१) सागलागवडीसाठी जमीन खोल व चांगल्या निचऱ्याची हवी. चिबड जमीन या झाडास मानवत नाही.
२) पॉलिथिन पिशव्यांतील रोपे किंवा स्टंप लावून सागाची लागवड करता येते. सागाची लागवड २ बाय २ मीटर अंतरावर करावी. लागवडीसाठी १.५ फूट बाय १.५ फूट आकाराच्या खड्ड्यात माती व शेणखतमिश्रण भरावे. चांगला पाऊस झाल्यावर लागवड करावी.
३) सागलागवडीत पहिली तीन वर्षे आंतरपिके घेता येतात.
४) झाडाच्या आळ्यात अर्धा मीटर भागातील माती खोदून भुसभुशीत ठेवावी. झाडे लहान असताना खोडावरील अनावश्यक कोंब, फांद्या खुडत राहाव्यात. फक्त पाने ठेवावीत. त्यामुळे झाडांची उंची वाढते.
५) रोपांना गरजेनुसार पाणी द्यावे.
६) लागवडीनंतर सहा वर्षांनी झाडांची पहिली विरळणी करावी. त्यामध्ये अंतर ४ बाय २ मीटर ठेवावे. दुसरी विरळणी १२ वर्षांनंतर करावी. अंतर ४ मीटर बाय ४ मीटर ठेवावे. वीस वर्षांनंतर प्रतिझाड अंदाजे १० घनफूट लाकूड मिळू शकते.
७) सागलागवडीची नोंद करावी. त्यामुळे कापणी वेळी शासकीय परवानगी मिळविण्यास अडचण येत नाही.
८) पडीक जमिनीवर सागाची लागवड दर सहा ते सात वर्षांनी करावी. त्यामुळे पुढे भविष्यात दर सहा-सात वर्षांनी चांगले उत्पादन मिळत राहते.
डॉ. अ. प्र. खंडारे - ९८८१६८२७२४
(लेखक वनशास्त्र महाविद्यालय,अकोला येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
जंगले ही मृद्संधारण, हवामान, पाणी उपलब्धता, दुष्क...
तुती हे बहुवर्षीय पीक आहे. हलकी, मध्यम व भारी अशा ...
चिंचवृक्ष अनेक प्रकारच्या जमिनीत उगवतो. काळ्या मात...
वनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची निवड...