घ्यावे. यासाठी अशा कंपनीचे होलोग्राम माहीत करून घ्यावे. बियाण्याची खरेदी शासनमान्य/ परवानाधारक विक्रेत्याकडूनच करावी. बियाण्याविषयी काही तक्रार असल्यास जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी, लेखी तक्रार द्यावी.


स्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate