शास्त्रीय नाव: Dendrocalamus strictus (डेन्ड्रोक्येल्यामस स्ट्रीकटस् )
फुलण्याचा कालावधी: ३०-३५ वर्षे
योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: २५-५० फूट
योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: २-३.५ इंच
उपयोग: बांधकाम, विणकाम, हस्तकला, फर्निचर, BIO-CNG, plyboard, खाण्यासाठी कोंब, चारा, शेतीसाठी काठ्या
विशेष सूचना: ह्या बांबू ची लागवड केल्यावर वेळोवेळी फांद्यांची तसे वेड्या वाकड्या काठ्यांची छाटणी करणे आवश्यक असते.
शास्त्रीय नाव: Dendrocalamus stocksii (डेन्ड्रोक्येल्यामस स्टोक्सी )
फुलण्याचा कालावधी: ठराविक असा नाही.
योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: २५-४० फूट
योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: २-३.५ इंच
उपयोग: बांधकाम, विणकाम, हस्तकला, फर्निचर, खाण्यासाठी कोंब, चारा, शेतीसाठी काठ्या
विशेष सूचना: हा बांबू सह्याद्री तसेच कोकणात लागवडी साठी योग्य आहे. इतर ठिकाणी याची उंची तसेच जाडी कमी राहू शकते.
शास्त्रीय नाव: Dendrocalamus asper (डेन्ड्रोक्येल्यामस एस्पर )
फुलण्याचा कालावधी: ६०-८० वर्षे
योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: ६०-८० फूट
योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: ६-८ इंच
उपयोग: खाण्यासाठी कोंब, बांधकाम, हस्तकला, फर्निचर, BIO-CNG, plyboard,
विशेष सूचना: हा बांबू अति पावसाच्या प्रदेशात लागवडीसाठी योग्य आहे. कमी पावसाच्या प्रदेशात प्रायोगिक तत्वावर लागवड होणे गरजेचे आहे. सह्याद्री तसेच कोकणात लागवडी साठी योग्य आहे. इतर ठिकाणी याची उंची तसेच जाडी कमी राहू शकते.
शास्त्रीय नाव: Dendrocalamus brandisii (डेन्ड्रोक्येल्यामस ब्रांडीसी )
फुलण्याचा कालावधी: ४५-६० वर्षे
योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: ६०-८० फूट
योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: ६-८ इंच
उपयोग: बांधकाम, विणकाम, हस्तकला, फर्निचर, BIO-CNG, plyboard, खाण्यासाठी कोंब,
विशेष सूचना: हा बांबू अति पावसाच्या प्रदेशात लागवडीसाठी योग्य आहे. कमी पावसाच्या प्रदेशात प्रायोगिक तत्वावर लागवड होणे गरजेचे आहे. सह्याद्री तसेच कोकणात लागवडी साठी योग्य आहे. इतर ठिकाणी याची उंची तसेच जाडी कमी राहू शकते.
शास्त्रीय नाव: Bambusa bambos (बांबूसा बांबोस)
फुलण्याचा कालावधी: ३५-५० वर्षे
योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: ६०-८० फूट
योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: ५-६ इंच
उपयोग: बांधकाम, कागद लगदा, फर्निचर, इथेनॉल, BIO-CNG, plyboard, खाण्यासाठी कोंब, औषधी पाने, चारा.
विशेष सूचना: हा बांबू काटेरी असल्याने याची लागवड आणि व्यवस्थापन अतिशय काटेकोरपणे करावे लागते, अन्यथा हा बांबू कापायला अतिशय त्रास होतो. जर काटेकोर पणे योग्य व्यवस्थापन होणार असेल तर लागवडीला हरकत नाही. नदी, नाले, ओढे यांच्या काठावर या बांबूची वाढ जास्त चांगली होते.
शास्त्रीय नाव: Bambusa tulda (बांबूसा टूल्डा)
फुलण्याचा कालावधी: ३५-६० वर्षे
योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: ३५-४५ फूट
योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: २-३.५ इंच
उपयोग: बांधकाम, विणकाम, हस्तकला, फर्निचर, BIO-CNG, plyboard, खाण्यासाठी कोंब, चारा, शेतीसाठी काठ्या.
विशेष सूचना: कोरड्या वातावरणात या बांबू ला जास्त फांद्या येतात. त्या फांद्या छाटल्यास नवीन येणारे कोंब सरळ यायला मदत होते.
शास्त्रीय नाव: Bambusa nutans ( बांबूसा नुतन्स )
फुलण्याचा कालावधी: ३५-४० वर्षे
योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: २५-४० फूट
योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: २-३.५ इंच
उपयोग: बांधकाम, कागद लगदा, फर्निचर, इथेनॉल, BIO-CNG, Plyboard
विशेष सूचना: कोरड्या वातावरणात या बांबू ला जास्त फांद्या येतात. त्या फांद्या छाटल्यास नवीन येणारे कोंब सरळ यायला मदत होते. या बांबूची वेगवेगळया वातावरणात प्रायोगिक तत्वावर लागवड व्हायची गरज आहे.
शास्त्रीय नाव: Bambusa balcooa ( बांबूसा बाल्कूवा )
फुलण्याचा कालावधी: ३५-४५ वर्षे
योग्य वातावरण आणि देखभाली खाली उंची: ३५-५० फूट
योग्य वातावरण आणि देखभाली खाली जाडी: ३-५ इंच
उपयोग: बांधकाम, फर्निचर, इथेनॉल, BIO-CNG
विशेष सूचना: औद्योगिक दृष्ट्या अतिशय महत्वाचा असा हा बांबू आहे. याची फायदेशीर लागवड करायची असेल तर अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन करायला हवी. एकट्या दुकट्याने लागवड केली तर औद्योगिक दृष्ट्या वापराला मर्यादा येतात. कोरड्या वातावरणात या बांबू ला जास्त फांद्या येतात. त्या फांद्या छाटल्यास नवीन येणारे कोंड सरळ यायला मदत होते.
अंतिम सुधारित : 4/22/2020