অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डाळिंबावरील रोगांचे नियंत्रण

डाळिंबावरील रोगांचे नियंत्रण

प्रस्तावना

डाळिंबाचर मृग बहार आणि आंबे बहार या दोन्ही हंगामांमध्ये बुरशीजन्य रोग आढळतात. डाळिंबाची फळे व पाने अशा दोन्ही ठिकाणी रोगांचा प्रादुर्भाव होतो. पावसाळ्यातील वातावरण बुरशीच्या वाढीसाठी पूरक असते. त्यामुळे पावसाळी हंगामात घेतल्या जाणा-या मृग बहारावर या बुरशीजन्य रोगांचा उपद्रव जास्त प्रमाणात आढळून येतो.

तेलकट इाग

तेलकट डाग ही डाळिंब उत्पादनातील प्रमुख समस्या आहे. सुरवातीला रेखीच ते अनियमित लहान आकाराचे २-५ मिमी. ते अनेक ठिपके एका पानावर आढळून येतात. त्यामुळे पूर्ण पान पिवळे पडून गळून पडते.

फळाच्या देठाकडील पृष्ठभागावर रोगाची लागण लवकर व जास्त प्रमाणात होऊन काळे ठिपके पडतात. तें कालांतराने वाढत जाऊन एकमेकांत मिसळतात. फळांचा लागण झालेला भाग दुभागतात, आतील दाणे बाहेर पडतात व फळे गळतात. पावसाळ्यात या डागांवर पाणी साचल्यामुळे थेंबामध्ये जिवाणू प्रवेश करतात व द्राव चिकट पांढुरक्या बनतो. हाच द्राव त्याच जागी वाळल्याने या डागाला पांढरी चकाकी येते.

जिवाणू व सर्कास्पोरा बुरशीच्या प्रादुर्भाव होणा-या ठिपके रोगांची लक्षणे साधारणतः सारखीच असतात व या दोघांमधील दोघांमधील फरक ओळखता येतो.

नियंत्रण

तेलकट डाग रोगाच्या जिवाणूंचा थोड्या फार प्रमाणात पाणी मिळाल्यास वेगाने प्रसार होतो. अपरिणामकारक ऑषधाच्या फवारणीच्या पाण्यानेसुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याचे ब-याच वेळेला दिसून आले आहे. त्यामुळे कमी तीव्रतेच्या औषधाच्या फवारण्या टाळाव्यात.

 • फळबागेतील तेलकट डागाचे अवशेष व झाडावरील रोगांचे जिवंत डाग प्रसारामध्ये प्रमुख भूमिका भाग पडतात; म्हणून बागेत उपाय करणे महत्त्चाचे आहे.
 • गाव पातळीवर सर्वांच्या बागेत स्वच्छता मोहीम राबविणे.
 • मागील हंगामातील फळांची संपूर्ण काढणी झाल्यानंतर ब्रोमोपॉल ५०० पीपीएम, २ बोमो २ नायट्रोपोपेन, १-३ डायोल फवाराचे.
 • संपूर्ण फळे काढणी झाल्यानंतर बागेला ३ ते ८ महिने विश्रांती द्याची.
 • बह्मर येण्यापूर्वी संपूर्ण पानगळ करून इथरेल १ ते २ मिलिं./ लिटर फवाराचे आणि रोगग्रस्त फांद्यांची छाटणी करावी .
 • झाडाच्या खोडला निम तेल अधिक प्रोमोपॉल ५oo पीपीएम अधिक कॅप्सोन ०.५ टक्केचा मुळाला द्यावा.
 • बागेतील व बांधावरील गोळा केलेले तेलकट डागग्रस्त व इतर रोगाचे अवशेष जाळून नष्ट करावेत.
 • पानगळ आणि छाटणीनंतर ब्रोमोपोल ५oo, पीपीएम अधिक कॅप्सोन o.५ टक्के फवारावे. e. नवीन पालवी फुटल्यानंतर ब्रोमोपाल २५0 पीपीएम/ बोर्डोमिश्रण 0.५ ते १ टक्के /कॅप्सोन ०.२५ टक्के ८ ते १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
 • पानावर आणि फळावर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल, तर फवारणी चालू ठेवावी. रोग नसल्यास ३० दिवसांच्या अंतराने फवारणी कराची.
 • सदर औषधाची फवारणी फळकाढणीच्या ३० दिवसांपूर्वी बंद करावी. पावसाळी हंगामात ही फवारणी फाळकाढणीच्या २o दिवसांपूर्वी बंद करावी.

मर

या रोगाची झाडास लागण झाल्यावर झाड शेंड्याकडून हळूहळू वाळून पानगळ होते व झाड एकदम वाळते. काही वेळा शेजारील दोन किंवा अधिक झाडे वाळतात. या रोगाची लागण होऊ नये म्हणून लागवडीसाठी चांगल्या निच-याची जमीन निवडावी, शेणखताचा वापर वाढवावा. त्याचबरोबर त्यात ट्रायकोडर्मा हीरीडी व पॅकसीलोमाइसिस या दोन जैविक बुरशींचा वापर करावा. लागवड़ जमिनीनुसार योग्य अंतरावर कराची.

फळे तडकणे

डाळिंबाच्या फळाची साल आणि आंतरसाल तडकते. काही बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे किंवा बोरोन या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळांना तडे जातात. परंतु, पाण्याचा अनियमितपणा हे डाळिंबाच्या फळांना तडे जाण्याचे प्रमुख कारण आहे. पाणी देण्यात जास्त अनियमितपणा झाला, तर ५० टक्के फळे होऊन फळे सडतात.

कधी कधी फळे अपक अवस्थेतच गळून पडतात. डाळिंबाच्या बागेला पाण्याचा ताण पडल्यास फळाची बाह्य साल आणि आतील गर आकुंचन पावतो. त्यानंतर एकदम पाणी दिले तर फळांच्या आतील गर फुगतो. मात्र, फळावरील सालीची प्रसारण शक्ती कमी असल्यामुळे आतील गराचा वाढता दाब सालीवर पडून सालीला तडे जातात. म्हणून पाण्याचा अनियमितपणा टाळला पाहिजे.

उपाययोजना

 1. फळांना तडे पडू नयेत म्हणून माफक, परंतु कमी पाणी द्यावे. जमिनीत जास्त प्रमाणात सेंद्रिय आणि हिरवळीची खते टाकून जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची शक्ती वाढवाची. म्हणजे बागेला पाण्याचा अकाली ताण पडत नाही आणि फळे तडकणार नाहीत.
 2. डाळिंबाचा मृग बहार धरल्यास पावसाच्या अनियमितपणामुळे आणि हवेतील कमीजास्त आद्रतेमुळे फळांना अधिक भेगा पडतात. मात्र, डाळिंबाचा आंबे बहार धरल्यास फळांना कमी प्रमाणात तडे जातात.
 3. बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून आल्यास बागेला
 4. बागेच्या पश्चिम आणि दक्षिण बाजूला वारा अडवणा-या झाडांची लागवड करावी. त्यामुळे त्या दिशांनी येणा-या वा-याच्या गरम झळा फळांना लागणार नाहीत आणि फळे तडकण्याचे प्रमाण कमी होईल.


स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate