पिकांच्या जोमदार वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करणे फायदेशी पिकांच्या जोमदार वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा संतुलित वापर करणे फायदेशीर ठरते. रासायनिक खतांच्या मर्यादा व सेंद्रिय खतांचे फायदे लक्षात घेता पिकास निव्वळ रासायनिक खते न देता त्याबरोबर आपल्याच शेतात तयार होणारी सेंद्रिय खते देणे ही एक शास्त्रीय तशीच काळाची गरज आहे. अलीकडे बागायती क्षेत्र वाढल्यामुळे रासायनिक खतांचा वापर भरपूर वाढला आहे. दिवसेंदिवस शेणखत व कंपोस्ट खते उपलब्ध होत नाहीत.
हिरवळीचे परंतु हिरवळीचे पीक घेऊन ते जमिनीत गाडण्यासाठी क्षेत्राची उपलब्धता, हिरवळीचे पीक व नंतर घ्यावयाचे पीक यासाठी पुरेसा वेळ हवा असतो.
महाराष्ट्रात जवळजवळ १० लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड केली जाते व त्यापासून मोठ्या प्रमाणात उसाचे पाचट उपलब्ध होते. उसाच्या पाचटात ०.४o ते ०.५० टक्के नत्र, 0.१५ ते ०.२० टक्के स्फुरद आणि o.९ ते १ टक्के पालाश तसेच ३२ ते ४0 टक्के सेंद्रिय कर्ब असते. असे पाचट जाळल्यामुळे त्यातील सेंद्रिय कर्बाचा पुर्णत: नाश होतो. पाचटातील नत्र आणि स्फुरदाचा ९० टक्क्यांहून अधिक भाग जळून जातो, केवळ पालाश काही प्रमाणात शिल्लक राहते. परंतु अजूनही ऊस उत्पादक शेतकरी उसाचे पाचट मोठ्या प्रमाणात जाळून होणा-या नुकसानीमध्ये भर घालत आहेत. महाराष्ट्रात जवळजवळ ४० ते ४५ टक्के क्षेत्रावर घेतल्या जाणा-या खोडव्यापैकी पाचटाचा वापर मात्र १ टक्के क्षेत्रावरही होत नाही. हे थांबविण्यासाठी पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्राने उसाच्या पाचटाचे व्यवस्थापन करण्याचे तंत्र विकसित केले आहे.
साधारणपणे एक हेक्टर उसाच्या क्षेत्रामध्ये ८ ते १० टन पाचट मिळते, हे जाळून न टाकता त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.र ठरते. रासायनिक खतांच्या मर्यादा व सेंद्रिय खतांचे फायदे लक्षात घेता पिकास निव्वळ रासायनिक खते न देता त्याबरोबर आपल्याच शेतात तयार होणारी सेंद्रिय खते देणे ही एक शास्त्रीय तशीच काळाची गरज आहे. अलीकडे बागायती क्षेत्र वाढल्यामुळे रासायनिक खतांचा वापर भरपूर वाढला आहे. दिवसेंदिवस शेणखत व कंपोस्ट खते उपलब्ध होत नाहीत. हिरवळीचे परंतु हिरवळीचे पीक घेऊन ते जमिनीत गाडण्यासाठी क्षेत्राची उपलब्धता, हिरवळीचे पीक व नंतर घ्यावयाचे पीक यासाठी पुरेसा वेळ हवा असतो. महाराष्ट्रात जवळजवळ १० लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड केली जाते व त्यापासून मोठ्या प्रमाणात उसाचे पाचट उपलब्ध होते. उसाच्या पाचटात ०.४o ते ०.५० टक्के नत्र, 0.१५ ते ०.२० टक्के स्फुरद आणि o.९ ते १ टक्के पालाश तसेच ३२ ते ४0 टक्के सेंद्रिय कर्ब असते. असे पाचट जाळल्यामुळे त्यातील सेंद्रिय कर्बाचा पुर्णत: नाश होतो.
पाचटातील नत्र आणि स्फुरदाचा ९० टक्क्यांहून अधिक भाग जळून जातो, केवळ पालाश काही प्रमाणात शिल्लक राहते. परंतु अजूनही ऊस उत्पादक शेतकरी उसाचे पाचट मोठ्या प्रमाणात जाळून होणा-या नुकसानीमध्ये भर घालत आहेत. महाराष्ट्रात जवळजवळ ४० ते ४५ टक्के क्षेत्रावर घेतल्या जाणा-या खोडव्यापैकी पाचटाचा वापर मात्र १ टक्के क्षेत्रावरही होत नाही. हे थांबविण्यासाठी पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्राने उसाच्या पाचटाचे व्यवस्थापन करण्याचे तंत्र विकसित केले आहे. साधारणपणे एक हेक्टर उसाच्या क्षेत्रामध्ये ८ ते १० टन पाचट मिळते, हे जाळून न टाकता त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.शेतातील ऊस तोडून गेल्यानंतर जी वाळलेली पाने शेतात पडतात, त्यास पाचट असे म्हणतात. पाचटामध्ये लिग्रिन व मेणचट पदार्थाचे प्रमाण १५ टक्के असते. पाचटावर टोकदार केसासारखी कुसे असल्यामुळे जनावरे पाचट खात नाहीत.
