অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कपाशिवरील शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचे व्यवस्थापन

महाराष्ट्राध्ये साधारणतः ४० लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड करण्यात येते. राज्यातील प्रामुख्याने विदर्भ व मराठवाडा विभागात कापूस हे महत्वाचे नगदी पीक आहे. कपाशीवर बोंडअळया, तुडतुडे, मावा इ. किडींचा प्रादुर्भाव आढळून येत असतो. बोंडअळयांच्या व्यवस्थापनासाठी सन २००२ मध्ये बी. टी. जनुक असलेल्या वाणांचा वापर भारतामध्ये सुरू झाला.

सुरुवातीच्या काळात या वाणांवर अलिकडील काही वर्षांमध्ये बी. टी. जनुक असलेल्या वाणांवर या हिरव्या बोंडअळीमध्ये प्रतिकारशक्ती तयार झालेली दिसून येत आहे. तसेच सध्या शेदरी (गुलाबी) बोंडअळींचा देखील बी. टी. जनुक असलेल्या वाणांवर कारणे, ओळख, नुकसानीचा प्रकार व एकात्मिक व्यवस्थापनाच्या बाबी समजावून घेणे आवश्यक ठरते. वेळीच योग्य व्यवस्थापनाची खबरदारी घेतल्यास आपण शेंदरी बोंडअळीपासून होणा-या नुकसानीपासून आपले बहुमूल्य पीक वाचवू शकतो.

प्रादुर्भावाची कारणे

 • देशी जातींच्या तुलनेने अमेरिकन जातींवर जास्त प्रादुर्भाव
 • दिर्घकाळ वाढ्णा-या संकरित वाणाची लागवड केल्याने शेदरी बोंड अळीच्या वाढीसाठी सतत पोषक वातावरण निर्माण होते. कपाशीबरोबरच भेंडी,अंबाडी , जास्वंद , ताग , इत्यादी पर्यायी खाद्याची उपलब्धता असणे.
 • कपाशीच्या विविध संकरित वाणांचा फुले येण्याचा व बोंडे लागण्याचा काळ वेगवेगळा असल्याने त्यांची लागवड केल्याने कोडीच्या वाढीसाठी सतत खाद्य पुरवठा होऊन जीवनक्रमाच्या संख्येत वाढ होणे.
 • हंगामपूर्व तसेच हंगामी कापूस लागवड केल्याने कोडींचा जीवनक्रम वर्षभर चालू राहणे.
 • बी. टी. जनुक विरहीत कपाशीच्या आश्रीत ओळी न लावल्यामुळे बी. टी. प्रथिनाविरुद्ध प्रतिकारक्षमता तयार होणे.
 • जादा उत्पादनासाठी कपाशीच्या हंगामाचा कालावधी वाढविल्याने केिडीस खाद्याची उपलब्धता होणे.

जीवनक्रम व ओळख

 • अंडी आकाराने चपटी व १ मि.मी. लांबट असून रंगाने मोत्यासारखी चकचकीत पांढरी असतात व ती फुले, बोंड, देठ व कोवळ्या पानांच्या खालील बाजूस दिसून येतात.
 • अंडी अवस्था सुमारे ३ ते ५ दिवस राहते व या पक्र झालेल्या अड्यांतून सफेद रंगाची १ मि.मी. लांब व डोके तपकिरी असलेली अळी बाहेर पड़ते.
 • पूर्ण वाढ झालेली अळी सुमारे ११ ते १३ मि.मी. लांबट असून प्रत्येक वलयावर गुलाबी पट्टा असतो व तो नंतर शरिरावर पसरतो त्याने अळीचे शरीरगुलाबी दिसते,
 • अळी अवस्था सुमारे ८ ते २१ दिवसांच्या दरम्यान असते.
 • कोषावस्थेमध्ये अळी लालसर तपकिरी रंगाची दिसते व सुमारे ८ ते १० मि.मी. लांब असते तसेच कोषावस्था सुमारे ६ ते २० दिवस राहते व त्यातून पतंग बाहेर येतात.
 • पतंगाची लांबी सुमारे ८ ते ९ मि.मी. असते व ते करड्या रंगाचे दिसतात. पतंगाच्या पुढील पंखावर काळसर पट्टे दिसतात व पाठीमागील पंख
 • पतंगावस्था सुमारे ५ ते ३१ दिवस राहते.

नुकसानीचा प्रकार

 • अंड्यातून निघालेली अळी बोंडात शिरल्यानंतर तिच्या विष्ठेने व बोंडाच्या बारिक कणाच्या सहाय्याने छिद्र बंद करते. ज्यामुळे बोंडाचे वरुन निरीक्षण केल्यानंतर सुध्दा अळीचा प्रादुर्भाव ओळखता येत नाही.
 • या अळीचा प्रादुर्भाव बोंडामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो.
 • किडलेल्या पात्या गळून पडतात किंवा अशी बोंडे परिपक न होताच फुटतात.
 • शेंदरी (गुलाबी) बोंडअळी सरकीचेही नुकसान करते. सरकी किडलेली असल्यामुळे बियाण्याची उगवणशक्ती कमी होते तसेच धाग्याची लांबी व मजबूतीही कमी होते.

