अडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर उंच वाढणारे झुडूप आहे. पाने हिरवी, लांबट, वर्तुळाकार, टोकाकडे निमुळती होत गेलेली असतात. मध्यम आकाराचे, झुडपाचे सोटमूळ लांब वाढते. खोडाला फांद्या समोरासमोर येतात व पेर फुगलेली असतात. फुले पांढरी असतात फळे टोकाला लागतात.
लागवड
याची लागवड पावसाळ्यात करावी, कुंपणाच्या कडेला, शेतजमिनीच्या बांधावर 1 x 1 मीटर अंतरावर याची लागवड करता येते. शेतात 60 x 60 सें.मी. अंतरावर लागवड करावी.
या वनस्पतीवर रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव आढळून येत नाही. पानांची किंवा फुलांची काढणी गरजेनुसार झाडाच्या पानाच्या प्रमाणानुसार करावी. साधारणतः तिसऱ्या महिन्यापासून पाने काढणीसाठी तयार होतात. त्यानंतर एक ते दोन महिन्यांच्या अंतराने छाटणी करावी. छाटणी केल्यानंतर पाने, फांद्या, फुले हे सावलीत वाळवावीत. संपूर्ण वाळल्यानंतर त्याची पावडर करावी. यामध्ये कटू गुण असल्याने यावर बुरशीचा प्रादुर्भाव होत नाही.
संपर्क - 02426- 243315
औषधी व सुगंधी वनस्पती योजना,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
सुधाकर बहाळे, मालदाड, जि. नगर
माहिती संदर्भ : अॅग्रोवन