1) कृषिराज अवजाराला तीन लोखंडी फण असतात. याचा उपयोग उसाला भर देणे, सरी - वरंबा फोडण्यासाठी केला जातो. अवजाराच्या मधील फण काढल्यास हे अवजार ऊस लागणीनंतर दीड ते दोन महिन्यांनी उसामधील आंतरमशागतीसाठी वापरता येते.
2) फणांच्या साह्याने उसाला दोन्ही बाजूंनी थोड्या प्रमाणात भर लागते. याच वेळी शिफारशीत नत्र खताचा दुसरा (40 टक्के) हप्ता द्यावा म्हणजे दिलेली खतमात्रा मातीआड केली जाते. नत्र खते मुळांच्या सान्निध्यात दिली गेल्यामुळे व उसाला भर मिळाल्याने फुटव्यांची वाढ जोमदार होते. फुटवे फुटण्याचे प्रमाण वाढते, उसाच्या बगलेतील तणांचा बंदोबस्त करता येतो.
3) या अवजाराच्या साह्याने एका दिवसात एक बैलजोडी एक एकर क्षेत्राच्या आंतरमशागतीचे काम पूर्ण करते. याच यंत्राला तीनही फण जोडून ऊस लागणीनंतर तीन ते साडेतीन महिन्यांनी सरी-वरंबा फोडण्यासाठी याचा उपयोग करतात.
1) या अवजारास दोन लोखंडी फणांना आडवी पास जोडलेली असते. हे अवजार तीन ते साडेतीन महिन्यांनी ऊसलागवडीनंतर कृषिराज यंत्र चालविल्यानंतर लगेचच पाठीमागे चालवितात.
2) या अवजारामुळे जमीन भुसभुशीत व सपाट होते, तणांचा बंदोबस्त होतो, जमिनीत माती भुसभुशीत झाल्यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते.
1) या अवजारास तीन लोखंडी पहारी 45 अंशाच्या कोनात जोडलेल्या असतात. उसाच्या बाळबांधणीच्या वेळी या अवजाराचा वापर सरी-वरंबा फोडण्यासाठी व जमीन भुसभुशीत करण्यासाठी, तणनियंत्रण करण्यासाठी केला जातो.
2) ऊस साडेचार ते पाच महिन्यांचा झाल्यावर उसाची मोठी बांधणी केली जाते. या वेळी तीन पहारींच्या यंत्राच्या साह्याने सरी-वरंबा फोडून जमीन भुसभुशीत केली जाते.
ऊस खोडवा पिकामध्ये पाचट ठेवून उसाच्या बेटापासून 15 सें.मी.वर व 15 सें.मी. खोल व दोन खड्ड्यांमधील अंतर 30 सें.मी. ठेवून सरीच्या एका बाजूने ऊस तुटल्यानंतर 15 दिवसांनी 50 टक्के खतमात्रा व उर्वरित 50 टक्के खतमात्रा याच पद्धतीने; परंतु सरीच्या दुसऱ्या बाजूने 130-135 दिवसांनी द्यावी.
पॉवर टिलरच्या साह्याने उसाची आंतरमशागतीची कामे केली जातात. या यंत्रामध्ये कामानुसार बदल करता येतो. हे यंत्र स्वयंचलित असून, सरी-वरंबा फोडणे, उसाला भर देणे, उसाची बांधणी करणे, उसातील जमीन सपाट करणे, तणनियंत्रण करणे, इत्यादी कामे केली जातात.
1) मिनी पॉवर टिलरने ऊस पिकातील सरी-वरंबा फोडण्याचे काम करता येते. उसातील बाळबांधणी व मोठ्या बांधणीचे काम या यंत्राच्या साह्याने करता येते, तसेच जमीन भुसभुशीत व सपाट करता येते. तणनियंत्रण केले जाते.
2) या यंत्राला वेगवेगळी अवजारे (फण, पास व रिजर) जोडता येतात, त्यामुळे आंतरमशागतीच्या खर्चात बचत होते.
1) या यंत्राच्या साह्याने ऊसलागणीपूर्वी सरी पाडल्यानंतर सरीमध्ये खत पेरून दिले जाते. यामध्ये स्फुरद व पालाशयुक्त खते एकत्र मिसळून दिली जातात. या खतांमध्ये युरिया मिसळू नये, कारण युरियाचा हवेशी जास्त वेळ संपर्क आला, तर युरिया ओलसर होतो व खतपेरणीमध्ये अडचण येते.
2) खतपेरणी यंत्र बैलजोडीच्या साह्याने ओढले जाते. या यंत्राच्या साह्याने खतपेरणी केली असता, खत जमिनीमध्ये सारख्या प्रमाणात व पाच ते सात सें.मी. खोलीवर पडते. यामुळे ते मुळांच्या कार्यक्षेत्रात पडल्यामुळे पिकांना शोषण करणे सोईस्कर होते. यामुळे उसाची उगवण चांगली होते. दिलेल्या खतांचा ऊस पिकाच्या वाढीसाठी पुरेपूर उपयोग होतो.
3) यंत्राच्या साह्याने एका दिवसात एक बैलजोडी चार एकर क्षेत्रातील खतपेरणी करते.
संपर्क - 02169- 265333, 265335
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा
अंतिम सुधारित : 10/7/2020
बेने ही एक गोष्ट फार महत्वाची आहे. उस लावताना तिनस...
रोपे तयार करण्यासाठी एक मी. रुंद आणि रोपांच्या संख...
आडसाली उसाची लागवड 15 जुलै ते 15 ऑगस्ट या कालावधीत...
ऊस बियाणे लागण करताना बियानाद्वारे नवीन रोपामध्ये ...