जमिनीतील सेंद्रिय घटकांच्या रक्षणासाठी मोहाचे झाड महत्वाची कामगिरी बजावते. ओसाड आणि पडीक जमिनीतही मोह वाढतो. ज्या वेळी जमीन आम्लधर्मीय बनते, त्यावेळी जमिनीत दुसरे झाड वाढत नाही. पिक येत नाही. पण त्या जमिनीत मोह येतो. आम्लधर्मीय जमिनीचा पोत वाढवण्याचे कार्य मोह करतो. जमिनीतल्या पोषक द्रव्यात वाढ करतो. सामुदायिक पडीक जमिनीचे हरितीकरण करण्यास मोहासारखा उपयुक्त वृक्ष दुसरा नाही. मोहाचे झाड मातीचे रक्षण करते. मातीत ओलावा टिकवते. माणसाला प्रदूषण मुक्त जीवन जगण्यास मोह मदत करतो. त्याचबरोबर पाळीव जनावरांबरोबर अस्वल, हत्ती, गावे, सांबर, चितळ इत्यादी वन्यप्राणी मोहाची खाली पडलेली फुले व फळे खाऊन आपले पोट भारतात. अशा रीतीने मातीपासून मनुष्यप्राणी ते वन्यप्राण्यांपर्यंत सर्वांवर मोहाच्या झाडाचे ऋण आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याची कामगिरी मोह बजावतो. महाराष्ट्रातल्या पडीक जमिनीत मोहाची झाडे लावण्यास खूप वाव आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात रोपवाटिका तयार झाल्या पाहिजेत. खेड्यापाड्यांतील लोकांना मोहाची झाडे लावण्यास प्रवृत्त केले पाहिजे. सामाजिक वनीकरण खात्याने मोह वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे.
आपला देश खेड्यांचा बनलेला आहे. सत्तर टक्के भारतीय खेड्यापाड्यांत राहतात. त्यांत आदिवासी जमाती अरण्यातील दर्याखोर्यात राहतात. या लोकांना इतर व्यवसाय नाही. उन्हाळ्यात तर उत्पन्नाचे साधन नसल्याने त्यांना भाकरीची भ्रांत पडते. अशा वेळी मोह त्यांच्या भाकरीची सोय करतो. आदिवासी मोहाची फुले, फळे, बिया गोळा करून बाजारात विकतात. काही आदिवासी मोहाच्या फुलांपासून मद्य तयार करून विकतात. शासनही त्यांच्या या व्यवसायाला मान्यता दिली आहे. अशा रीतीने देशातल्या ग्रामीण भागांतील आदिवासींसह १४ कोटी लोक उन्हाळ्यात मोहाच्या झाडावर पोट भरतात. तसेच २ लाख ५३ हजार लोकांना मोहाच्या झाडापासून रोजगार मिळतो. रानावनातल्या ग्रामीण जनतेला रोजगार पुरवणार्या मोहाच्या झाडाचा क्रमांक साल वृक्षाच्या खालोखाल आहे.
मोहाच्या झाडाचा प्रत्येक भाग विकला जातो. फुले, फळे, बिया, पाने, साल, लाकूड इत्यादी सर्व भाग विकले जातात. ज्या राज्यांत मोहाची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत तेथे तालुक्याच्या ठिकाणी मोहापासून मिळणाऱ्या वस्तू विकल्या जातात. त्याच बरोबर काही राज्यांत प्रमुख केंद्रे आहेत.
१) चंद्रपूर २) नंदुरबार ३) धडगाव (जि. धुळे) ४) नासिक ५) गोंदिया (भंडारा).
१) मौरानीपूर – उत्तर प्रदेशातील मौरानीपूर ही मोह उत्पन्न विक्री ची भारतातील मोठी बाजार पेठ आहे.
२) ललितपुर
३) भटवाडी
४) अलाहाबाद.
१) शाहजापूर २) उज्जैन ३) बासोज ४) रायपुर ५) बैतुलगंज ६) भोपाळ ७) इटारसी ८) अलीराजपूर ९) कान्नोड
१) गोधरा.
१) गुणपूर.
१) राजमहेंद्री २) विशाखापट्टणम् ३) बोब्बीली ४) पार्वतीपुरम्.
१) तुमकूर
माहिती लेखन : वनराई संस्था
अंतिम सुधारित : 2/3/2020
चिंचवृक्ष अनेक प्रकारच्या जमिनीत उगवतो. काळ्या मात...
तुती रोपवाटिकेसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमी...
जंगले ही मृद्संधारण, हवामान, पाणी उपलब्धता, दुष्क...
वनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची निवड...