Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा

Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा
india_flag

भारत सरकार

MeitY LogoVikaspedia
mr
mr

सामग्री लोड करत आहे...

    सामग्री सारणी

  • रेटिंग्स (3.1)

करवंदाची जात

उघडा

योगदानकर्ते  : अॅग्रोवन07/10/2020

विकास AI सह तुमचे वाचन सक्षम करा 

लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा.

करवंद

करवंद हे एक अत्यंत काटक व दुर्लक्षित झुडूपवर्गीय पीक असून, मुख्यतः कुंपणासाठी मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड केली जाते. झाडाच्या फांद्यांना काटे असल्यामुळे गुरे खात नाहीत.

करवंदांच्या ताज्या पिकलेल्या फळांचा उपयोग खाण्यासाठी केला जातो, तसेच फळांपासून चटणी, मुरंबा, जेली, करवंद सिरप, विविध प्रकारची लोणची तयार करता येतात. करवंदामध्ये "क' जीवनसत्त्व विपुल असते, तसेच मोठ्या प्रमाणावर त्यात लोह असते. करवंदाचे झाड कोणत्याही निचऱ्याच्या जमिनीत चांगल्या प्रकारे वाढते. ते हलक्‍या, मुरमाड, तसेच कातळ असलेल्या जमिनीतही चांगले येते.

बियांपासून रोपे तयार करून अभिवृद्धी करता येत असली तरी इच्छित प्रकारच्या जाती, प्रकाराची अभिवृद्धीसाठी गुटी किंवा जून फांद्यांच्या छाट कलमांद्वारे करणे चांगले असते. करवंदाच्या जाती फळाच्या आणि गराच्या रंगावरून ठरविल्या जातात. विद्यापीठाने "कोकण बोल्ड' नावाची नवीन जात प्रसारित केली आहे. या जातीची फळे मोठी (12-16 ग्रॅम) व घोसाने लागतात, तसेच फळाची प्रत उत्कृष्ट आहे. फळे गोलाकार असून, गराचे प्रमाण 92 टक्के आहे.

फळांचा टिकाऊपणा (चार दिवस) चांगला आहे. फळे गडद काळ्या रंगाची असून, त्यात 361 मि.लि. ग्रॅम "क' जीवनसत्त्व प्रति 100 ग्रॅम गरात आहे. फळातील बिया मृदू असून, चावून खाता येतात. कच्च्या व पक्व फळांपासून विविध प्रक्रिया केलेले टिकाऊ पदार्थ तयार करता येतात. कुंपणासाठी लागवड करताना दोन रोपांतील अंतर 90 ते 150 सें.मी. ठेवावे, सलग लागवड करताना तीन ते चार मीटर अंतरावर कलमे लावून लागवड करावी, लागवड केल्यावर कलमांना आधार द्यावा.

लागवडीसाठी एप्रिल-मे महिन्यात 45 ु 45 ु 45 सें.मी. आकाराचे खड्डे खणून माती, चांगले कुजलेले शेणखत (दोन किलो) आणि 200 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून पाऊस सुरू होण्याच्या अगोदर भरून ठेवावे. कलम लावल्यानंतर हिवाळ्यात 15 दिवसांच्या अंतराने व उन्हाळ्यात आठवड्याच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या लागवडीच्या पहिल्या वर्षी द्याव्यात, म्हणजे कलमांची वाढ जोमदारपणे होईल व कलमांचे जगण्याचे प्रमाण वाढेल. प्रति कलमास सुमारे 20 लिटर पाणी प्रत्येक पाळीस द्यावे. दुसऱ्या वर्षापासून कलमास पाणी देण्याची आवश्‍यकता नाही. 

कलमाच्या चांगल्या वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी चौथ्या वर्षापासून प्रत्येक कलमास ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात 25 किलो शेणखत, 100 ग्रॅम युरिया आणि 50 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश खत घालावे. फुले व फळधारणा लवकर होण्यासाठी खताच्या रिंगामध्ये 10 ते 15 लिटर गोमूत्र जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात दोन ते तीन वेळा ओतावे. कलमांच्या सभोवती तणांची वाढ होऊ नये म्हणून 15 सें.मी. जाडीचे पालापाचोळ्याचे आच्छादन द्यावे. पाचव्या वर्षापासून दरवर्षी फळे काढणीनंतर मे-जून महिन्यात फांद्यांची छाटणी करावी. 