आर्थिक नुकसान पातळी

फेरोमोन सापळ्यामध्ये सरासरी आठ ते दहा नर पतंग सतत २ ते ३ दिवस आढळून येणे अथवा १० टक्के प्रादुर्भावग्रस्त फुले व बोंड आढळून येणे.

यजमान पिके

कापूस, अंबाडी, भेंडी, जास्वंद, तागा

व्यवस्थापन

 1. स्वच्छता मोहीम आणि मार्च-एप्रिल महिन्यात जमिनीची खोल नांगरणी करावी.
 2. कपाशीच्या सभोवती नॉन बीटी रेफ्युजी आश्रीत कपाशीची लागवड करावी. तसेच मका, चवळी, झेंडू व एरंडी या मिश्र सापळापिकांची एक
 3. कपाशीमध्ये अळ्या खाणा-या पक्षांना आकर्षित करण्यासाठी भगर हे मिश्रपिक घ्यावे आणि त्यासाठी हेक्टरी २५o ग्रॅम बियाणे वापरावे.
 4. कपाशीच्या कुळातील (भंडी, अंबाडी) ज्या पीकावर शेंदरी बोंडअळी उपजिवीका करते अशी पिके कपाशीपूर्वी किंवा नंतर घेऊ नयेत.
 5. मृद परिक्षणाच्या आधारावर खतांच्या मात्रेचा अवलंब करावा. शेंदरी बोंडअळींचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जास्तीच्या नत्र खताचा वापर टाळावा.
 6. कपाशीवरील किडींच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे संवर्धन होण्यासाठी मका, चवळी, उडीद, मूग यासारखी आंतरपिके/मिश्रपिके कपाशी पिकाभोवती घ्यावीत.
 7. कपाशीच्या शेतात पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी किमान दहा पक्षीथांबे उभे करावेत. म्हणजे पक्षी त्यावर बसून शेतातील अळया टिपून खातील.
 8. बोंडअळीग्रस्त डोमकळया तोडून आतील अळीसहीत नष्ट कराव्यात.
 9. शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येताच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी अथवा अंझाडिरेक्टीन 10000 पीपीएम १ मि.लि. प्रति लिटर किंवा १५00 पीपीएम २.५ मि.लि. प्रति लिटर फवारणी करावी,
 10. प्रत्येकी हेक्टरी ४ ते ५ फेरोमोन सापळे लावावेत. दोन फेरोमोन सापळ्यामधील अंतर ५0 मीटर ठेवावे. सापळ्यात अडकलेले पतंग वेळच्यावेळी नष्ट करावेत.
 11. ਫ਼ੇਦੇਹ ਕੁੱiਸ ਟfਝਸ 3ਜੇਜੀ ਕਿੰਗ ਟੀਚਿਲਿਸ लकॅनी १.५ टक्के विद्राव्य घटक असलेली भुकटी (२.५ किलो प्रती हेक्टर) ४० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून वातावरणात आर्द्रता असताना फवारावी.
 12. पीक उगवल्यानंतर ११५ दिवसांनी ट्रायकोग्रॅमाटाँडीया बॅक्ट्री अथवा ट्रायकग्रामा विलीनीस या परोपजीवी किटकाची १.५ लक्ष अंडी प्रती  हेक्टर या प्रमाणात प्रसारण करावीत.
 13. किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यानंतर पुढील किटकनाशकांची फवारणी करावी.
कीटकनाशक प्रमाण/ ली. पाणी
क्वीनालफॉस २५ ईसी २ मी.ली.
प्रोफेनोफॉस ५० इसी २ मी.ली.
थायोडीकार्ब ७५ डब्लूपी
२ मी.ली.
लॅमडा साहॅलोथ्रीन ५ इसी
२ मी.ली.

कीटकनाशक प्रमाण / लि. पाणी क्रिनालफॉस २५ ईसी २ मि.ली. प्रोफेनोफॉस ५o ईसी २ मि.ली. थायोडीकार्ब ७५ डब्लुपी २ मि.ली. लॅमडा साहॅलोश्रीन ५ ईसी २ मि.ली.

अशाप्रकारे कपाशीवरील शेंदरी (गुलाबी) बोंडअळीचे व्यवस्थापन करून शेतक-यांसाठी आपले बहुमुल्य पीक वाचवावे.

 

संपर्क क्र. ९४२३८६७१७२

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate