অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उसाचे खत व्यवस्थापन

उसाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी उसाला संतुलित खताचा पुरवठा करणे आवश्यक आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादकता कमी होत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी उसाचे एकात्मिक पद्धतीने खत व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. एकात्मिक पद्धतीने खताचा पुरवठा करत असताना खालील प्रकारे खताच्या मात्रा व खते दिल्यास उत्पादनात वाढ होईल.

सेद्रिय खते

भर खते शेणखत

जमिनीची पूर्वमशागत करत असताना नांगरणीनंतर वखराच्या शेवटच्या पाळीअगोदर हेक्टरी ३० टन शेणखत शेतात मिसळून घ्यावे व त्यानंतर ऊस लावणीच्या आधी १0 टन शेणखत व रासायनिक खताचा पहिला हसा सरीमध्ये मातीत मिसळून द्यावा.

कंपोस्ट खते

कंपोस्ट खत शेताबाहेर तयार करून त्याचा वापर ऊसशेतीमध्ये करावा. खत तयार करण्याकरिता शेतातील पालापाचोळा, उसाचे पाचट, टाकाऊ पदार्थ, पिकाचे अवशेष इत्यादींचा वापर करून तयार करावे. साधारणपणे ४ ते ५ महिन्यांनी तयार झालेले कंपोस्ट खत हेक्टरी ३0 टन याप्रमाणे शेवटच्या वखरणीच्या अगोदर टाकावे. खोडवा उसामध्ये पाचट कुजवून त्यापासूनसुद्धा कंपोस्ट खत मिळवू शकतो. त्यासाठी ऊसतोडणी झाल्यानंतर उसाच्या पाचटावर ४० किलो युरिया व २० किलो सिंगल सुपर फॉस्फेट फवारावे. तसेच, ५ किलो पाचट कुजवणारे जिवाणुसंवर्धक शेणामध्ये मिसळून पाचटावर टाकून त्यानंतर पाणी द्यावे. त्यानंतर रिजरच्या सहाय्याने बगला फोडून पाचटावर माती टाकल्यास पाचट जागेवर कुजते.

सूक्ष्म अन्नद्रव्ये

खालीलप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा उसाला द्यावी.

जोर खते

ऊसपिकासाठी सेंद्रिय जोर खताचा वापर करू शकतो. यामध्ये वेगवेगळ्या पेंड, मासाचे खत, रक्ताचे खत, हाडाचे खत व मासोळी खत यांचा वापर केला तर अधिक उत्पादन मिळते. एकंदर पेंडीपैकी ८५ टक्के खाद्य पेंडी असून १५ टक्के अखाद्य पेंडी आहेत. पेंडीची पावडर करून ती ओलसर जमिनीत ऊस लावणीपूर्वी घालावी. जोर खतामध्ये भर खताच्या तुलनेमध्ये नत्र, स्फुरद व पालाश यांचे प्रमाण अधिक असते.

प्रेसमड केक

ऊस कारखान्यातील टाकाऊ प्रेसमड केक यांचा उपयोग ऊसपिकासाठी करू शकतो. जमिनीमध्ये पाण्याचा हमखास पुरवठा असल्यास तीन वर्षांमधून एकदा हेक्टरी १५ टन याप्रमाणे ओल्या प्रेसमड केकची शिफारस केली आहे.

हिरवळीचे खत

हिरवळीच्या खतासाठी ताग, र्धेचा, चवळी व ग्लिरीसीडीया इत्यादी पदार्थाचे प्रमाण वाढते तागापासून ९० किलो, र्धेचापासून ८५ किलो, चवळीपासून हेक्टरी ७५ किलो नत्र जमिनीस मिळते. हिरवळीचे पीक ४५ दिवसांनी फुलो-यात आल्यावर जमिनीत गाडावे. अथवा कापणी करुन जमिनीत गाडावे किंवा सरीच्या बगलेस चळी घेऊन गाडावे.

गांडूळ खत

गांडूळ खत हे एक उत्तम प्रकारचे खत असून त्यामध्ये नत्र १ ते २ टक्के, स्फुरद १ टक्के व पालाश 0.५ टक्के असून सूक्ष्म अन्नद्रव्ये, संप्रेरके व एन्झाईम्स मोठ्या प्रमाणामध्ये असतात. उसाकरिता हेक्टरी ५ टन गांडूळ खताची शिफारस केली असून त्यामधून १५o; १oo:१oo किलो नत्र, स्फुरद व पालाश पिकास मिळते. गांडूळ खताबरोबर व्हर्मीवॉशचा वापर उसाकरिता करु शकतो.

जिवाणू खते

खलीलप्रमाणे जिवाणू खताचा वापर करावा.

खताचे नाव सूक्ष्म अन्नद्रव्ये घटक हेक्टरी मात्रा ((किलो) सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाण (टक्के)
झिंक सल्फेट जस्त २० २४ ते ३४
फेरस सल्फेट लोह २५ १९
मंँगेनीज सल्फेट मंँगेनीज २५ २०
बोरॅक्स सल्फेट बोरॉन ०५ ११
बोरिक अॅसीड बोरॉन ०५ १७
सोडियम मॉलीबडेनम मॉलीबडेनम २.५ ३९
कॉपर सल्फेट तांबे २.५ २४
खत मात्रा देण्याची वेळ आडसाली (किलो/हेक्टरी) पूर्वहंगामी (किलो/हेक्टरी) सुरु (किलो/हेक्टरी)
नत्र स्फुरद पालाश नत्र स्फुरद पालाश नत्र स्फुरद पालाश
लावणीच्या वेळी (सरी डोज) ४० ८५ ८५ ३४ ८५ ८५ २५ ५८ ५८
लागवडीनंतर ६ ते ८  अठवड्यानि १६०

-

-
१३५ -
-
१०० -
-
लागवडीनंतर १२ ते १४ आठवड्यांनी ४० -
-
३५ -
-
२५ -
-
मोठ्या बांधणीच्या वेळी १६० ८५ ८५ १३६ ८५ ८५ १०० ५७ ५७
एकूण ४०० १७० १७० ३४० १७० १७० २५० ११५ ११५

उसाच्या काड्यावर आतंरक्षीकरण करणे

अॅसेटोबॅक्टर १o किलो हेक्टरी किंवा अॅझोटोबॅक्टर/अॅझोस्पीरीलम १० किलो हेक्टरी अधिक पीएसबी १o किलो हेक्टरी याप्रमाणे वापरावे. हेक्टरी १o किलो ऑसिटोबॅक्टर अधिक १० किलो पीएसबी जिवाणू खते कंपोस्ट खतामध्ये मिसळवून लागवडीच्या वेळेस जमिनीत द्यावीत किंवा ५ किलो जिवाणू (अॅझोटोबॅक्टर अधिक अॅझोस्पीरीलम अधिक अॅसेटोबॅक्टर अधिक पीएसबी) प्रत्येकी १.२५ किलो खते एकत्रित मिसळून बेणेप्रक्रिया करावी. ऊसपिकावर कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची आवश्यकता आहे, हे लक्षात घेऊन तसेच मातीपरीक्षण करून आवश्यक त्याच सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा करावा.

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 8/14/2020© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate