सध्या लॉकडाउनच्या काळामध्ये भाजीपाला, फळे, दुध, अन्नधान्ये व किराणा या बाबींची जनतेस नितांत गरज आहे. पैकी किराणा आणि अन्नधान्याचे चांगल्याप्रकारे नियोजन होत असून ग्राहकांना गरजेपुरती उपलब्धता आहे. परंतु नाशवंत शेती उत्पादनांच्या बाबतीत मागणी व पुरवठा समिकरण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनास कठोर निर्बंध लागु करावे लागत आहेत. याचे विपरीत परिणाम ग्राहक आणि शेतकरी यांना भोगावे लागत आहेत. या समस्यांवर निराकरणासाठी खालील बाबींचा नियोजनात अंतर्भाव करण्यात यावा.
1. शेत मालाची काढणी व विक्रि नियोजन:
सद्यस्थितीमध्ये शेतमालाच्या काढणी आणि विपणनाचे नियोजन हे गाव पातळीवर करणे आवश्यक आहे. सदर शेतमालाचे कमी वजनाचे पॅकिंग करुन आवश्यकतेनुसार वाहतूक करणे सोयीस्कर होईल.
2. शेतकरी उत्पादक संघ / गटामार्फत विक्री
केंद्राच्या धर्तीवर राय शासनाचेही शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक संघ / गटामार्फत शेतमालाची विक्री ई-नाम व्दारे करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. तसेच ग्राहकसेवेसाठी व्हाटसअॅप इ. साधनांचा वापर करावा यासाठी शहर आणि गाव पातळीवर तरुण स्वयंसेवक, बिगर शासकिय संस्था, सामाजिक संस्था यांचा समावेश करण्यात यावा. सामाजिक साधनांच्या संदर्भात प्रसार आणि जागृतीसाठी आकाशवाणी, एफ.एम., दुरचित्रवाणी यांचा प्रभावीपणे उपयोग होईल.
या उत्पादनासाठी [उदा. पीठ, दाळी, तेल इ.] शेतमालावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे त्यासाठी कमीत कमी मनुष्यबळ वापरुन जिल्हा पातळीवर नियोजन केल्यास उत्पादन आणि वाटप करणे शक्य होईल. शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक संघ / गटांच्या सबळीकरणाची आवश्यकता आहे.
3. शेतमाल वाहतूकिचे नियोजन :
शेतमाल बाजार समित्यांमधील अतिरिक्त गर्दी आणि आपत्ती कायद्याचे उल्लंघन टाळण्यासाठी अशा ठिकाणी पोहचणा-या वाहनांस पुर्व आरक्षण आणि ई-पासेस प्रणालीव्दारे नियोजीत केले जावू शकते. यामुळे बाजार समितीमध्ये येणा-या वाहनांच्या संख्येवर नियंत्रण राखता येवू शकेल. त्याचप्रमाणे बाजार समिती त्यांच्या कार्यक्षेत्रात विविध भागांसाठी प्रवेशाची वेळ निश्चित केल्यानेही मोठया प्रमाणात गर्दी नियंत्रणात येवू शकते. सदर नियोजन प्रत्येक बाजार समितीमार्फत करण्यात यावे.
4. निवीष्ठांच्या उपलब्धतेचे नियोजन :
आगामी खरीप हंगामाच्या पुर्वतयारीसाठी उपरोक्त उल्लेख केल्याप्रमाणे वाहतूक पर्व आरक्षण आणि ई पासेस प्रणालीव्दारे नियोजीत केली जावू शकते, यामुळे पुरेशी उपलब्धता आणि काळा बाजार रोखणे शक्य होईल.
5. पीक कर्जाची उपलव्धता :
आगमी खरीप हंगामात शेतक-यांना शेती पुर्ण क्षमतेने करण्यासाठी कर्जाची खुप मोठया प्रमाणात आवश्यकता असणार आहे. याव्यतिरिक्त सध्या त्यांच्यावर असलेल्या कर्जाबाबतीत योग्य व्यवस्थापन करणेही महत्वाचे आहे.
जिल्हा पातळीवर सर्व गोदामे शासन अखत्यारित आणल्यास सदर मालाची योग्य साठवणूक करता येईल. त्याचप्रमाणे शेतक-यांना या गोदामात ठेवलेल्या मालाच्या पावती आधारे कर्ज उपलब्ध करवून दिले जावू शकते, याबाबत शेतक-यांमध्ये जागृकता वाढविण्याची नितांत आवश्यकता आहे.
