অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बहुगुणी आवळा

प्रस्तावना

आवळा तुरट, आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे हिरव्या रंगाचे फळ.  हा वृक्षवर्गीय औषधी उपयोगाकरिता प्रसिद्ध आहे. जीवनसत्व “क” चे हे भांडार आहे.  भारतात सर्वत्र याची लागवड केली जाते. एप्रिल मे मध्ये याच्या फुलांचा बहर येतो तर फळे हिवाळ्यात येतात.

आपल्या भारत देशाला सर्वच बाजूंनी निसर्गाने भरभरून देणी दिलेली आहेत. औषधी गुणांनी परिपूर्ण वनस्पती हे त्यातलेच एक मुख्य देणे. अनंत काळापासून या वनस्पती आपले जीवन व आरोग्य संपन्न करत आहेत. अशीच एक अतिशय उपयुक्‍त भारतीय वनस्पती म्हणजे "आवळा'. आवळा हे मोठे औषध तर आहेच, पण त्याच्या रुचकर गुणामुळे आवळा स्वयंपाकघरातही वापरला जातो.

शेतकर्‍यांना कमी खर्चात जास्त उत्पादन देणार पीक म्हणजे आवळा. आवळ्याचा उपयोग जसा दैनंदिन जीवनात खाण्यासाठी केला जातो तसाच तो बर्‍याचशा ऑषधामध्ये सूध्दा केला जातो. आवळा हे शेतकर्‍यांना नगदी उत्पन मिळवून देणार पीक आहे

आवळा लागवडीसाठी जमिनीची निवड:

आवळा लागवडीसाठी हलकी ते भारी, पाण्याचा योग्यप्रमाणात निचरा होणारी, कँल्सियम युक्त जमिन या पिकासाठी योग्य आहे. चुनखडीयुक्त किंवा रेताड जमिनीचा वापर करु नये

हवामान : आवळा हे फळझाड उष्ण व समशीतोष्ण हवामानात सर्व ठिकाणी येते.

लागवडीसाठी योग्य जाती

शास्त्रीयदृष्टीने आवळा लागवड करताना दोनपेक्षा अधिक जातींच्या कलमांची लागवड केल्यास परागीभवनासाठी त्याचा फायदा होतो. त्यामुळे एकाच जातीच्या कलमांची लागवड करण्यापेक्षा दोन किंवा तीन वेगवेगळ्या जातींची लागवड फायदेशीर ठरते. लागवडीसाठी कृष्णा, कांचन, चकैया, एनए-6, एनए-7 या जातींची निवड करावी

लागवड कसी करावी:

लागवडीसाठी 1 मी. x 1 मी. x 1 मी. आकाराचा खड्डा खोदून घ्यावा. या खड्ड्यात 15 ते 20 किलो शेणखत, दिड किलो सिंगल सुपर फाँस्फेट, 100 ग्रम फाँलिडाँल भुकटी आणि चांगल्या प्रतिची माती यांचे मिश्रण जमिनीपासुन 15 से. मी.उंच इतके भरावे अभिवरुध्दि कलम किंवा डोळे भरुन करावी. या साठी आवळ्याचे बी पावसाळ्यात शेतात लावुन किंवा आवळ्याची पिशवीतील रोपे लावून पूढील वर्षी डोळे भरावेत. यासाठी रोपाचे खोड पेन्सिलाइतक्या जाडीचे झाल्यानंतर आँगस्ट महिण्यात हव्या त्या जातीचे डोळे ठिगळ पध्दतीने भरून घ्यावेत.चांगल्या परागीभवनासाठी दोन जातींची लागवड करावी. दुसऱ्या जातीची लागवड मूळ क्षेत्राच्या किमान दहा टक्के असावी. झाडांच्या योग्य वाढीसाठी वळण देणे आवश्‍यक आहे.

आवळ्याच्या झाडाला जमिनीपासून एक मीटर उंचीवर पाच ते सहा जोमदार फांद्या योग्य अंतरावर चारही दिशांना विखुरलेल्या स्थितीत वाढतील अशा ठेवाव्यात. खोडावर एक मीटरच्या खाली येणारी फूट काढून टाकावी. फळांचा हंगाम संपल्यावर रोगट, कमजोर, वाळलेल्या फांद्या छाटून टाकाव्यात. आवळ्यामध्ये सुरवातीच्या पाच ते सहा वर्षांपर्यंत आंतरपिके घेता येतात. आवळा बागेत जानेवारी ते फेब्रुवारी पानगळ होत असल्याने या महिन्यात आंतरपिके घेऊ नयेत

