जमीन
चिंचवृक्ष अनेक प्रकारच्या जमिनीत उगवतो. काळ्या मातीत तो उगवतो. भुसभुशीत मातीत उगवतो. दगडधोंडे असलेल्या जमिनीत येतो. वाळूमिश्रित जमिनीत वाढतो. डोंगर उतारावरील जमिनीत नेटाने वाढतो. अगदी क्षारयुक्त जमिनीतही चिंचवृक्ष आकाशाकडे झेपावतो. जिथे लावलं तिथे चिंचवृक्ष वाढीला लागतो. कोरड्या जमिनीतला तो राजवृक्ष आहे
चिंचवृक्ष कमी पावसाच्या प्रदेशातही येतो. या झाडाला जास्त पाण्याची गरज नसते. जमिनीत साठलेले पाणी मुळे शोषून घेतात. पावसाचे पाणी त्याला पुरते. समुद्रसपाटीपासून ६०० मीटरपर्यांच्या उंच प्रदेशात चिंच वृक्ष येतो. जास्तीत जास्त ४५ डिग्री सेंटीग्रेट तापमान असलेल्या प्रदेशातही चिंच येतो. ७५० पासून १२५० मि. मी. पाऊस पडणाऱ्या प्रदेशातही तो येतो.
चिंचेच्या रोपांची निर्मिती मुख्यतः बियांपासून करतात. गुटी कलम करूनही रोपे तयार करता येतात. एक फुट लांबी-रुंदी-खोलीचा खड्डा घ्यावा. त्यात ५०% माती व ५०% सेंद्रीय खताचे मिश्रण भरून रोप लावावे. पावसाळा सुरु झाल्याबरोबर रोपे लावावीत. चिंचेचा वृक्ष मोठा होतो. म्हणून प्रत्येक झाडात १० ते १२ मीटर अंतर सोडून वृक्षारोपण करावे. चिंच संथ गतीने वाढणारा वृक्ष आहे. जे झाडं वेगाने झरझर वाढते ते अल्पकाळ टिकते. जे झाडं संथ गतीने वाढते ते दीर्घ काळ टिकते, हा निसर्गाचा नियम आहे. मंदगतीने वाढणारा चिंचवृक्ष दीर्घायुषी आहे. प्रत्येक वर्षी तो ०.५ ते ०.८ मीटर या वेगाने वाढतो. चिंचवृक्ष सरळ वाढतो. फांद्याही योग्य दिशेने वाढतात. म्हणून त्याच्या वाढीसाठी फांद्यांची छाटणी करावयाची गरज नाही. साधारणतः १०/१२ वर्षात चिंच फुलायला व फळायला लागतो. चिंचेचा बुंधा छोटा असतो परंतु वरचा विस्तार व आकार मात्र मोठा असतो. चिंच वृक्ष बारा महिने हिरवेगार असतो. कोरड्या हवामानात तो निम्न हिरवा दिसतो.
