जालना जिल्ह्यासाठी सदरच्या कृषि विज्ञान केंद्राची स्थापना १९९२ मय झाल सटबर १९९३ पति या कान प्रत्यक्ष कमरा सुरुवात केली. जालना शहरापासून साधारणतः ४ कि.मी. अंतरावर खरपुडी गावालगत या केंद्राची प्रशासकीय इमारत व प्रात्यक्षिक प्रक्षेत्र आहे. मराठवाडा शेतीसहाय्य मंडळ या सेवाभावी संस्थेमार्फत हे केंद्र चालविले जाते.
कृषि विज्ञान केंद्र हा भारत सरकारचा उपक्रम असून भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिलीद्वारे या केंद्रास अर्थसहाय्य केले जाते. कृषि विज्ञान केंद्राची कार्यपद्धती आज रोजी देशात एकूण ६४२ कृषि विज्ञान केंद्रे कार्यरत असून त्यातील बहुतांश केंद्रे ही कृषि विद्यापीठामार्फत चालविली जातात.
तर काही कृषि विज्ञान केंद्रे भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या संशोधन संस्थामार्फत कार्यरत आहे. त्यापैकी ४४ कृषि विज्ञान केंद्रे महाराष्ट्रात आहेत.
कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत
- स्थानिक गरजांवर आधारित व स्थानिक शेती पद्धतीच्या अनुषंगाने शेतावरील चाचण्यांचे आयोजन करणे.
- जिल्ह्यातील प्रमुख पिके आणि पीक पद्धती यांची उत्पादनक्षमता तपासण्यासाठी शेतक-यांच्या शेतावर प्रथमदर्शी पीक प्रात्यक्षिकांचे आयोजन करणे.
- आधुनिक कृषि तंत्रज्ञानावर ज्ञान आणि कौशल्य यांची वृद्धी होण्यासाठी शेतकरी आणि विस्तार कार्यकर्ते यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करणे.
- जिल्ह्याच्या कृषि अर्थशास्त्रात सुधारणा करण्याच्या हेतूने सार्वजनिक, खासगी आणि सेवाभावी क्षेत्राच्या प्रयत्नास तांत्रिक सहाय्य करणे आणि त्यासाठी जिल्ह्याच्या शेती तंत्रज्ञानाचे स्रोत आणि ज्ञान केंद्र म्हणून कार्य करणे.
- शेतक-यांना सुधारित बियाणे, रोपे/कलमे, जैविक खते, पशुधन यांसारख्या तांत्रिक निविष्ठा उपलब्ध करुन देणे.
- शेती आणि शेती आधारित व्यवसायाबाबत जाणीवजागृती आणि त्याचा गतीने प्रसार आणि अवलंब होण्याच्या दृष्टीने विविध विस्तार कार्यक्रमांचे आयोजन करणे. तांत्रिक मनुष्यबळ : कृषि विज्ञान केंद्रात एकूण १६ शास्त्रज्ञ व कर्मचारी कार्यरत असून कार्यक्रम समन्वयक हे केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून काम पाहतात. त्यांच्या मदतीला ६ विषय विशेषज्ञ, ३ कार्यक्रम सहाय्यक, २ कार्यालयीन कर्मचारी आणि ४ सहाय्यक कर्मचारी कार्यरत असतात. सध्या जालना कृषि विज्ञान केंद्रात कृषिविद्या, उद्यानविद्या, मृदशास्त्र, पीक संरक्षण, पशूविज्ञान, अन्नतंत्र आणि कृषि अभियांत्रिकी इत्यादी विषयातील तज्ज्ञ उपलब्ध आहेत.
कृषि विज्ञान केंद्राचे प्रक्षेत्र, प्रात्यक्षिक युनिटस व प्रयोगशाळा
कृषि विज्ञान केंद्राकडे स्वतःचे एकूण २० हेक्टर प्रात्यक्षिक प्रक्षेत्र असून त्यात जातात व ती शेतक-यांना प्रत्यक्ष भेटीच्या वेळी दाखवली जातात. याशिवाय प्रक्षेत्रावर शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, रेशीमशेती, रोपवाटिका, शेडनेटहाऊस, पॉलीहाऊस, फळे व भाजीपाला प्रक्रिया, मशरूम उत्पादन इत्यादी प्रात्यक्षिक युनिट कार्यरत आहेत. यापासून शेतक-यांना शेतीपूरक जोडधंद्याची प्रत्यक्ष माहिती मिळून त्याचे अर्थशास्त्र व फायदे समजतात. तसेच व्यावसायिक प्रशिक्षणाच्या वेळी हे युनिटस महत्त्वाची भूमिका बजावतात. शेतक-यांच्या सेवेसाठी कृषि विज्ञान केंद्रात माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा, जैविक कोड नियंत्रण प्रयोगशाळा, देठ व पाने परिक्षण प्रयोगशाळा कार्यरत असून यामार्फत शेतक-यांना विविध तपासण्या आणि माती व पाणी परिक्षण करुन दिले जाते.
उपलब्ध सोयी सुविधा
कृषि विज्ञान केंद्राद्वारे शेतकरी व संबंधित गरजूंना खालील सोयीसुविधा पुरविल्या जातात.
- शेती संबंधित सर्व विषयांवरील तांत्रिक मार्गदर्शन
- सोयाबीन, तूर, हरभरा, ज्वारी, इत्यादी पिकांच्या सुधारित वाणांचे बियाणे.
- मोसंबी, डाळींब, आंबा, पेरू, सीताफळ यांसारख्या फळपिकांची कलमे/रोपे. ४) ट्रायकोडर्मा, सुडोमोनास व तत्सम जैविक औषधांचा पुरवठा.
- उस्मानाबादी शेळ्या, लाल कंधारी बैल, पशुधन चिकित्सा इत्यादी सेवा.
- जमिनीतील मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी तसेच शेतीसाठी पाणी तपासणी इत्यादी.
- पिकांचे देठ व पाने तपासून त्यानुसार खतांच्या शिफारशी.
- आवळा, आंबा, जांभूळ यासारख्या फळांचे मूल्यवर्धित पदार्थ व त्याबाबत मार्गदर्शन उदा. आवळा कॅन्डी, आवळा लाडू, आवळा
- कृषि अभियांत्रिकी सेवा उदा. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, सामूहिक शेततळे, पॅकहाऊस, शेडनेटहाऊस, गांडूळशेड याबाबत तांत्रिक मार्गदर्शन व प्रकल्प प्रस्ताव तयार करण्यासाठी सहाय्य.
- गृह विज्ञान विभागामार्फत महिलांसाठी श्रम कमी करणारा सुलभ कापूस वेचणी कोट, तत्सम अवजारे आणि महिलांचे आरोग्य, व्यवस्थापन मार्गदर्शन तसेच बचतगट मार्गदर्शन इत्यादी.
प्रमुख उपक्रम
शेतावरील चाचण्या, प्रथमदर्शी पीक प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण कार्यक्रम हे कृषि विज्ञान केंद्राचे उपक्रम असून हे उपक्रम विशिष्ट गावात तीन ते चार वर्षे राबवण्यात येतात. जिल्ह्यात सूक्ष्म कृषि हवामान आणि विशिष्ट पीकपद्धती यांचा विचार करुन तीन ते चार गावांचा समूह निवडला उपाययोजना आणि प्रात्यक्षिके सदरील गावात आयोजित करण्यात येतात. त्यावर आधारित शेतीदिन, शेतकरी मेळावे, शिवारफे-या, निदानात्मक भेटी, अभ्यास सहली, वृत्तपत्रातून लेख, शेतक-यांच्या यशोगाथा इत्यादी उपक्रमांच्या माध्यमातून या प्रयोगांचे निष्कर्ष शेतक-यांमार्फत पोहचविण्यात येतात. दरवर्षी अशा उपक्रमातून २५ हजारपेक्षा जास्त शेतक-यांना यांचा लाभ होतो.
नावीन्यपूर्ण उपक्रम शेतक-यांना केंद्रस्थानी मानून त्यांच्या सहभागाने व पुढाकाराने उपक्रम राबविल्यास ते उपक्रम यशस्वी होतात अशी या केंद्राची धारणा असून त्याच उद्देशाने खालील नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत.
- कृषि विज्ञान मंडळ : काही प्रयोगशील व प्रगतिशील शेतक-यांनी एकत्र येऊन सप्टेंबर १९९७ मध्ये एक स्वयंस्फूर्त गट स्थापन केला. दर महिन्याच्या ५ तारखेला न चुकता कृषि विज्ञान केंद्रात स्वखर्चाने एकत्र येणे व पूर्वनियोजित विषयावर चर्चासत्र घडवून आणणे हा या मंडळाचा प्रमुख उद्देश. हे चर्चासत्र घडवून आणण्यासाठी तज्ज्ञांची निवड व कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम कृषि विज्ञान केंद्राचे. या मंडळाचे आजपर्यंत एकूण २२४ मासिक चर्चासत्र संपन्न झाले असून त्यात जवळपास ४१० पेक्षाष्जास्त विषयांवर मार्गदर्शन झाले आहे. मागील चर्चासत्रावर आधारित प्रश्नमंजूषा कार्यक्रम आयोजित करुन सलग पाच प्रश्नांची उतरे देणा-या सभासद शेतक-याला चांदीची नाणी बक्षीस देण्याचा अभिनव उपक्रम मंडळामार्फत राबविला जातो. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी उपस्थित शेतक-यांसाठी अन्त्रदान आणि चांदीची नाणी देण्यासाठी आर्थिक तरतूद ही शेतक-यांमार्फतच केली जाते. प्रत्येक चर्चासत्रास गरजेनुसार २०० ते ६०० शेतकरी उपस्थित असतात. जिल्ह्यातील जवळपास सर्व भागातून आणि शेजारील जिल्ह्यातूनही या कार्यक्रमास मोठ्या उत्सुकतेने शेतकरी हजर असतात.
- कापूस एकात्मिक कोड व्यवस्थापन : कापूस हे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असून ७0 टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र हे कापूस पिकाखाली असते. सुरुवातीच्या काळात नॉनबीटी कापूस असताना बोंडअळीच्या समस्या शेतक-यांना भेडसावत होती. बी.टी. कापूस आल्यावर सुध्दा रस शोषण करणा-या किडींची प्रामुख्याने पांढरी माशी व तुडतुडे यांची समस्या शेतक-यांना सतावू लागली. त्या अनुषंगाने कापूस एकात्मिक कोड व्यवस्थापनाचे विशिष्ट पॅकेज तयार करुन त्या अंतर्गत बीजप्रक्रिया, पिकात झेंडू, चवळी आणि मका या सापळापिकांचा वापर, फेरोमॅन ट्रॅप, लाइट ट्रॅप यांचा वापर करुन घटकांचा वापर करुन रासायनिक औषधांचा वापर कमी करण्याच्या जातीचा आग्रह न धरता पेरणीपूर्वी शिफारशीनुसार रासायनिक खत, नत्राचा मर्यादित वापर आणि एकात्मिक कोड व्यवस्थापन या त्रिसूत्रीचा वापर करुन कापूस उत्पादनात स्थिरता आणली. आज कृषि विज्ञान केंद्राच्या संपर्कातील ५० पेक्षाही जास्त गावात या तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकरी करीत आहेत.
- पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन : जिल्ह्यातील कडवंची, शिवणी आणि आसरखेडा या गावात केलेल्या पाणलोट प्रकल्पापासून राज्य आणि देशपातळीवर केंद्राची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. शास्त्रशुद्ध नियोजनातून कडवंची गावाचे एकूण उत्पादन ७७ लक्ष रुपयांवरून जवळपास १५ कोटी रुपयांमार्फत पोहोचले आहे. गावात ३00 एकरपेक्षा जास्त द्राक्ष लागवड झाली असून द्राक्षांचे गाव म्हणून उत्पादन झाले. पाण्याच्या ताळेबंदाची संकल्पना मांडून शिवणी गावाने देशपातळीवर एक वेगळे उदाहरण पुढे आणले आहे. शिवणी आणि आसरखेडा या दोन्ही गावात फळबागा वाढल्या नसल्या तरी किमान
- प्रयोगशील दांपत्य शेतकरी मंडळ : शेती व्यवसायात महिलांची निर्णयप्रक्रियेतील भूमिका व पुढाकार महत्वाचा असून त्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने प्रयोगशील दांपत्य शेतकरी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. कृषि विज्ञान मंडळाच्या धर्तीवर स्वयंस्फूर्त ३५ दांपत्य या गटात सहभागी असून दर महिन्याच्या अमावस्येला गटातीलच एका दांपत्याच्या शेतावर भेट देऊन शिवारफेरी करावी व त्यांनी केलेले अभिनव प्रयोग आपल्या शेतात राबवावेत असा हा उपक्रम आहे. या मंडळाने आपला स्वतःचा बचत गटही स्थापन केला असून दर महिन्याला ठराविक रकम जमा करण्यात येते. आजपर्यंत या गटाच्या एकूण ७५ बैठका झाल्या आहेत.
- कृषि तंत्रज्ञान महोत्सव : शेतक-यांना सर्व तंत्रज्ञानाची माहिती एकाच जागेवर व्हावी, यासाठी दरवर्षी कृषि विज्ञान केंद्रातर्फे तीन दिवसांचा कृषि तंत्रज्ञान/जत्रा उपक्रम साजरा केला जातो. तीन दिवस सातत्याने कृषि विषयक व्याख्याने, प्रदर्शनी व प्रक्षेत्रावर पीक प्रात्यक्षिकांना भेटी असे या कार्यक्रमाचे स्वरुप असते. गेल्या तीन वर्षापासून मोठ्या संख्येने शेतकरी या कार्यक्रमास हजेरी लावत आहेत.
