भारतातील उपयुक्त क्षेत्रे
उपकटिबंधीय आणि सौम्य हवामानाच्या क्षेत्रांमध्ये मधुपर्णीचे पीक बारमाही घेतले जाते मात्र अधिक उंचीवरील आणि मध्यम उंचीच्या प्रदेशांत ते हंगामी म्हणजे वर्षातून एकदाच घेता येते. सध्या हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, मध्यप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू ह्या राज्यांत देखील हे पीक घेण्याची सुरूवात झाली आहे.
माती व हवामान
मधुपर्णीच्या पिकाच्या प्रत्यक्ष वाढीच्या दिवसांत सर्वसाधारण तपमान 10 oC ते 37 oC तर तुलनात्मक आर्द्रता (रिलेटिव्ह ह्युमिडिटी) 65 - 85 %. असावी. मधुपर्णीस पाऊस चालतो पण दंवप्रवृत्त आहे. पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे होणार्या लाल मातीत तसेच 5.5- 7.7 पीएच असलेल्या गाळाच्या मातीत ही उत्कृष्ट वाढते.
प्रसार
बियांद्वारे तसेच खोडाचे कलम करून हिचा प्रसार करता येतो मात्र मुळांचे कलम दुसरीकडे लावणे (ट्रांसप्लांटेड रूट कटिंग्ज) ही पद्धत सर्वोत्कृष्ट होय. ह्यासाठी 4-5 आठवडे वयाची कलमे मार्च-एप्रिल आणि जून-जुलै महिन्यांत, 45 x 45 सें.मी. अंतराने, शेतात लावतात.
वाढविण्याची पद्धत
स्थानांतरणानंतर पहिल्यांदा अगदी नियमित व त्यानंतर साप्ताहिक स्वरूपात सिंचन करावे. जमीन तयार करतानाच सेंद्रीय खते म्हणजे शेतावरील खत (फार्मयार्ड मॅन्युअर), 25 ते 30 टन दर हेक्टर, वापरा. स्थानांतरणानंतर 75 ते 90 दिवसांनी पहिली कापणी करता येते. त्यानंतरच्या कापण्या 60 ते 75 दिवसांनी करता येतात. मधुपर्णीचे पीक 3 ते 4 वर्षे फायदेशीर रीतीने घेता येते.
उत्पादन
दोन हंगामांत मिळून सुमारे 30 टन प्रतिहेक्टर प्रतिवर्ष असे हिरवे जैविक खत (बायोमास) तर दर हेक्टर 13 ते 16 क्विंटल वाळलेली पाने मिळतात.
स्रोत:: www.ihbt.res.in