অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गवती चहा लागवड

गवती चहा लागवड

  • गवती चहाची लागवड वर्षभर करता येते.
  • लागवडीसाठी मध्यम काळी, पोयट्याची जमीन निवडावी.
  • लागवडीपूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे.
  • लागवडीसाठी ओडी-440, सीकेपी-25, आरआरएल-16 या जातींची निवड करावी.
  • लागवड 75 सें.मी. बाय. 75 सें.मी. अंतराने करावी. हेक्‍टरी 22 हजार ठोंब लागतात.
  • लागवडीनंतर पाच महिन्यांनी पहिली कापणी करावी.
  • त्यानंतरची कापणी दर तीन महिन्यांनी करावी.
  • पहिल्या दोन वर्षांत हेक्‍टरी 20 टन ओल्या गवताचे उत्पादन मिळते.
  • गवती चहाच्या तेलामध्ये सिट्रॉलचे प्रमाण 75 टक्के असते.
  • यामध्ये जीवनसत्त्व अ मोठ्या प्रमाणात असते.
  • तेल रंगाने पिवळसर असून, त्याला लिंबासारखा वास असतो.

 

संपर्क - 02426-243292 
औषधी व सुगंधी वनस्पती योजना, 
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate