वनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची निवड करावी. यामध्ये, माळरान व टेकड्या, शेतरस्त्याचा काढ, मध्यम व उथळ खोलीची जमीन, नाल्याच्या किनाऱ्यावर वनवृक्षांची लागवड केली जाते. या लागवडीमुळे जमिनीची धूप थांबविण्यास मदत होते. कृषी वनशेतीमुळे एकाच जमिनीच्या तुकड्यापासून पीक उत्पादनाबरोबर वृक्षांपासून चारा, लाकूड असा दुहेरी फायदा मिळतो. वनशेती करताना इमारती लाकडासाठी साग, शिवण, सिसम व निलगिरीची लागवड करावी. अवजारांसाठी लाकूड उपलब्ध होण्यासाठी शिवण, बांबू, सागाची लागवड करावी. कागद व लगद्यासाठी सुबाभूळ, बांबू यांची, तर जैविक इंधनासाठी करंज, मोह या झाडांची लागवड करावी.
शेताच्या बांधावर एक-दोन किंवा तीन ओळींत पिकांवर परिणाम होणार नाही अशा बेताने कमी झाकारा असणाऱ्या वृक्षजातींची लागवड करावी. रामकाठी, सुबाभूळ, निलगिरी, सुरू, बांबू, शेवरी यांसारख्या जलद वाढणाऱ्या, इंधन, चारा, फाटे, बांबू देणाऱ्या जातींचे मिश्रण केल्यास शेतकऱ्यांच्या निरनिराळ्या गरजा भागू शकतात. ज्या क्षेत्रावर विविध वृक्ष प्रजाती, पिके, गवते, फळझाडे लावावयाची असतील, त्या क्षेत्राची प्रथम झाडांच्या आकारमानानुसार म्हणजे झाडांच्या वाढीची पद्धत यानुसार वेगवेगळ्या अंतरावर आखणी करून खुणा कराव्यात. डोंगर-उतारावर झाडांची आणि गवतांची लागवड करावयाची असेल, तर सलग समपातळी चरांची आखणी करावी. सलग समपातळी चर 60 x 60 सें.मी. आकाराचा खोदावा व त्या बांधाची उंची 75-100 सें.मी. पर्यंत ठेवावी.
1) हलक्या व उथळ जमिनी - अंजन, सुबाभूळ, सिसू, बाभूळ, सिरस, शेवरी, कडुलिंब.
2) पाणथळ जमिनी - गिरिपुष्प, सुरू, भेंडी, करंज, शेवरी, निलगिरी.
3) क्षारयुक्त जमिनी - वेडी बाभूळ, बाभूळ, कडुलिंब, सिसू, निलगिरी, करंज, खैर.
4) डोंगराळ जमिनी - निलगिरी, बाभूळ, सुबाभूळ, सौंदड, कडुलिंब.
संपर्क -
1) 02358 -283655
वनशास्त्र महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी
2) 02426-243252
अखिल भारतीय समन्वित वनशेती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
निलगिरीचे वनस्पतीपासून सुगंधी द्रव्योद्योग तेले, औ...
मिर्टेसी कुलातील ही उंच व बहुपर्णी वनस्पती असून ति...
कुंदा नदी : निलगिरीत उगम पावणारी तमिळनाडू राज्याती...
कुंदा नदी : निलगिरीत उगम पावणारी तमिळनाडू राज्याती...