संपर्क - 02358- 280238 
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, 
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

संबंधित लेख
शेती
सुपारी लागवडीसाठी जात निवड

सुपारीची जात व लागवडीविषयीची माहिती येथे दिलेली आहे. - विजय काटे, माणगाव, जि.रायगड

शेती
सर्वाधिक उत्पादन देणारी भात जात विकसित

भात जातीच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करण्यासाठी संशोधक प्रयत्न करत आहेत. निवड पद्धती आणि संकरित पैदास पद्धतीचा वापर करून नव्या जाती विकसित केल्या जातात.

शेती
बिनबियांच्या लिंबाची जात

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची बिनबियांच्या लिंबाची "कोकण लेमन' ही जात अतिशय चांगली आहे.

शेती
कमी पाणी भात जाती

नेपाळमधील पीक उत्पादनवाढीसाठी नेपाळ कृषी संशोधन परिषद ही संस्था काम करते. या संशोधन केंद्राने आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्राच्या सहकार्याने पाण्याचा ताण सहन करणाऱ्या भाताच्या तीन जाती विकसित केल्या आहेत.

शेती
तांदुळाची कादिरमंगलम् जात

तांदुळाच्‍या कादिरमंगलम् जातीचा, तामिळनाडु राज्‍याच्‍या कावेरी खोरे क्षेत्रातील गावांतील श्री. एस. गोपाल यांच्‍याद्वारे विकसित प्रणालीचा कशा प्रकारे वापर करण्‍यात आला आहे याची माहिती यामध्ये दिली आहे.

शेती
जांभळाची जात

चांगला पाऊस झाल्यावर कोकण बहाडोली या जातीच्या कलमांची लागवड करावी.

राम भिमराव ताठे

12/19/2019, 11:37:16 AM

मला पण करवंदाची शेती करायची आहे ९२८४८६०२९५ ram*****************

राम भिमराव ताठे

12/18/2019, 10:24:50 AM

मला पण करवंदाची शेती करायची आहे

करवंदाची जात

योगदानकर्ते : अॅग्रोवन07/10/2020

विकास AI सह तुमचे वाचन सक्षम करा 

लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा.

संबंधित लेख
शेती
सुपारी लागवडीसाठी जात निवड

सुपारीची जात व लागवडीविषयीची माहिती येथे दिलेली आहे. - विजय काटे, माणगाव, जि.रायगड

शेती
सर्वाधिक उत्पादन देणारी भात जात विकसित

भात जातीच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करण्यासाठी संशोधक प्रयत्न करत आहेत. निवड पद्धती आणि संकरित पैदास पद्धतीचा वापर करून नव्या जाती विकसित केल्या जातात.

शेती
बिनबियांच्या लिंबाची जात

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची बिनबियांच्या लिंबाची "कोकण लेमन' ही जात अतिशय चांगली आहे.

शेती
कमी पाणी भात जाती

नेपाळमधील पीक उत्पादनवाढीसाठी नेपाळ कृषी संशोधन परिषद ही संस्था काम करते. या संशोधन केंद्राने आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्राच्या सहकार्याने पाण्याचा ताण सहन करणाऱ्या भाताच्या तीन जाती विकसित केल्या आहेत.

शेती
तांदुळाची कादिरमंगलम् जात

तांदुळाच्‍या कादिरमंगलम् जातीचा, तामिळनाडु राज्‍याच्‍या कावेरी खोरे क्षेत्रातील गावांतील श्री. एस. गोपाल यांच्‍याद्वारे विकसित प्रणालीचा कशा प्रकारे वापर करण्‍यात आला आहे याची माहिती यामध्ये दिली आहे.

शेती
जांभळाची जात

चांगला पाऊस झाल्यावर कोकण बहाडोली या जातीच्या कलमांची लागवड करावी.

कनेक्ट करू द्या
Facebook
Instagram
LinkedIn
Twitter
WhatsApp
YouTube
MeitY
C-DAC
Digital India

Phone Icon

+91-7382053730

Email Icon

vikaspedia[at]cdac[dot]in

Copyright © C-DAC
vikasAi