योग्य अंतर ठेवलेल्या नारळाच्या व सुपारीच्या बागेत जायफळाची लागवड चांगल्या प्रकारे करता येते. लागवडीसाठी कोकण सुगंधा, कोकण स्वाद आणि कोकण श्रीमंती या जाती लागवडीसाठी चांगल्या आहेत.
7.5 x 7.5 मी. अंतर ठेवलेल्या नारळाच्या बागेत चार झाडांच्या मध्यभागी अथवा दोन नारळांच्या बरोबर मध्यभागी जायफळांची लागवड करण्यासाठी 90 x 90 x 90 सें. मी. आकाराचा खड्डा करावा. या खड्ड्यामध्ये एक घमेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, एक किलो निंबोळी पेंड आणि वरच्या थरातली चांगली माती मिसळून खड्डा पूर्ण भरून घ्यावा.
पावसाळ्याच्या सुरवातीला अथवा पावसाळ्यांच्या शेवटी पावसाळा संपता संपता जायफळाची लागवड करावी. लागवड करताना या भरलेल्या खड्ड्याच्या मधोमध जायफळाच्या हंडीइतकी माती काढावी. जायफळ कलमाची पिशवी धारदार चाकूने अगर ब्लेडच्या साह्याने कापून पिशवीमधून मुळांची हंडी अलगद बाहेर काढावी. खड्ड्यामध्ये ही हंडी लावून चारी बाजूंनी माती घट्टपणे सभोवार दाबावी.
माती दाबताना कोणत्याही परिस्थितीत मुळे दुखावली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. लागवड केल्यानंतर जायफळाला आधार द्यावा. त्यासाठी जायफळाच्या बाजूस सुमारे 30 सें. मी. अंतर सोडून रोपाच्या अथवा कलमाच्या उंचीइतक्या दोन काठ्या जमिनीत पुराव्यात. या दोन काठ्यांना एक काठी आडवी बांधून रोपे अथवा कलमे या काठीवर सैलसर बांधून ठेवावीत. नियमित पाणीपुरवठा करावा, आच्छादनाचा वापर करावा. जायफळाचे कलम लावले असल्यास सुरवातीच्या काळात कलमांना आकार देणे आवश्यक आहे.
संपर्क - 02358- 280238, 280233
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.
स्त्रोत : अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...