इतर प्रायोजित उपक्रम
- फिरती माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा : मानव विकास मिशन कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत व कृषि विभागाच्या समन्वयाने दोन फिरत्या माती व पाणी परिक्षण प्रयोगशाळा कृषि विज्ञान केंद्रामार्फत जिल्ह्यात कार्यरत झाल्या आहेत. गेल्या मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात या दोन प्रयोगशाळांतून सुमारे ४५oo माती व पाणी नमुने जिल्ह्याच्या विविध भागात गावात जाऊन तपासण्यात आले असून संबंधित शेतक-यांना जागेवरच अहवाल देण्यात आले आहेत. विशेष
- बाब म्हणजे फिरत्या माती व पाणी परिक्षण प्रयोगशाळेत नमुना घेऊन येणा-या महिलांसाठी सर्वसाधारण तपासणी मोफत करण्याची भूमिका केंद्राने घेतली असून जवळपास ५०० नमुने तपासूनही दिले आहेत.
- हवामान आधारित कृषि सल्ला सेवा : नाबार्डच्या सहकार्याने विशिष्ट पथदर्शी प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील ५o गावांची निवड करुन संबंधित शेतकरी मंडळामार्फत एकूण ५००० शेतक-यांना भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त होणारे हवामान आधारित कृषि संदेश त्यांच्या मोबाईलवर मराठी भाषेत पाठविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत आठवड्यातून दोन ते तीन संदेश सहभागी शेतक-यांना पाठविण्यात येतात. आजपर्यंत १oo संदेश या ५ooo शेतक-यांना पाठविण्यात आले आहेत.
- बी.टी. कापूस कोड व्यवस्थापनाची राष्ट्रीय माहिती प्रणाली : भारतीय कृषि अनुसंधान परिषदेअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय एकात्मिक संयुक्त उपक्रमाअंतर्गत हा एक नेटवर्क प्रकल्प असून त्यामार्फत देशातील विविध भागातील कापूस पिकातील किडींचे सर्वेक्षण करुन त्याची माहिती एकत्रितपणे उपलब्ध करुन देणे व त्या अंतर्गत प्रभावी कोड व्यवस्थापन करणे हा या प्रकल्पाचा हेतू आहे. जालना कृषि विज्ञान केंद्र या उपक्रमाचा एक भाग असून त्यामार्फत जिल्ह्यातील प्रातिनिधिक २० गावातील निवडलेल्या कापूस शेतांचे कोड सर्वेक्षण करुन त्याची माहिती दर आठवड्याला ऑनलाइन पाठविली जाते. तसेच निवडलेल्या गावातील शेतक-यांना किडींच्या पातळीबाबत अवगत करुन त्यानुसार मार्गदर्शन केले जाते.
- उत्कृष्ट कापूस पुढाकार प्रकल्प : जागतिक निसर्ग निधी (डब्ल्यू डब्ल्यू एफ.इंडिया) प्रायोजित हा उपक्रम जिल्ह्यातील ५o गावात गेल्या ४ वर्षापासून राबविण्यात येत आहे. रासायनिक खते, औषधे, पाणी, मजूर इत्यार्दीचा कमीतकमी प्रमाणात वापर करुन कापूस लागवडीपासून विक्रीपर्यंत सहभागी शेतक-यांना मार्गदर्शन करण्यात येते. बेटरकॉटन नावाने उत्पादित झालेल्या या नोंदणीकृत कापसास जागतिक पातळीवर मागणी असल्यामुळे शेतक-यांना चार पैसे जास्त मिळू शकतात. सध्या हा उपक्रम सुमारे ८१८३ हेक्टर क्षेत्रावर राबविण्यात येत असून त्यात सुमारे ६३९१ शेतकरी सहभागी झाले आहेत.
- मुक्त कृषि शिक्षण : नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाअंतर्गत मुक्त कृषि शिक्षण केंद्र येथे कार्यरत असून त्या अंतर्गत उद्यानविद्या पदविका, भाजीपाला पदविका, फुलशेती प्रांगणउद्यान पदविका तसेच कृषिविज्ञान पदवी व उद्यानविद्या पदवी, इत्यादी शिक्षणक्रमांना प्रवेश दिले जातात. विशेष म्हणजे शेती किंवा काम करता-करता आणि बारावी पास/नापास कोणत्याही वयाच्या व्यक्तीस या शिक्षणक्रमास प्रवेश घेता येतो.
