कोकणामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा ठिबक सिंचनाने कार्यक्षम वापर करून नारळ-मसाला मिश्र पिकांची लागवड करता येते. या बागेमध्ये नारळाच्या पिकाचा मुख्य पीक म्हणून अंतर्भाव असून, त्याची लागवड 7.5 × 7.5 मीटर अंतरावर करण्याची शिफारस केली आहे. या चार नारळांच्या मध्यबिंदूवर जायफळ, नारळ लागवडीच्या रेषेतील दोन नारळांच्या मध्य अंतरावर दालचिनी कलम आणि नारळाच्या बुंध्याजवळ प्रत्येकी दोन मिरी वेल लावावेत. लागवड करताना सुधारित जातींची निवड केल्यास अपेक्षित उत्पादन मिळू शकते. नारळ आणि मसाला पिकांची लागवड करताना एकरी नारळाची 70 रोपे, जायफळाची 54 कलमे, काळी मिरीचे 140 वेल आणि दालचिनीची 123 रोपे बसतात.
जातींची निवड :
नारळ - प्रताप, टी x डी, डी x टी, डी x टी-2
जायफळ - कोकण सुगंधा, कोकण स्वाद, कोकण श्रीमंती.
काळी मिरी - पन्नियूर - 1
दालचिनी - कोकण तेज
संपर्क - 02352 - 235077
प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
चालू वर्षी महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मराठवाडा व...
अमेरिकन कृषी विभागाने जनुकीय सुधारित बटाट्याच्या व...
हळद लागवडीपूर्वी ती परीक्षण करून घ्यावी. लागवड १५ ...
बेने ही एक गोष्ट फार महत्वाची आहे. उस लावताना तिनस...