पाचटामध्ये ऊर्जा निर्मितीक्षमता कमी असते. शिवाय पाचट लवकर भरभर जळून राख होते. त्यामुळे पाचटाचा उपयोग जाळण्यासाठी करता येत नाही. सर्वसाधारणपणे एक हेक्टर शेतातून ७.५ ते १० टन पाचट उपलब्ध होते व त्यापासून ४ ते ५ टन सेंद्रिय खत मिळते. महाराष्ट्रात उसाखालील क्षेत्र १० लाख हेक्टर असून त्यापासून ७५ ते १00 लाख टन पाचट मिळू शकते.
अ) शेताच्या बाहेर पाचटाचे सेंद्रिय खत निर्मिती
शेताच्या बाहेर सेंद्रिय खत तयार करण्यासाठी एक टन पाचटासाठी २ मीटर रुंद व १ मीटर खोल आणि ५ ते ६ मीटर लांबीचा खडुा घ्यावा तसेच शक्य झाल्यास त्या पाचटाचे लहान तुकडे करावे. त्यामुळे पाचट लवकर कुजण्यास मदत होते. पाचटाचा सुरुवातीला २० ते ३० सें.मी. जाडीचा थर देऊन या थरावर एक टन पाचटासाठी ८ किलो युरिया व १० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व १०० लिटर पाणी शिंपडावे. त्यानंतर १ किलो पाचट कुजविणा-या जिवाणू संवर्धनाचे मिश्रण असलेला शेणकाला समप्रमाणात पाचटावर टाकावा. तसेच आवश्यकता वाटल्यास जास्त पाणी शिंपडावे. रासायनिक खतांचे द्रावण व जिवाणू संवर्धनाच्या द्रावणांचे एकत्रित मिश्रण न वापरता स्वतंत्रपणे वापरावे. अशारितीने पाचटाचे वरचा भाग शेणमातीने झाकून घ्यावा. एक ते दीड महिन्याच्या अंतराने खड्ड्याची चाळणी करावी व आवश्यकतेनुसार खडुयामध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी पाणी शिंपडावे. साधारणत: ६० टक्के ओलावा राहील या बेताने पाण्याचा वापर करावा. अशाप्रकारे चार ते साडेचार महिन्यात पाचटापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होते.
ब) लागवड केलेल्या उसामध्ये पाचटाचे सेंद्रिय खत निर्मिती नवीन लागवड केलेल्या शेतामध्ये पाचटाचे सेंद्रिय खत तयार करता येते. उसाची तोडणी झाल्यानंतर उसाचा आपणास खोडवा घ्यावयाचा
नसेल तर राहिलेले पाचट गोळा करून ते नवीन लागवड करावयाच्या प्रत्येक सरीमध्ये पाचट दाबून घ्यावे व त्यावर साधारणतः १ टन पाचटासाठी म्हणजे १० गुंठे क्षेत्रासाठी ८ किलो युरिया आणि १० किलो सिंगल सुपर फॉस्फेट १०० लिटर पाण्यामध्ये द्रावण करून पाचटावर शिंपडावे. त्यानंतर १oo लिटर पाणी, १oo किलो शेण, तसेच १ किलो कंपोस्ट जिवाणू संवर्धन याचा शेणकाला त्यावर शिंपडावा तसेच रिजरच्या साह्याने सरीचा वरंबा व वरंब्याची सरी करून सर्व पाचट झाकून घ्यावे. नंतर तयार झालेल्या सरीमध्ये नेहमीच्या व प्रचलित पद्धतीने लागणीच्या उसाची रासायनिक खतमात्रा द्यावी व उसाची लागवड करावी. चार ते साडेचार महिन्यामध्ये झाकलेल्या सरीमधील पाचट कुजून शेतातच सेंद्रिय खत तयार होते.
क) खोडव्यामध्ये पाचटाचे सेंद्रिय खत निर्मिती
लागवडीचा ऊस तुटून गेल्यावर खोडवा पिकामध्ये वरंब्यातील बुडके हाताने मोकळे करून सरीमध्ये पाचट दाबून घ्यावे. त्यामुळे बुडख्यावर सूर्यप्रकाश पडून नवीन कोंब जोमदार येतील. त्यानंतर बुडखे धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावेत व त्यावर लगेच o.१ टक्के बाविस्टीनची फवारणी करावी. त्यासाठी १o ग्रॅम बाविस्टीन १० लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची बुडख्यावर फवारणी केल्यामुळे मातीतून होणा-या बुरशीजन्य रोगाचा प्रतिबंध होतो. शेतात पसरलेल्या पाचटावर प्रती १० गुंठे क्षेत्रावर अंदाजे १ टन पाचट असते. या प्रती १ टन पाचटासाठी ८ किलो युरिया १० किलो सिंगल सुपर फॉस्फेट समप्रमाणात पाचटावर टाकावे व नंतर १ किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धन यांचे शेणामध्ये द्रावण करून तो शेणकाला पाचटावर समप्रमाणात शिंपडावा व खोडव्याला पहिले पाणी द्यावे.
ऊस तुटून गेल्यावर पहिल्या १५ दिवसात ही क्रिया करावी. त्यानंतर ३ ते ४ दिवसात वापसा आल्यावर पहारीसारख्या साधनाने रासायनिक खतांची पहिली मात्रा सरीच्या एका बाजूला बुडख्यापासून १५ सें.मी. अंतरावर १५ सें.मी. खोल व दोन छिद्रातील अंतर ३० से.मी. ठेवून द्यावी. दुसरी खत मात्रा सरीच्या विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने १३५ दिवसांनी द्यावी आणि नेहमीप्रमाणे पाणी द्यावे. अशाप्रकारे खोडव्यामध्ये पाचटाचे नियोजन केल्यास सुरवातीच्या काळात सरीमध्ये आच्छादन म्हणून उपयोग होतो. त्यामुळे जमिनीतील ओलाव्याचे कमी होतो. साडेचार ते पाच महिन्यानंतर सर्व पाचट कुजून खोडव्यामध्ये उत्तम सेंद्रिय खत तयार होते. त्यामुळे शेतक-यांनी उसाचे पाचट जाळून न टाकता या नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणा-या सेंद्रिय पदार्थाचा शेतात वापर करून जमिनीची सुपिकता पातळी वाढवावी, त्यामुळे अधिक ऊस उत्पादन मिळू शकते.
ड) उसाच्या पाचटापासून गांडूळखत निर्मिती
१) जागेची निवड व शेड उभारणी
गांडूळ पैदास करण्यासाठी उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी, जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडांची मुळे गांडूळ खतातील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळ खत निर्मितीसाठी खडुयावर दिवसभर सावली राहण्यासाठी छप्पर करावे. त्याकरीता उपलब्ध असणा-या वस्तू बांबू,लाकडे,उसाचे पाचट यांचा वापर करावा. छपराची मधील उंची ६.५ फूट, बाजूची उंची ५ फूट व रुंदी १० फूट असावी. परंतु छपराचे वरील आवरण दोनही बाजूस १-१ फूट बाहेर असावे म्हणजे छपराची
बाहेरील रुंदी १२ फूट असावी. छपराची लांबी आपल्याकडे उपलब्ध असणा-या उसाच्या पाचटानुसार कमी-जास्त होईल, अशा छपरामध्ये मध्यापासून १-१ फूट दोन्ही बाजूस जागा सोडून साडेतीन फूट रुंदीचे व १ फूट उंचीचे दोन समांतर वाफे वीट बांधकाम करून तयार करावेत व आतील बाजूचे प्लास्टर करावे. तसेच खालील बाजूस कोबा करून घ्यावा. ज्यादा झालेले पाणी जाण्यासाठी तळाशी पाईप टाकावा. वाफे करण्यासाठी दुसरी पद्धत म्हणजे वाफे जमिनीच्या वर बांधण्याऐवजी ८ ते ९ इंच खोलीचे दोन समांतर चर काढावेत. खडुष्यातील माती चांगली चोपून टणक करावी.
२) पाचट कुजविणे
छपरामध्ये खोदलेल्या चरामध्ये अथवा वीट बांधकाम केलेल्या टाकीमध्ये उसाचे पाचट भरावे व त्याची उंची जमिनीपासून किंवा वीट बांधकामापासून २० ते ३० सें.मी. ठेवावी. पाचट भरताना एक टन पाचटासाठी युरिया ८ किलो, सिंगल सुपर फॉस्फेट १० किलो, पाचट कुजविणारे जिवाणू १ किलो व ताजे शेणखत १०० किलो वापरावे. या सर्वांचे पाण्यात मिश्रण करावे. पाचटाचा ५ ते १o सें.मी. थर दिल्यानंतर त्यावर शेणखत, युरिया व सुपर फॉस्फेटच्या द्रावणाचा पातळ थर द्यावा. याचबरोबर पाचट कुजविण्याची क्रिया लवकर होण्यासाठी पाचट कुजविणारे संवर्धन एक टनास १ किलो या प्रमाणे समप्रमाणात प्रत्येक थरावर वापरावे. अशा पद्धतीने खडु वाफा भरल्यानंतर त्यावर पुरेसे पाणी मारावे व पाण्याने भिजवून घेतलेल्या पोत्याने एक झाकून टाकावे. दररोज त्यावर पाणी मारण्याची दक्षता घ्यावी. असे एक महिना पाणी मारल्यानंतर पाचट अर्धवट कुजलेले दिसेल. शिवाय उष्णता कमी झाल्याचे आढळून येईल. असे अर्धवट कुजलेल्या एक टन पाचटासाठी २०,000 हॅसिनीया २.५ ते ३ महिन्यांनी उसाच्या पाचटापासून उत्तम प्रतीचे गांडूळखत तयार झालेले दिसेल.
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 8/3/2023
थंडी संपतेवेळी येणाऱ्या आंबिया बहाराचे व्यवस्थापन ...
यवतमाळची ओळख आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून सर्वदूर...
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...