पिक्टा प्रकारातील फुले आकाराने मोठी; परंतु सिंगल असतात. उदा. इंडियन चीफ रेड, पिक्टा मिक्स्ड. लॉरेंझियाना प्रकारातील फुले मोठी व डबल असतात. उदा. सनशाईन, गेईटी डबल मिक्स्ड, डबल टेट्रा, फिएस्टा इत्यादी. गॅलार्डिया ग्रॅंडिफ्लोरा या प्रकारातील जाती बहुवर्षीय असून, त्यांना मोठ्या आकाराची पिवळसर केशरी आणि लाल रंगाची फुले येतात. या प्रकारामध्ये प्रामुख्याने सन गॉड डॅझलर, वारिअर, गोब्लिन मिस्टर शेरब्रुक या महत्त्वाच्या जाती आहेत.
गॅलार्डियाची लागवड बियांपासून रोपे तयार करून केली जाते. गादीवाफ्यावर रोपे तयार करावीत. गॅलार्डियाच्या रोपांची लागवड ऑक्टोबर, एप्रिल आणि ऑगस्ट महिन्यात केल्यास वर्षभर फुले उपलब्ध होऊ शकतात. रोपांची लागवड सपाट वाफे अथवा सरी वाफे तयार करून करतात. याकरिता जमीन आडवी- उभी नांगरून घ्यावी. जमिनीत प्रति हेक्टरी 25 ते 30 टन या प्रमाणात चांगले कुजलेले शेणखत मिसळून घ्यावे. नंतर सपाट वाफे तयार करून जमीन व हंगामापरत्वे गॅलार्डियाची लागवड 45 X 60 सें.मी. किंवा 45 X 30 सें.मी. अंतरावर करावी.
लागवडीनंतर ऍझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणाऱ्या जिवाणूसंवर्धकाची मात्रा पिकाला द्यावी. यासाठी लागवडीनंतर आठ ते दहा दिवसांनी दहा किलो ऍझोटोबॅक्टर किंवा अझोस्पिरिलम 50 किलो ओलसर शेणखतात मिसळावे. या मिश्रणाचा ढीग करून तो ढीग प्लॅस्टिकच्या कागदाने आठवडाभर झाकून ठेवावा. अशाच प्रकारे 50 किलो ओलसर शेणखतात पाच किलो स्फुरद विरघळणारे जिवाणूसंवर्धक आणि 50 किलो ओलसर शेणखतात पाच किलो ट्रायकोडर्मा मिसळून ढीग करून आठवडाभर प्लॅस्टिकच्या कागदाने झाकून ठेवावेत. एका आठवड्यानंतर हे तिन्ही ढीग एकत्र मिसळून एक हेक्टर गॅलार्डियाच्या पिकास द्यावे. पिकाला माती परीक्षणानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी.
रोपांची लागवड केल्यानंतर साधारणपणे एक आठवडाभरात रोपे जोम धरू लागतात. लागवडीनंतर पाच ते सहा आठवड्यांनी खुरपणी करावी. हंगामानुसार झाडांच्या योग्य वाढीसाठी सहा ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. फुलांचे एकसारखे व भरपूर उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने पहिली खुरपणी झाल्यानंतर प्रति हेक्टरी 25 कि.ग्रॅ. युरिया वरखत म्हणून द्यावे. हंगामानुसार लागवडीनंतर दोन ते अडीच महिन्यांनी फुले येण्यास सुरवात होते. फुलोरा आल्यानंतर सुमारे 20 ते 25 दिवसांत फुले काढणीयोग्य होतात. अशा प्रकारे पुढे अडीच महिन्यांपर्यंत फुलांचे उत्पादन सुरू असते.
संपर्क - 020 - 25693750
राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ऍस्टर हे वर्षभर भरपूर विविधरंगी फुले देणारे आणि कम...
ह्या वृक्षांना संयुक्त द्विदली पाने असून, दले लंबग...
गॅलार्डियाचे पीक वर्षभर घेता येते. हे झाड काटक असल...
भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यांवर, ...