অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आपत्कालीन पीक सल्ला

आपत्कालीन पीक सल्ला

केळी

सिगाटोका करपा

  • या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.
  • फवारणी - प्रोपिकोनॅझोल 5 मि.लि. + चिकट द्रव्य 10 मि.लि. प्रति 10 लिटर.
  • मावा कीड नियंत्रणासाठी - डायमेथोएट 20 मि. लि. किंवा ऍसिफेट 14 ग्रॅम प्रति 10 लिटर.
  • फुलकिडीच्या नियंत्रणासाठी - ऍसिटामीप्रीट (20 एसपी) 1.25 ग्रॅम किवा फिप्रोनील (5 एससी) 15 मि.लि. किंवा व्हर्टिसिलियम लेकॅनी या जैविक कीडनाशकाची 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून घडावर फवारणी करावी.

टोमॅटो

  • झाडावरील तसेच जमिनीवरील रोगग्रस्त घटक जाळून नष्ट करावेत.
  • लवकर येणारा करपा व फळसड नियंत्रणासाठी - मॅन्कोझेब 25 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 10 मि.लि. प्रति दहा लिटर.
  • फळसड आणि उशिरा येणाऱ्या करपा रोग नियंत्रणासाठी - कॉपर ऑक्‍झिक्‍लोराइड 25 ग्रॅम प्रति दहा लिटर.
  • मर रोग - जमिनीत पाणी साठून राहिल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यासाठी वाफसा येताच मॅन्कोझेब 20 ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची बुडाजवळ ड्रेचिंग करावी.

बटाटा

  • लवकर येणारा करपा - मॅन्कोझेब 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी.
  • उशिरा येणारा करपा - मेटॅलॅक्‍झिल अधिक मॅंकोझेब हे संयुक्त बुरशीनाशक 30 ग्रॅम किंवा डायमिथोमॉर्फ 30 ग्रॅम प्रति 10 लिटर प्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी गरजेनुसार सल्ल्याप्रमाणे करावी.
  • मावा, तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी - इमिडाक्‍लोप्रीड 4 मि.लि. किंवा डायमेथोएट 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाणी. अथवा व्हर्टिसिलियम लेकॅनी जैविक बुरशीनाशक 40 ग्रॅम प्रति 10 लिटर.

 

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate