आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत केली जाते. आडसाली उसाचा कालावधी 16 ते 18 महिन्यांचा असतो. उसाची लागवड केल्यानंतर पूर्ण उगवण होण्यासाठी सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी लागतो. सुरवातीच्या कालावधीमध्ये उसाची वाढ हळू होत असल्यामुळे उसाच्या दोन सऱ्यांमध्ये आंतरपीक घेण्यासाठी भरपूर मोकळी जागा असते.
उसामध्ये आंतरपीक घेतल्याने एकूण निव्वळ उत्पन्नात वाढ होते. उसासाठी बियाणे, खते व आंतरमशागतीसाठी केलेला खर्च आंतरपिकाच्या उत्पन्नातून निघून जातो. आंतरपीक घेतल्याने तणांच्या वाढीवर परिणाम होऊन तणांचे प्रमाण कमी होते. आडसाली उसामध्ये द्विदल वर्गातील भुईमूग, सोयाबीन व चवळी ही पिके किंवा मुळा, कोथिंबीर, मेथी व कांदा यासारखी भाजीपाल्याची आंतरपिके घेता येतात. द्विदल वर्गातील आंतरपिके घेतल्यास जमिनीचा पोत सुधारतो.
या पद्धतीत 75 सें.मी. (2.5 फूट) किंवा 90 सें.मी. (तीन फूट) अंतरावर सऱ्या पाडून प्रत्येक दोन सऱ्यांत ऊस लागवड करून तिसरी सरी मोकळी सोडावी. अशा प्रकारे जोडओळ लागवड करून राहिलेल्या 150 सें.मी. (पाच फूट) किंवा 180 सें.मी. (सहा फूट) पट्ट्यात आंतरपिकाची लागवड करावी.
या पद्धतीत उसाच्या उत्पादनात घट येत नाही व आंतरपीक निघाल्यानंतर उसात आंतरमशागत करणे सुलभ जाते.
: 02169 - 265333
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र,
पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ऊस बियाणे लागण करताना बियानाद्वारे नवीन रोपामध्ये ...
रोपे तयार करण्यासाठी एक मी. रुंद आणि रोपांच्या संख...
कोव्हीएसआय - 03102 या जातीचे को 86032 या तुल्य जात...
एक किलो मळी (मोलॅसिस) सुमारे 500 लिटर बायोगॅस देते...