पिक

कच्चे फळ हिरवे असते, ते पिकले की पिवळ्या रंगाकडे झुकते. आवळ्याची फळे व्यवस्थित पिकल्यानंतरच औषधात वापरायची असतात. यामुळे कार्तिक महिन्यातील शुद्ध पक्षाच्या नवमीला आवळीपूजन करून मगच पूर्णपणे तयार झालेले वीर्यवान आवळे औषधात वापरण्याची प्रथा आहे. आधुनिक संशोधनानुसार सुद्धा या महिन्यात काढलेल्या आवळ्यात सर्वाधिक प्रमाणात ऍस्कॉर्बिक ऍसिड (सी व्हिटॅमिन) असते असे सिद्ध झालेले आहे.

100 ग्रम फाँलिडाँल भुकटी आणि चांगल्या प्रतिची माती यांचे मिश्रण जमिनीपासुन 15 से. मी.उंच इतके भरावे अभिवरुध्दि कलम किंवा डोळे भरुन करावी. या साठी आवळ्याचे बी पावसाळ्यात शेतात लावुन किंवा आवळ्याची पिशवीतील रोपे लावून पूढील वर्षी डोळे भरावेत. यासाठी रोपाचे खोड पेन्सिलाइतक्या जाडीचे झाल्यानंतर आँगस्ट महिण्यात हव्या त्या जातीचे डोळे ठिगळ पध्दतीने भरून घ्यावेत.चांगल्या परागीभवनासाठी दोन जातींची लागवड करावी. दुसऱ्या जातीची लागवड मूळ क्षेत्राच्या किमान दहा टक्के असावी. झाडांच्या योग्य वाढीसाठी वळण देणे आवश्‍यक आहे.

पूर्ण वाढ झालेले आवळ्याचे झाड दरवर्षी साधारण 50 ते 70 किलो आवळे देते. झाडाची व्यवस्थित देखभाल केली तर 70 वर्षांपर्यंत आवळ्याच्या झाडाला फळे येऊ शकतात .

आवळा गुणाचा

आयुर्वेदात असंख्य औषधांमध्ये, रसायनांमध्ये आवळा वापरला जातो. ताजा आवळा कधी वापरायचा, वाळवलेली आवळकाठी कशी वापरायची, काढा कसा करायचा हे सर्व आयुर्वेदात सांगितलेले आहे. आधुनिक शास्त्रही व्हिटॅमिन "सी'चा सर्वोत्तम स्रोत म्हणून आवळ्याकडे पाहते. आवळ्याची विशेषतः ही की आवळा शिजवला तरीसुद्धा त्यातील "सी' व्हिटॅमिन नष्ट होत नाही. आयुर्वेदाने आवळ्याचे गुणधर्म याप्रमाणे सांगितले आहेत,

आवळा तुरट, आंबट व गोड असतो; शीतल तसेच पचायला हलका असतो; दाह तसेच पित्तदोष कमी करतो; उलटी, प्रमेह, सूज वगैरे रोगांमध्ये उपयुक्‍त असतो; रसायन म्हणजे रसरक्‍तादी धातूंना संपन्न करणारा असतो तसेच थकवा, मलावष्टंभ, पोटात वायू धरणे वगैरे त्रासांमध्ये हितकर असतोच. या सर्व गुणांमुळे आवळ्याला अमृताची उपमा दिलेली आढळते.


याशिवाय आवळा त्वचेसाठी उत्तम असतो, कांती सुधरवतो, केसांसाठी चांगला असतो, डोळ्यांसाठी उपयोगी असतो. आवळ्याचे फळ तर मुख्यत्वे औषधात वापरले जातेच, पण आवळ्याच्या बिया, सालसुद्धा औषधी गुणांच्या असतात. 

आवळा रसायन गुणाचा आणि तारुण्य टिकवून ठेवणाऱ्या द्रव्यांमध्ये श्रेष्ठ समजला जात असल्याने बहुतेक सर्व रसायनांमध्ये असतोच. च्यवनप्राश, ब्राह्मरसायन, आमलकावलेह, धात्री रसायन वगैरे रसायनांमध्ये आवळा हाच मुख्य घटक असतो.

कसा वापराल

आवळा असंख्य प्रकारांनी वापरला जातो. त्यातले सर्वांत महत्त्वाचे व अनुभवाचे काही उपाय पुढीलप्रमाणे सांगता येतील.

