जवसलागवडीसाठी मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणारी जमीन निवडावी. जमिनीची योग्य मशागत करावी. लागवड ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. लागवड 45 सें.मी. x 10 सें.मी. किंवा 30 सें.मी. x 15 सें.मी. अंतराने करावी. लागवडीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे लागते. जिरायती पिकासाठी हेक्टरी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद पेरणीच्या वेळी पेरून द्यावे. बागायती पिकासाठी पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे. पेरणीनंतर 45 दिवसांनी 30 किलो नत्र द्यावे. जवस आणि हरभरा (4ः2), जवस आणि करडई (4:2) किंवा जवस आणि मोहरी (5ः1) या प्रमाणात आंतरपिकांची लागवड करता येते. हेक्टरी सात क्विंटल जवसाचे उत्पादन मिळते.
लेखक- एम. जी. बनसोडे, पेठ, जि. नाशिक
संपर्क - 0257-2250888 तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव
लेखक -एम. जी. बनसोडे, पेठ, जि. नाशिक
स्त्रोत:अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...