1. द्राक्ष :
2. आंबा :
3. चिक्कु :
4. केळी :
5. कागदी लिंंबू :
6. मोसंबी :
21. फळे व भाजीपाल्यांपासून व्यापारी द़ृष्टया बनविण्यात येणारे प्रक्रियायुक्त पदार्थ खालील प्रमाणे
अ. क्र. |
फळांचे नांव |
व्यापारीदृष्ट्याा महत्वाचे पदार्थ |
1) |
आंबा |
कच्च्या आंब्यापासुन निरनिराळ्याा प्रकारचे लोणचे, आंब्याच्या फोडी खारवुन टिकवणे, चटणी, आंबोशी, आमकुट, पन्हे, स्क्वॅश, सरबत आणि पिकलेल्या आंब्यापासुन आंबा पोळी (पापड) बर्फी, जॅम, नेक्टर, आंबा पाक, टॉफी, हवाबंदडण्यातील आमरस, हबाबंद डब्यातील फोडी, गोठवलेल्या आंबा फोडी. |
2) |
केळी |
सुकेळी, भुकटी, वेफर्स, केळीचा पल्प, गोड वेफर्स इ. |
3) |
लिंबु |
लोणची, स्क्वॅश, सरबत, लिंबुपाक, कॉर्डियल |
4) |
अंजीर |
सुके अंजीर, जॅम, अंजीर फळांचे हवाबंद डबे (कॅनिंग), अंजीर फळे पाकवीणे (कॅन्डी) |
5) |
आवळा |
चवनप्राश, मोरावळा, लोणची, आवळा सुपारी, कॅन्डी, सरबत, पल्प, आवळा चहा. |
6) |
चिंच |
कार्बोनेटेड पेय, जेली, चिंचोका काढुण वाळवलेला गर, चिंचेचा पल्प. |
7) |
डाळिंब |
जेली, रस, सरबत, नेक्टर, डाळिंब पाक, आनारदाना, चुर्ण, फ्रोजनदाणे, डाळींबाच्या सालीची वाळवलेली भुकटी. |
8) |
पेरु |
सरबत, पेरुगर, जेली, चॉकलेट (टॉफी) पेरु वडी |
9) |
चिकू |
कच्च्या चिकुपासुन लोणचे, मध्यम पिकविलेल्या चिकुपासुन मुरांबा आणि कॅन्डी, पिकलेल्या चिकु फळांपासुन सरबत, स्क्वॅश, जॅम, चटणी वाळविलेल्या फोडी, चिकु भुकटी, मिल्क शेक. |
10) |
जांभुळ |
रस, सरबत, स्क्वॅश, जॅम, बियांची भुकटी |
11) |
पपई |
कच्च्या पपईपासून टुटीफुटी, पिकलेल्या पपईपासून जॅम, सरबत पेपेन. |
12) |
बोर |
बोर खजुर, सुकविलेली फळे, बोरकुट, लोणचे, मुरब्बा, सरबत जॅम सिरप. |
13) |
संत्रा |
सरबत, मार्मालेड, जेली, जॅम, सिरप, संत्रा फोडी डबाबंद करणे, संत्राच्या सालीपासुन वाळवलेली भुकटी |
14) |
द्राक्ष |
किसमीस, मनुका, रस, सरबत, सिरप |
15) |
स्ट्रॉबेरी |
जॅम डोली सरबत सिरप |
16) |
मोसंबी |
रस, सरबत, सिरप |
17) |
सिताफळ |
पल्प काढुन कमी तापमानाला साठवणे, आईस्क्रीम, मिल्कशेक |
18) |
टोमॅटो |
केचप, सॉस, पेय, चटणी, पल्प भुकटी, पेस्ट |
19) |
मिरर्च (लाल) |
वाळवलेली मिरची, लालमिरची पावडर, सॉस, लोणचे, चटणी |
20) |
मिरर्च (होरवी) |
पावडर, लोणचे सॉस चटणी |
21) |
कोथंबीर |
वाळलेली कोथंबीर, भुकटी |
22) |
पालक |
वाळवलेली पालक, भुकटी |
23) |
मेथी |
वाळवलेली मेथी |
24) |
बटाटा |
वेगवेगळे वेफर्स, पावडर, वाळवलेले बटाटा फोडी |
25) |
वांगे |
वाळलेल्या बारीक फोडी |
26) |
कांदा |
पेस्ट, पावडर, वाळलेल्या चकत्या |
27) |
आले |
पेस्ट, सुंठ, पावडर, लोणचे |
28) |
कोबीवफ्लॉवर |
वाळवलेले तुकडे / चकत्या |
29) |
कढीपत्ता |
वाळलेला कढीपत्ता, पावडर |
30) |
गाजर |
हलवा, वाळलेले बारीक तुकडे |
31) |
वटाणा |
गोठवलेला वटाणा, वाळलेला वटाणा |
32) |
कारली |
लोणचे, भुकटी, रस |
33) |
भोपळा |
पावडर, रस, हलवा |
स्त्रोत: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी
अंतिम सुधारित : 6/5/2020