दालचिनी लागवड अतिपावसाळा सोडून कोणत्याही महिन्यात करता येते. नारळाच्या बागेत लागवड करायची झाल्यास झाडापासून दोन मीटर अंतरावर लागवड करावी. सलग लागवड करायची झाल्यास 1.25 x 1.25 मीटर अंतरावर 60 x 60 x 60 सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत. खड्ड्यामध्ये चांगली माती, एक घमेले शेणखत, 250 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व 100 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश यांच्या मिश्रणाने भरून ठेवावेत. लागवडीसाठी कोकण तेज, नित्यश्री, नवश्री या जाती निवडाव्यात. खड्ड्याच्या मधोमध गुटी कलमांची लागवड करावी. कलमांना काठीचा आधार द्यावा. कलमांसाठी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (02358- 280558) या ठिकाणी संपर्क साधावा.
1) तलावात जमा झालेल्या गाळमातीत पिकांना पोषक अन्नद्रव्ये आणि चिकण मातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतातील पिकांच्या वाढीसाठी ती माती फार उपयोगाची आहे. गाळमातीच्या वापरामुळे हलक्या व मध्यम जमिनीची कमी असलेली सुपीकता वाढविता येतेच, परंतु तिची ओलावा साठवण क्षमतासुद्धा पूर्ववत वाढविली जाते.
2) गाळमातीत नैसर्गिक अन्नद्रव्ये, सेंद्रिय पदार्थ आणि चिकण मातीचे प्रमाण जास्त असते. गाळ हलक्या ते मध्यम जमिनीत योग्य प्रमाणात मिसळावा. योग्य प्रमाणात गाळमातीच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब, उपलब्ध स्फुरद व पालाश अन्नद्रव्याचे प्रमाण जादा दिसून आले.
3) गाळमाती टाकत असताना तिच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास केला जात नाही. ही गाळमाती टाकताना निरनिराळ्या प्रमाणात टाकली जाते. जमिनीच्या गरजेचा विचार केला जात नाही. त्यामुळे काही वेळा जास्त प्रमाणात गाळमातीचा वापर केला गेल्यास अशा जमिनी पाणथळ किंवा चोपण होण्याचा धोका संभवतो.
1) गाळमातीचा वापर करताना फक्त हलक्या आणि कमी पाणी साठवणक्षमता असलेल्या जमिनीस प्राधान्य द्यावे. गाळमाती व शेतजमिनीतील चिकण मातीच्या प्रकारानुसार गाळ वापर मात्रा निर्धारित करावी. मार्च ते मे महिन्यात पाणी साठवण पद्धती कोरड्या पडतात, त्याच वेळी साठवण पद्धतीतून गाळमाती बाहेर काढून शेतात पसरावी.
2) गाळमातीचा जादा फायदा होण्यासाठी गाळमाती पसरलेल्या शेतात खरीप हंगामात सरी वरंबे करावेत. फळबाग लागवड करताना गाळमाती, खोदलेल्या खड्ड्यात किंवा शेतात उतारास आडवे चर खोदून त्यामध्ये भरावी.
3) ज्या गाळमातीचा सामू 8.5 पेक्षा जास्त आहे अशी गाळमाती शेतात पसरू नये. पाणी साठवण पद्धतीच्या काठावरची माती खोदून शेतात पसरण्यासाठी वापरू नये.
4) चांगल्या प्रतीची गाळमाती विटा तयार करण्यासाठी किंवा बिगर शेतीसाठी वापरू नये. चुनखडीयुक्त गाळमाती शेतात पसरविण्यासाठी वापरू नये.
संपर्क : 0217 - 2373047, 2373209
विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर
--------------------------------------------------------------------------------------------------------------
अंतिम सुधारित : 10/7/2020
या विभागात आले या मसाला पिकाविषयी माहिती दिली आहे....
ऑल स्पायसेस या झाडातल्या फळात दालचिनी, जायफळ, काळी...
काळी मिरीची काढणी कधी करावी याबाबतची माहिती येथे द...
कणगर लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत व ...