ज्या शेतजमिनीत कस कमी आहे, त्यात पिक चांगले येत नाही त्या जमिनीत चिंचेची वनशेती करायला हरकत नाही. त्यात पिक चांगले येत नाही. त्या जमिनीत चिंचेची वनशेती करायला हरकत नाही. एका हेक्टरात चिंचेची १५६ झाडे लागतात. मात्र उत्त्पन्नासाठी १२ ते १५ वर्षे थांबण्याची गरज आहे. तोपर्यंत चिंच लागवड केल्यावर शेतात इतर आंतरपिके घेता येतात. त्यामुळे १०/१२ वर्षांनी चिंचेपासून उत्त्पन्न मिळेपर्यंत आंतरपिकांपासून उत्त्पन्न मिळते. चिंच वृक्ष १२/१५ वर्षाचा झाल्यावर चांगला वाढतो, उत्पन्न मिळते. चिंच वृक्ष १२/१५ वर्षाचा झाल्यावर चांगला वाढतो, उत्त्पन्न द्यायला सुरुवात करतो. चिंचवृक्ष मोठा झाल्यावर त्याखाली कोणतेही पिक येत नाही. त्याच्या आम्लधर्मीय गुणधर्मामुळे चिंचेच्या झाडाखाली कोणताही वृक्ष वाढत नाही. साधे गवतही येत नाही. चिंच फुलायला लागली की उत्पन्न सुरु होते. अगदी १०० ते १५० वर्षापर्यंत दीर्घकाळ चिंचवृक्ष उत्त्पन्न देत राहतो. त्यासाठी राखणीशिवाय कोणतेही श्रम करावे लागत नाहीत. खतपाण्याचा कोणताही खर्च करावा लागता येत नाही. चिंचेची वृक्ष वाढायला लागले की त्याभोवतालचे तणही काढावे लागावे लागत नाही. तण माती धरून ठेवते. चिंचेच्या रोपांना त्याचा चांगला उपयोग होतो. पावसाळ्यात चिंचेच्या रोपाभोवती पाणी साचू देऊ नये. ते वाहून जाण्याची सोय करावी. प्रारंभी एवढी काळजी घेतली की चिंचवृक्ष वाढायला लागतो. तो दीर्घकाळ उत्पन देत राहतो. एका हेक्टरात (अडीच एकर) चिंचेची १५६ झाडे आपण लावली तर तर प्रत्येक झाडापासून कमीत कमी १५००/- रुपये उत्त्पन्न धरू या. १५६ झाडांपासून दरवर्षी ३ लाख १२ हजार रुपयांचे उत्त्पन्न मिळेल. कमी कसाच्या जमिनीतील पिकांपासून मिळणार नाही त्यापेक्षा अधिक उत्त्पन्न चिंचेची झाडे देतात. चिंच वृक्ष जसजसा वाढतो तसतशी उत्पन्नात अधिक भर पडते.
शिरूर तालुक्यात मोराची चिंचोली नावाचे गाव आहे. श्री. जयसिंग दामाजी नाणेकर हे वयोवृद्ध शेतकरी गावचे सरपंच आहेत. त्यांच्या पुर्वजांनी लावलेली जुनी चिंचाची ५० झाडे त्यांच्या शेतात आहेत. ही झाडे २०० ते २५० वर्षांची आहेत, असे त्यांचे मत आहे. या ५० झाडांपासून दर वर्षी चिंचा, लाकूड फाटा, चिंचोके यांपासून आपणास १ लाख रुपये उत्त्पन्न मिळते असे त्यांनी सांगितले. प्रत्येक चिंचेच्या झाडापासून खाली पडलेले सरपण अर्धा टन मिळते. १० वर्षात चिंचेच्या झाडाला चिंचा यायला लागतात. १० व्या वर्षी त्यापासून ५० किलो चिंचा यायला लागतात. १०व्या वर्षी त्यापासून ५० किलो चिंचा मिळायला लागतात. बाजारात चिंच २० रुपये किलो भावाने विकली जाते. चिंचोके ३ ते ४ रुपये किलो भावाने विकले जातात. एका चिंचवृक्षापासून १०व्या वर्षी १ हजार रुपयांचे उत्त्पन्न सहज मिळते, असा श्री. नाणेकर यांचा अनुभव आहे.
आपल्या भावी पिढयांच्या कल्याणासाठी आपल्या पूर्वजांनी चिंचेची झाडे लावली. टी झाडे आजही आपल्याला उत्त्पन्न देतात, सावली देतात. आपल्या उज्जवल भविष्यासाठी जगतात. बागा उद्याने, मंदिरे, पतंगाने, शेतीचे बांध, रस्त्याकाठी आपणास चिंचेची झडे दिसत. जंगलात व रानावनांतही नैसर्गिकरित्या चिंचवृक्ष उगवतात.
माहिती लेखन : वनराई संस्था
अंतिम सुधारित : 12/7/2019
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...