मध्यम, ओलावा टिकवून ठेवणारी; परंतु पाण्याचा निचरा होणारी जमीन अंजीर फळपिकासाठी लागते. पक्व झालेल्या फांद्यांच्या छाट कलमापासून किंवा गुटी कलमाद्वारे अभिवृद्धी करतात, त्यासाठी जून महिन्यामध्ये गुटी कलमे बांधावीत. सदरची कलमे दीड ते दोन महिन्यांनी मुळ्या फुटल्यानंतर काढणीस तयार होतात.
अशी कलमे झाडापासून वेगळी करून प्लॅस्टिक पिशवीमध्ये लावावीत. लागवडीपूर्वी जमिनीची उभी-आडवी चांगली नांगरट करून घ्यावी, त्यानंतर कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन तणे, मागील पिकाचे अवशेष वेचून जाळून टाकावेत. हलक्या जमिनीत 4.5 ु 3 मी. या अंतरावर लागवड करावी.
लागवडीसाठी मे महिन्यामध्ये 60 ु 60 ु 60 सें.मी. आकाराचे खड्डे खोदणे आवश्यक असते. म्हणजे खड्डे उन्हात चांगले तापतात. खड्डे भरण्यासाठी खड्ड्यांच्या तळाला पालापाचोळा, चांगली माती व शेणखत अथवा कंपोस्ट खत दोन्ही 1ः1 प्रमाणात घेऊन त्यामध्ये पाच ग्रॅम फोरेट आणि एक ते दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकून मिश्रण करून खड्डा भरून घ्यावा. जून-जुलै महिन्यांमध्ये दोन-तीन पाऊस झाल्यानंतर खड्ड्यामध्ये पिशवीमधील रोपांची लागवड करावी.
1) पूना अंजीर - या जातीच्या अंजिराच्या फळाचा रंग गडद किरमिजी, लाल रंगाचा असतो. फळाचे सरासरी वजन 30 ते 60 ग्रॅमपर्यंत असते. फळांमध्ये 18 ते 20 ब्रिक्सपर्यंत साखर असते. पाच वर्षांच्या झाडापासून सरासरी 25 ते 30 किलो फळाचे उत्पादन मिळते.
2) दिनकर - ही जात पूना अंजीर या जातीमधून निवड पद्धतीने निवडलेली असून, या जातीची फळे किरमिजी, लाल रंगाची असतात. फळाचे सरासरी वजन 40 ते 70 ग्रॅमपर्यंत असते. - 020-25693750
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मध्यम, ओलावा टिकवून ठेवणारी; परंतु पाण्याचा निचरा ...
अंजीर फळांचा टिकाऊपणा जास्त वाढविण्याकडे विशेष लक्...
या विभागात अंजीर या फळ पिकाविषयी माहिती दिली आहे.
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...