डॉ. मधुकर बाचुळकर
शास्त्रीय नाव - Portulaca quadrifida (पॉरच्युलिका कॉड्रीफिडा)
कुळ - Portulaceae (पॉरच्युलिकेसी)
स्थानिक नावे - रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ व छोटी घोळ
संस्कृत नाव - लोनी
हिंदी नाव - छोटा नोनिया
इंग्रजी नाव - चिकन वीड.
या वनस्पतीचे बारीक तुकडे ज्वारीच्या पिठात मिसळून त्याचे कोंबडी खाद्य म्हणून लहान-लहान गोळे बनवितात. म्हणूनच या वनस्पतीला "चिकन वीड' असे इंग्रजीत म्हणतात.
चिवळ ही वनस्पती ओलसर, पाणथळ जागेत शेतात व बागेत तण म्हणून वाढते. चिवळ कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात वाढते.
साहित्य - चिवळीची भाजी, डाळीचे पीठ, तेल, फोडणीचे साहित्य, मीठ, लसूण, हिरव्या मिरच्या इत्यादी.
कृती - चिवळीची भाजी स्वच्छ निवडून, धुऊन, बारीक चिरून घ्यावी.
कढईत तेल गरम करून फोडणी करून घ्यावी. मिरच्यांचे तुकडे करून फोडणीतच टाकावेत.
नंतर त्यात चिरलेली भाजी घालावी. चवीपुरते मीठ घालून दोन मिनिटे परतून घ्यावी.
ही भाजी पटकन शिजते. नंतर त्यावर डाळीचे पीठ हळूहळू भुरभुरत एकीकडे हलवत गुठळ्या न होता पेरावे.
ही भाजी पटकन शिजून हलकी व मोकळी होते.
काही वेळा फोडणीत लसणाच्या पाकळ्या ठेचून घालाव्यात. यामुळे भाजीला चांगला स्वाद येतो.
संपर्क - डॉ. मधुकर बाचूळकर, 9730399668
(लेखक श्री विजयसिंग यादव कला आणि शास्त्र महाविद्यालय, पेठ वडगाव (जि. कोल्हापूर) येथे प्राचार्य आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
अडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर उं...
एरंड ही वर्षायू किंवा बहुवर्षायू वनस्पती युफोर्बिए...
आवळा तुरट, आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे हिरव्या रं...
इसबगोलाचे बी शीतल, शामक, मूत्रल (लघवी साफ करणारे) ...