  • पित्तशामक - उष्णता कमी करण्यासाठी आवळा उत्तम असतो.
  • पित्तामुळे उलट्या होत असल्यास आवळ्याचे पाव चमचा चूर्ण चंदन उगाळून बनविलेल्या गंधात मिसळून थोडे थोडे चाटल्याने बरे वाटते.
  • डोळ्यांची आग होत असल्यास पाच - सहा तास पाण्यात भिजवलेली आवळकाठी आणि तीळ बारीक वाटून त्याचा लेप बंद डोळ्यांवर करण्याचा फायदा होतो.
  • पोटात, छातीत, घशात पित्तामुळे जळजळत असेल तर पाव चमचा आवळ्याचे चूर्ण, त्यात अर्धा चमचा साखर व एक चमचा घरी बनविलेले साजूक तूप यांचे मिश्रण थोडे थोडे घेता येते.
  • नाकातून रक्‍त येत असल्यास आवळ्याच्या चूर्णाचा पाण्यात केलेला लेप टाळूवर करण्याने रक्‍त येणे थांबते.


आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी ताजे आवळे मिळणाऱ्या दिवसात रोज एका आवळ्याचा रस, त्यात खडीसाखर व जिऱ्याची पूड टाकून तयार केलेले मिश्रण घ्यावे. याने फार चांगला गुण येतो.

शरीराला बाहेरून लावण्यासाठी आवळ्याचे उपयोग

आवळकाठी पाण्यात वाटून अंगाला उटण्याप्रमाणे लावून ठेवली व काही वेळाने स्नान केले तर कांती उत्तम राहते, त्वचा सुरकुतत नाही. 
- आवळकाठी व पांढरे तीळ रात्रभर पाण्यात भिजत घालावे. सकाळी बारीक करून तयार झालेला कल्क डोळे बंद करून पापण्यांवर लावल्यास डोळ्यांची आग शमते, डोळे थंड राहतात.
- उष्णता वाढल्याने नाकातून रक्‍त पडते, त्यावर तुपात परतलेली आवळकाठी कांजीत वाटून टाळूवर लावल्यास फायदा होतो.
- अंगावर पित्त उठते, त्यावर आवळकाठी रात्रभर गोमूत्रात भिजत घालावी, सकाळी वाटून घ्यावी व नारळाच्या दुधात मिसळून अंगावर चोळावी. याने पित्ताच्या गांधी येणे बंद होते.
- नेत्ररोगांवर आवळ्याच्या झाडाच्या पानांचा रस बाहेरून लावण्याचा किंवा नेत्रबस्तीसाठी वापरण्याचा उपयोग होतो. 
- आवळकाठी रात्रभर भिजत घातलेल्या पाण्याने डोळे धुतल्यास नेत्ररोग बरा होण्यास प्रतिबंध होतो.
- केस गळणे, अकाली पिकणे या त्रासांवर आवळ्याच्या चूर्णाने केस धुण्याचा उपयोग होतो.
- कोरडी खरूज, कोरड्या त्वचारोगावर आवळकाठी भिजत घालून बारीक करून लावल्यास कोरडेपणा दूर होतो, त्वचा मऊ होते व खाज थांबते. 
- ताप वाढल्याने डोके फार तापले असता आवळकाठी दुधासह बारीक करून लेप करण्याने डोके शांत राहते.
- “वयःस्थापनानां श्रेष्ठम्‌’ म्हणजे तारुण्य टिकविण्यास मदत करणाऱ्या द्रव्यांमध्ये आवळा श्रेष्ठ समजला जातो. वाढत्या वयामुळे शरीराची झीज होणे स्वाभाविक असते. पण ही झीज कमीत कमी व्हावी, धातूंची संपन्नता टिकून राहावी यासाठी मदत करणारी द्रव्ये म्हणजे वयःस्थापन द्रव्ये. शतावरी, गोक्षुर, अश्‍वगंधा अशी अनेक द्रव्ये वयःस्थापन करणारी असतात, मात्र यात आवळा सर्वश्रेष्ठ सांगितला आहे.

याच कारणासाठी आवळा अनेक रसायनांमध्ये वापरला जातो. च्यवनप्राशमध्ये आवळा हे मुख्य द्रव्य असते. तसेच ब्राह्मरसायन, केवलामलक रसायन, आमलकी घृत, आमलकावलेह वगैरे अनेक रसायने आवळ्यापासून तयार केलेली असतात.

 

स्त्रोत :
- दैनिक सकाळ
- abstractindia.wordpress.com
- www.facebook.com/groups/Arogyamdhanasampada/permalink/602492989809789

अंतिम सुधारित : 4/26/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate