- सुपारी लागवडीसाठी श्रीवर्धनी ही जात निवडावी.
- या जातीची सुपारी मोठी असून, तिच्यामध्ये पांढऱ्या गराचे प्रमाण जास्त असून, ही सुपारी मऊ आहे. या सुपारीचा आकार आकर्षक असल्याने दरही चांगला मिळतो.
- योग्य वाढ झालेल्या झाडापासून सोललेल्या सुपारीचे दोन कि.ग्रॅ. उत्पादन मिळते. लागवड करताना जमिनीवरील झुडपे तोडून जमीन सपाट करावी. वाऱ्यापासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी सुरूची रोपे बागेभोवती लावावीत.
- लागवड करण्यासाठी 2.7 x 2.7 मीटर अंतरावर 60 सें.मी. x 60 सें.मी. x 60 सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत.
- त्यामध्ये पालापाचोळा, दोन पाटी चांगले कुजलेले शेणखत, 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, चांगल्या मातीमध्ये मिसळून खड्डा भरून घ्यावा.
- लागवडीसाठी रोपांची निवड करताना जाड बुंध्याची, कमी उंचीची, जास्त पाने असलेली जोमदार, 12 ते 18 महिने वयाची रोपे निवडावीत.
- रोपांना कमीत कमी चार ते पाच पाने असावीत.
- उंच व लांब पानांची रोपे लागवडीसाठी निवडू नयेत. लागवड जून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करावी.
- रोपांची चांगली वाढ होईपर्यंत रोपांचे पावसापासून संरक्षण करावे.
संपर्क : 02147-223374
सुपारी संशोधन केंद्र, श्रीवर्धन, जि. रायगड
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.