विशिष्ट दिवशी संपर्कसत्रास येऊन शिक्षणक्रम पूर्ण करता येतो. हे सर्व शिक्षणक्रम महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त असून कृषि विद्यापीठाच्या शिक्षणक्रमाशी समकक्ष आहेत. या शिक्षणक्रमाची प्रवेश क्षमता ६oo च्या जवळपास आहे. वरीलप्रमाणे या केंद्रामार्फत कार्यरत असलेले काही महत्वाचे उपक्रम आहेत. याशिवायही नाबार्ड अंतर्गत शेतकरी मंडळाची स्थापना, महाराष्ट्र कृषि स्पर्धाक्षण प्रकल्पांअंतर्गत शेतक-यांची गट बांधणी व प्रशिक्षण, जागतिक हवामान बदलावर आधारित अंमलबजावणी यंत्रणेस सहाय्य अशा विविध उपक्रमात केंद्राचा सहभाग आहे.
शेतक-यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणारे उपक्रम
शेतक-यांच्या गरजेनुसार त्यांच्या गटांना सहाय्य करण्याचे धोरण केंद्राने ठेवले आहे. या अंतर्गत खालील शेतक-यांचे गट कार्यरत असून कृषि विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली प्रगती करीत आहेत.
- सधन डाळींब गट (१४ शेतकरी) )
- फुलशेती उत्पादन गट (३० शेतकरी) )
- शेडनेटहाऊस शेतकरी गट (५० पेक्षाष्जास्त शेतकरी) )
- गवारगम उत्पादन गट (७५o शेतकरी व १ooo एकर क्षेत्र)
- सीताफळ उत्पादन गट (३0 शेतकरी)
केंद्रास मिळालेले पुरस्कार
कृषि विज्ञान केंद्राच्या नावीन्यपूर्ण कार्यपद्धतीमुळे या केंद्रास व राज्यशासनाचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत, ते खालील प्रमाणे.
- राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट कृषि विज्ञान केंद्र पुरस्कार, २oo६: भारतीय कृषि अनुसंधान परिषदेद्रारे दिला जाणारा पुरस्कार वर्ष २oo६ साठी या केंद्रास यापूर्वीच प्राप्त झाला आहे. पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, एकात्मिक कोड व्यवस्थापन, कृषि विज्ञान मंडळ, फळे व भाजीपाला प्रक्रिया, सुधारित बियाणे, कलमे/रोपे व जैविक औषधांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा या बाबींची नोंद या पुरस्कारासाठी घेण्यात आली आहे.
- महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार, २00५: कृषि विज्ञान केंद्राने वनीकरण, पडीक जमीन विकास व तत्संबंधीची जनजागृती या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सेवाभावी संस्था संवर्गातील राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा हा पुरस्कार महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात आला आहे.
- वसंतराव नाईक (सामाईक) कृषि पुरस्कार, २०१३ : स्व. वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठान, मुंबई यांच्यामार्फत हा पुरस्कार दुष्काळी परिस्थितीत उत्कृष्ट परिणाम दाखविणा-या कडवंची पाणलोटाची नोंद घेऊन या कृषि विज्ञान केंद्रास दिनांक १ जुलै, २०१३ रोजी मुंबई येथे प्रदान करण्यात आला आहे. या केंद्राचे शास्त्रज्ञ तसेच अनेक संपर्क शेतक-यांना खास करुन कृषि विज्ञान मंडळाच्या सदस्यांना विविध क्षेत्रात पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये जगजीवनराम कृषि पुरस्कार, कृषिभूषण पुरस्कार, शेतीनिष्ठ शेतकरी, सह्याद्री कृषि सन्मान पुरस्कार इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे.
- सामाजिक उपक्रम : वरील कार्यक्रमांशिवाय सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून दरवर्षी धूलिवंदन आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कृषि विज्ञान केंद्रात स्नेहसंमेलनासारखा कार्यक्रम आयोजित करुन कोणत्याही एका सामाजिक विषयावर चर्चा करण्यासाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाते.
धूलिवंदनाच्या दिवशी रंग न खेळता हा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. या कार्यक्रमास ५oo ते १ooo शेतकरी उपस्थित असतात. अशाप्रकारे या कृषि विज्ञान केंद्रामार्फत राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा .
संपर्क क्र. ९४२३७४८८६५
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन